Print
Hits: 5816

५ मिनिटांची श्रवणशक्तिची चाचणी परीक्षा, मुख्यत्वेकरून प्रौढांसाठी
१. मला दूरध्वनीचे संभाषण ऐकण्यास अडचण येते.

२. दोन किंवा जास्त व्यक्ती जर एकाच वेळी बोलत असतील तर त्यांचे संभाषण समजण्यास मला अडचण येते.

३ माझ्या अवतीभवतीच्या लोकांची तक्रार आहे की मी दूरदर्शनच्या आवाजाची पट्‌टी जास्त ठेवतो.

४. मला संभाषण समजावून घेण्यास कष्ट पडतात.

५. दरवाजाचील बेल, दूरध्वनीची बेल असे नेहमीचे आवाज मला कळतच नाही.

६. एखाद्या समारंभाच्या सारख्या गजबजलेल्या ठिकाणी संभाषण ऐकण्यास मला अडचण येते.

७. आवाज कोठून आला ह्याविषयी माझा गोंधळ उडतो.


८. एखाद्या वाक्यातील काही शब्द मला कळत नाहीत आणि म्हणून ते वाक्य सांगणार्‍यांना मला परत विचारावे लागते.

९. मुख्यत्वेकरून स्त्रिया आणि मुले यांचे बोलणे समजण्यास मला अडचण येते.

१०. मी नेहमी गोंगाट असलेल्या वातावरणात काम करत आलो आहे. (जुळणीची जागा, हातोड्याने ठोकण्याची जागा, शक्तिशाली यंत्र वगैरे)

११. मी बोलतो त्या अनेक व्यक्ती पुटपुटतात (किंवा स्पष्टोच्चार व्यवस्थित नसतात)

१२. लोक माझ्याशी जे बोलतात ते व्यवस्थित न समजल्याने लोक माझ्यावर रागावतात.

१३. इतर काय बोलतात ते मला व्यवस्थित समजत नाही आणि त्यामुळे मी त्यांना चुकीचा प्रतिसाद देतो.

१४. मला व्यवस्थित ऐकू येत नसल्यामुळे मी सार्वजनिक कार्यक्रम टाळतो आणि मी व्यवस्थित उत्तरे देऊ शकणार नाही अशी मला भिती वाटते.

गुण मोजण्याची पध्दत
खालील प्रमाणे आपले गुण मोजावे.

आपणास ऐकू येत नाही असा रक्ताचे नाते असलेला नातेवाईक असल्यास ३ गुण वाढवावेत.
आपल्या गुणांची बेरीज करा.