Print
Hits: 5928

गर्भधारणेच्या खुणा
मेलेस्मा हा क्लोएस्मा नवानेही ओळखला जातो. मेलेस्मा या शब्दाचा खरा अर्थ गर्भधारणेच्या खुणा असा आहे. अशाप्रकारच्या वर्णाच्या खुणा पुरुष व स्त्री दोघांमधेही चेह-यावर किंवा शरिराच्या इतर भगावर अढळतात. मेलेस्मा ह्या विकारामुळे चेह-यावरील त्वचेचा तोंडाजवळील भाग गडद होत जातो. त्वचेच वर्ण बनवणा-या पेशींना मेलेनोसईट्स असे म्हणतात. ही उत्पादकता गर्भनिरोधक गोळ्यांमुळे, गर्भावस्थेत व त्यासंबंधीत अवस्थेमधे वाढत असते.

मेलेस्मावर उपचार
उपचारांमधे सुर्याच्या प्रखरतेपासून बचाव करण्यासाठी ब्लिचिंग आणि लाईटनिंग पद्धतीचा समावेश असतो. त्वचेवर वापरल्या जाणा-या ब्लिचला सामान्य त्वचा व बाधित त्वचा यात फरक करता येते नाही. म्हणुनच हा ब्लिच बाधित त्वचेवरच लावणे गरजेचे आहे. दिवसातून दोनदा याचा वापर करावा. ही प्रक्रिया परस्पर वर्णभेदावर अवलंबून आहे. तसेच या प्रक्रियेमुळे पुर्ण इलाज होण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ लागू शकतो. जर वारंवार याचा वापर केल्यानेही त्वचेवर त्याचा फायदा होत नसेल तर डरमॅटॉलॉजिस्ट कडून सल्ला घेणे आवश्यक आहे.

ग्लायकोलिक ऍसिड चा ब्लिचिंग करताना वापर करणे हिताचे आहे. त्यामुळे त्यचेच्या मुळापर्यंत उपचार करणे शक्य होते. ग्लायकोलिक ऍसिड पिल्स ही फार उपयोगी असते. काही रुग्ण उपचारासाठी लेझर पद्धतीकडे वळतात. जेव्हा तुम्हाला हवे तसे उपचार झाले असतील त पुन्हा ब्लिचिंग पद्धती थांबवून सुर्याच्या प्रखरतेपासून बचाव करणारे उपाय आमलात आणावे. जर तुम्हाला ग्लायकोलिक ऍसिड किंवा जिवनसत्व ए चा वापर क्रमशः करायचा असेल तर तो करु शकता. सुर्यापासून बचाव करण्यासाठी सन्स्क्रिनचा, ३० ते ४५ युव्हीए आणि युव्हीबी असलेल्या सनस्क्रिनचा वापर करावा. टोपी वापरावी तसेच सुर्यासमोर जाणे शक्यतो टाळावे.