Print
Hits: 6582

उपजीविके भोवतालचे गळू कसे शोषून घ्यावे?

 1. रूग्णाला व्यवस्थित बसवावे - रूग्णाला ताठ बसवावे. कान करणार्‍याच्या डोळ्या बरोबर रूग्णाचा डोळा येईल असे समांतर बसवावे, चांगली प्रकाशयोजना ठेवावी. (प्रकाशाचा मुख्य झोत अथवा आरसा रूग्णाच्या मागे असावा)
 2. आपण काय करणारे ते व्यवस्थित समजावावे. आणि त्याची परवानगी घ्यावी.
 3. पडजिभेचा मऊ भाग तपासून हालचाली जागा शोधावी. ही शोषण करण्याची जागा असते. आणि ती उपजीविकेच्या वरच्या बाजूला असते.
 4. ४% टॉपीकल लिडोकेन शोषण करण्याच्या जागी फवारावे.
 5. शोषणाच्या जागी थोडेसे, अंदाजे अर्धा सी. सी. भूल देण्याचे औषध टोचावे. २५ अथवा २७ गेजची लांब सुई वापरलेली चांगली असते.
 6. शोषणाच्या पिचकारी तयार ठेवावी. अंदाजे १० सी.सी. ची पिचकारी वापरावी.
  सुई - १८ गेजची लांब सुई अथवा १८ गेजची स्पायनल (पाठीच्या कण्यासारख्या ठिकाणी वापरतात ती) सुई अथवा ट्रोकार (मोठी सुई) अथवा लांब शिरेसाठी वापरतात अशी लवचिक रबरी नळी वापरता येते. सुईच्या टोकापासून अंदाजे १ सेंटीमीटरवर खूण करण्यासाठी स्टेरिस्ट्रीप वापरावी ज्या योगे जास्त खोल सुई जाणार नाही अशी काळजी घेता येईल, (त्या जागी आतल्या बाजूला कॅरॉटिड वाहिनी असते हे विसरू नका)
 7. आपल्या एका हातात (काम न करणार्‍या) जीभ दाबण्याची पट्‌टी धरावी आणि दुसर्‍या हातात (काम करणार्‍या) शोषण्याची पिचकारी धरावी.
 8. जीभ दाबावी, शोषण्याच्या जागी सुई खुपसावी आणि शोषण करावे.
 9. जर पू असेल, तर सर्वच्या सर्व शोषून घ्यावा.
 10. जर काही नसेल, तर सुई थोडी बाहेर काढा आणि थोडी खालच्या बाजूला वळावा आणि परत शोषण करा.
 11. जर तरी देखील काही नसेल, तर आकृतीप्रमाणे दुसरी जागा शोधावी. (खाली आणि थोडीशी बाजूला)
 12. रूग्णाला चूळ भरू द्यावी आणि थुंकू द्यावे (पाणी अथवा सलाईने)
 13. जर रूग्णाला खाणे पिणे करता येत असेल, आणि त्याला जर श्वासाला त्रास होण्याची लक्षणे नसतील आणि तो जास्त आजारी वाटत नसेल तर त्याला घरी पाठवावे.

काही सूचना
मऊ आणी हलके अन्न खाल्यानंतर तसेच दिवसभारात अनेक वेळा चुळा भराव्यात. जंतुप्रतिरक्षके आणि वेदनाशामके द्यावीत.

जर रूग्ण द्रवपदार्थ पिऊ शकत नसेल आणि त्याला श्वासोश्वासास त्रास होत असेल तर त्याला परत आणावे. जर रूग्ण व्यवस्थित असेल तर त्याला ४८ तासांनी परत तपासावे जर सुधारणा दिसत असेल तर जंतुप्रतिरक्षके सुरू ठेवावीत. जर परिस्थिती चांगली नसेल अथवा खराब असेल तर परत शोषण करावे आणि शिरेतून जंतुप्रतिरक्षके द्यावीत.