Print
Hits: 8234

तुलनात्मक दृष्ट्या पुरुषांचे कार्यक्षेत्र विशाल असते. ते तळपत्या सुर्यासमोर जास्त राहतात, त्यांना वारा आणि प्रदुषणाला त्यांना जास्त सामोरे जावे लागते. पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत त्वचेची निगा राखण्यासाठी अवलंबण्याचे मार्ग थोडे वेगळे आहेत. परंतु त्यात खूप मोठा फरकही नसतो.

पुरुषांची त्वचा सर्वसाधारणतः तेलकट असते. तसेच त्वचेचे रक्षण करणारी छिद्र भरपूर प्रमाणात, खडबडीत व मोठी असतात. त्वचेवरील केसांची वाढ अधिक असते.

म्हणूनच अशा त्वचेला योग्य ती निगा राखण्याची गरज असते. त्यासाठी सुरवातीला काही चुकीच्या समजुती मनातून काढून टाकल्या पाहिजेत. त्वचेची निगा रखण्याचे काम म्हणजे आपला वेळ वाया घालवणे हा समजच चुकीचा आहे. पुर्ण दिवसामधली काही मिनिटे यासाठी पुरेशी असतात.

पुरुषांची त्वचेची निगा राखणारी उत्पादने हलकी व कमी रसायनांनी बनवलेली असतात. ही उत्पादने विशेषतः त्वचा ताजी व मऊ राहण्यासाठी बनवलेली असतात. त्या उत्पादनाचा वापर हा त्या व्यक्तीच्या वयोमानावर अवलंबून असतो. एखादा व्यक्ती वयाने जास्त असेल तर त्वचा कोरडी पडत चाललेली असते. आर्द्रतेचा प्रभाव आणणारे हलके क्लिंस्नर वापरावेत. तसेच त्यानी सुर्याप्रकाशाच्या प्रखरतेपासून बचाव करणारे क्रीम वापरात आणावे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा धुण्याचा साबण वापरावा. पुरुषांच्या त्वचेची निगा राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनात क्लिंस्नर, कंडीशनर, टोनर आणि मॉस्चरायजर यांचा समावेश असतो.

त्वचेची स्वच्छता (क्लिंझिंग)
नैसर्गिक क्लिंझर वापरून केलेल्या सखोल स्वच्छतेमुळे त्वचेचे रक्षण करणारी छिद्रे साफ होतात आणि प्रदुषण व जंतुंपासून त्वचेच्या आरोग्याचे रक्षण होते. क्लिंझिंग ही नेहमी मॉइस्चरायजिंग करतेवेळीच करावी. यामुळे त्वचा उठावदार दिसते. क्लिंझिंग करताना स्क्रबचाही वा