Print
Hits: 6565

प्रादुर्भाव किंवा प्रत्युर्जीत अवस्था
एक्झेमास म्हणजे काय?
त्वचेची लाही लाही होणे (एक्झेमास)
त्वचेची लाही किंवा एक्झेमास दोन्हीं एकाच प्रकारचे विकार आहेत. एक्झेमास हा त्वचेचा विकार आहे जो त्वचेचा दाह झाल्यामुळे होतो. त्याचे मुळात दोन प्रकार असतात.

एक्झोजेनॉस एक्झेमा: त्वचेची बाह्य निष्काळजीपणामुळे उद्भवतो. एंडोजेन एक्झेमा : शाररिक स्वाभाविकतेमुळे किंवा अनुवांशिकतेमुळे उद्भवतो.

एक्झोजेनॉस एक्झेमा चे प्रकार: त्वचेची जळजळ व प्रादुर्भावासह होतो. साबणामुळे होणारा त्वचेचा दाह, ओलाव्यामुळे होणारा त्वचेचा दाह, अतीबंधनामुळे होणारा त्वचेचा दाह

एंडोजेन एक्झेमा चे प्रकार: ऍटोपिक दाह, सेबोरहिआ दाह, नसा सुजून होणारा दाह हे यातील महत्त्वाचे प्रकार आहेत. एक्झेमास हा अनुवांशिक असू शकतो. ऍटोपिक दाह हा सर्वात महत्त्वाचा अनुवांशिक एक्झेमास विकार आहे. हा लहान मुलांना व प्रौढ व्यक्तींना, ज्यांचे कुटुंबिय पूर्वी ह्या प्रकारच्या दाहाने बाधित होते त्याना उद्भवू शकतो.

एक्झोजेनॉस एक्झेमा साठी उपचार
ज्या पदार्थांपासून, वस्तूंपासून शरिरात शरिरात असह्यपणा-दाह निर्माण होतो, त्या पदार्थापासून दूर राहण्याने एक्झोजेनॉस एक्झेमा टाळता येतो. परंतु ऍलर्जिक एक्झेमा मधे त्या ऍलर्जीचे कारण शोधणे फार कठीण आहे. ऍलर्जी टेस्ट या विशेष निदान पद्धतीमुळे ऍलर्जिक पदार्थांचा शोध घेतला जाऊ शकतो.

एक्झेमावरील उपचारासाठी वापराची औषधे
स्टेरॉईड औषधे हे खूप महत्वाचे औषधे आहेत. स्टेरॉईड हे वेगवेगळ्या स्वरुपात असू शकते. जसे क्रिम, लोशन किंवा ऑइनमेन्ट. स्टेरॉईड त्वचेच्या दाहाची तीव्रता कमी करते.