Print
Hits: 11977

लहान मुलांमधे त्वचा कापली जाणे, जखमा होणे, भाजणे तसेच इतर काही त्वचेला हानी पोहचवणारी स्वाभाविक वर्तणूक असते. मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासंबंधी काही ठळक दक्षतांचा इथे उल्लेख केलेला आहे. याच्या सहाय्याने तुम्हाला मुलांच्या लहान-सहान समस्यांना हाताळण्यास मदत होईल.

सूर्याच्या प्रखरते पासून दुर ठेवणे
आपल्या मुलांना सूर्याच्या प्रखरतेपासून दुर ठेवा. हे खूप महत्वाचे आहे कारण याचमुळे कालांतराने त्वचेचे काही विकार उद्भवण्याची शक्यता अधिक असते जसे त्वचेचा कर्करोग. निरिक्षणावरून लक्षात येते की १८ वर्षाखालील मुले आयुष्यातील ५०% ते ८०% कालावधी सुर्याच्या प्रखरतेसमोरच राहत असतात.

सूर्याच्या प्रखरतेपासून बचाव
लहान मुलांना सुर्याच्या प्रखरतेपासून बचाव का आवश्यक आहे त्याचे ज्ञान द्या. उशिरा उद्भवणारे विकार टाळण्यासाठी त्यांचा टोपी किंवा प्रखरते पासून बचाव करणारे कपडे घालण्यास द्यावेत. तसेच मुले त्या वस्तुंचा वापर करीत आहेत की नाही याची पडताळणी करणेही आवश्यक आहे.

बाळाची संवेदनशील त्वचा
तान्ह्या बाळाची त्वचा नेहमीच संवेदनशील असते. म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी वापरत असलेली उत्पादने त्यांच्यासाठीच बनवलेली व सर्वसामान्य आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. लहान बाळांसाठी काही विशेष उत्पादनाची निर्मिती केलेली असते. जसे आयव्हरी स्नो लहान बाळासाठी धुण्याचा साबण म्हणून वापरला जातो. लक्षात ठेवा, लहान मुलांना जखमा होतच असतात पण त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळाला बालरोगतज्ञांना जरूर दाखवा.

१०१ वेळा हात धुणे
जिवाणू व संसर्गापासून बचाव करण्यासाठी नेहमी आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत व लहान मुलांनाही हात व्यवस्थित धुऊन घेण्यास वारंवार सांगावे. आपले हात कमीत कमी १५ मिनिटे कोमट पाण्याने धुवावेत. चांगला साबण वापरावा व आपले हात एकामेकांवर चांगले रगडून हात धुवावेत. शरिराच्या काही भागात विशेष काळजी घ्यावी लागते जसे दोन बोटांमधिल जागा किंवा हातांच्या नखांखाली मळ साठण्याची शक्यता अधिक असते. कोरड्या पंच्याने आपले हात कोरडे करून घ्यावेत. जर आपण सार्वजनिक ठिकाणी रहात असाल तर पेपर टॉवेलचा वापर करावा.

खरुज, नायटा
याचा किटाणूंशी काहीही संबंध नाही. हा संसर्ग नखांचा अस्वच्छतेमुळे उद्भवतो. यामधे शरिरातील वरच्या भागावरील त्वचेवर, हातावर व पायावर लाल रंगाचे व गोल आकाराचे चट्टे येतात. जर आपली रोग प्रतिकार शक्ती कमी असेल, मैदानी खेळात जास्त सहभागी होत असाल तर नखे अस्वच्छ राहील्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. डॉक्टरांना जरूर दाखवा व त्यांच्या सल्ल्यानुसार इलाज सुरु करा.

त्वचेला खोल चरे पडणे
यावर त्वरीत इलाज करणे गरजेचे असते. कारण हे त्वचेच्या खालील नसांना किंवा रक्तवाहिन्यांना तडे गेल्याने होत असते. लवकरात लवकर जखमेच्या जागी रक्त थांबवण्यासाठी बर्फ लावावा.

ब्लिस्टर्स
ब्लिस्टर झाल्या जागचा वरील थर ओढून काढावा. याची जखम असलेल्या ठिकाणची त्वचा आजुबाजूला गोल आकारात कापावी जेणेकरुन जखम अधिक वाढणार नाही.

भाजणे
त्वचेवर जळल्या जागी इतर काहीच टाकू नये. ऑईनमेंट किंवा लोशनमुळे संसर्ग वाढू शकतो. जळलेल्या किंवा भाजलेल्या जागेला न झाकता ती जागा उघडीच ठेवावी. यामुळे जळजळ कमी होण्यास अधिक मदत होईल.

कापणे किंवा चरे पडणे
ब-याच अशा स्वरुपाच्या जखमा योग्य देखभालीमुळे लवकर ब-या होतात. ज्यांचे जखमांमधून रक्त वाहणे थांबत नाही अशांच्या जखमात कचरा राहिल्याने तसे होत असते. हा कचरा आपल्याला काढता येते नाही. तसेच अशी जखम जर तोंडावरील भागात असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा व त्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.