Print
Hits: 5923
Skin anatomy
त्वचेची साचेबद्ध रचना

त्वचेमधे वेगवेगळ्या प्रकारच्या रचना व वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. तसेच त्वचेवरील थर व त्या थराच्या रंगाची झालर सतत बदल असते. त्वचेचा जाडसरपणा बदलत असतो व वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जाडीचे त्वचेचे थर असू शकतात. त्वचेवर तीन प्रकारचे थर असतात. जसे एपीडरमिस, डरमिस, सबक्युटेनेओस टिश्यू. एपिडरमिस हा त्वचेचा बाह्य बाजुस असणारा थर आहे. त्याथरात मृतपेशी असतात ज्या दर दोन आठवड्यात झाकल्या जातात. डरमिस या थरात तिन प्रकारचे तंतुयुक्त अच्छादने असतात. जसे कोलायजन, ईलास्टिक तंतु, रेटिकुलर फिबर. सबक्युटेनेओस टिश्यु हा मेदाचा आणि संयोजित तंतुंचा थर असतो.

मॉइस्चरायझिंग
मॉइस्चरायझिंगमुळे त्वचेच्या अंतर्गत भागांना पाणी पुरवले जाते व नंतरच्या काळात त्वचेतील आर्द्रता कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाते. तसेच त्वचेत पूर्ववत असलेली आर्द्रता निघून जाऊ नये म्हणून हे त्वचेचे संरक्षक अच्छादन म्हणून उपयोगात येते. यातील पाणी आणि अजून ब-याच गोष्टी त्वचेची आद्रता टिकवून ठेवतात. मॉइस्चरायझिंग लोशन त्वचेतील गमावलेल्या आर्द्रतेला पुर्ववत उपलब्ध करून देते. त्वचा कोरडी असणा-यांसाठी तसेच त्वचेचा तेलकटपणा कमी असणा-यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

फेस मास्क पद्धतीमधेही आर्द्रतेचा प्रभाव असतो. त्वचा कोरडी असणा-यासाठी म्हणजे ज्यांना अधिक आर्द्रतेची व दक्षतेची आवश्यक्ता आहे अशांसाठी फेसमास्क उपयुक्त आहे.

एक्स्फोलायटिंग
एक्स्फोलायटिंगने त्वचेचा वरील अतिसुक्ष्म थर धुळीसह, मृतपेशींसह, त्वचेचे अतिसुक्ष्म तुकड्यांसह काढला जातो. यामुळे क्लिंझिंगपेक्षा त्वचा जास्त साफ होते. त्वचेचा वरचा थर काढल्या नंतर निरोगी थर निर्माण करायला मदत करते.