Print
Hits: 5092

खेळणारी मुले, जाणार्‍या मोटारी, चिमण्यांचा चिवचिवट, टेलिफोनची घंटी, वैगेरे ऐकू न येणे, शब्द व वाक्य कळत नाहीत, सांगितले एक तर ऐकले भलतेच असा प्रकार झाला तर खालील दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

१. श्रवणयंत्राचा व्हॉल्युम सुसह्य होईल इतका ठेवावा. वातावरणातील आवाज ऐकण्याचा प्रयत्‍न करावा.
उदा. चालण्याचा आवाज, मुलांच्या खेळण्याचा आवाज, मोटारगाड्याचा आवाज, संभाषण ऐकण्याची घाई न करता वरील आवाज ओळण्याचा प्रयत्‍न करावा, न जमल्यास निराश होऊ नये. पुन्हा प्रयत्‍न करावा. थकवा येत असेल तर श्रवणयंत्र बंद करून पुन्हा प्रयत्‍न करावा. कालांतराने आपण दिवसभर आरामाने यंत्र लावू शकाल.

काय होत कारण उपाय
यंत्र लावल्यावर शिट्टी येते. १. कानाचा ठसा नीट लावला नाही.
२. यंत्राचा आवाज फ़ार जास्त आहे.
१. कानाचा ठसा नीट बसवावा.
२. व्हॅल्युम कंट्रोल फ़िरवुन यंत्राचा आवाज कमी करावा.
श्रवणयंत्रातुन आवाज येत नाही. १. करंट चालु केला नाही.
२. कानाचा ठसा मळामुळे बंद झाला.
३. बॅटरी संपली.
४. बॅटरी उलट लागली.
५. वायर आतुन तुटली.
१. बटण चालु करावे.
२. कानातल्या ठशातुन मळ साफ़ करावा.
३. बॅटरी बदलावी.
४. बॅटरी सरळ करावी. यंत्राला बॅटरी लावावी.
५. वायर बदलावी.
खराब ऎकु येते. १. गंजलेली बॅटरी कान्ट्रॅक्ट १. बॅटरी कान्ट्रॅक्ट स्वच्छ करावी.
२. वायर बदलावी.
आवाज कमी येतो. १. बॅटरी डाउन झाली. १. बॅटरी बदलावी.


२. एका व्यक्तीशी संभाषण
एखाद्या व्यक्तीशी संभाषण सरावाची सुरूवात करावी. समोरच्या व्यक्तीस संथपणे व स्पष्ट करून बोलण्यास सांगावे व आपण ते लक्षपूर्वक ऐकून त्याचे उत्तर द्यावे. आवाज ओळखण्यचा प्रयत्‍न करावा. त्याबरोबर लक्ष केंद्रित करावयाची सवय होईल. नीट ऐकू येत नसेल तर बोलण्याचा व हालचालींचा प्रयत्‍न करावा. आपले उच्चार सुधारण्याचा प्रयत्‍न करावा.

३. रेडिओ किंवा टी.व्ही. ऐकण्याचा सराव करणे
श्रवणयंत्राचा आवाज आरामदायक होईल असा ठेवून सर्वप्रथम बातम्या ऐकव्या. कारण बातमी वाचणार्‍यांचे उच्चार संथ व स्पष्ट असतात. त्यानंतर क्रमाक्रमाने नाटके व गाणी ऐकण्याचा प्रयत्‍न करावा. जर श्रवणयंत्राला टेलिफोनची सोय असेल तर रेडिओ किंवा टी.व्ही. सलूप इंडक्शन सिस्टिम बसविल्यास आवाज अधिक स्पष्ट व गोंगाटविरहीत ऐकू येतो.

४. सिनेमागृहात, नाट्यगृहात व देवळ्यात ऐकण्याचा सराव करणे
या प्रकारे ऐकण्याचा सराव करणेही श्रवणयंत्र वापरणार्‍यांची खरी परीक्षा आहे. व हा सराव करण्याअगोदर पहिल्या तीन सूचनांवर अंमल करणे आवश्यक आहे. वरील जागेत साधरणपणे मध्यभागी बसावे. याने आवाज सर्व वाहिन्यांसह आपल्यापर्यंत पोहचतो. वाईट ध्वनीप्रसरण प्रणाली व प्रेक्षकांचा गोंगाट यामुळे स्पष्टपणे कळण्यास अडथळा येतो. यावर निराश होऊ नये. याला एकमेव उपाय म्हणजे सतत ऐकण्याचा सराव करणे. जर वरील जागेत मॅग्नेटिकप्रणाली (इंडक्शन सिस्टिम) असेल तर श्रवणयंत्राचे बटण टेलीफोनवर ठेवल्यास नीट प्रकारे ऐकू येत नाही.

५. समूहात ऐकण्याचा सराव करणे
समूहात संभाषणाला सुरूवात करण्याआधी समूहात चाललेले संभाषण व आवाज ओळखण्याचा प्रयत्‍न करावा. नंतर हळू हळू सर्वजण बोलत असताना फक्त एकाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्‍न करावा. बोलण्यावर लक्ष केंद्रित करावे. जर काही ऐकू आले नाही तर निराश न होता पुन्हा प्रयत्‍न करावा.

६. टेलिफोनवर ऐकण्याचा सराव
आपल्या यंत्राला जर टेलिफोन ऐकण्याची सोय असेल तर श्रवणयंत्राचे बटण टेलिफोनवर ठेवून व टेलिफोनच रिसीव्हर यंत्राजवळ आणून श्रवणयंत्राचा आवाज नीट ऐकू येईल इतका ठेवावा. फोनवरून वेगवेगळ्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्‍न करावा.