Print
Hits: 17313

सोरायसिस हा संसर्गजन्य नाही. पण हा आयुष्यभराचा आजार आहे. सहसा हा प्लक सोरायसिस स्वरुपात, लाल चट्ट्यांनी उगवत्या स्वरुपात किंवा पांढ-या चमकत्या, त्वचेच्या मृत पेशींच्या स्वरुपात अढळतो. त्याला स्केल असेही म्हणतात. ही परिस्थिती वेगाने बदलणारी असते किंवा ही परिस्थिती अधुनमधून दिसेनाशीही होते. साधारणतः या विकारात कोपरे, गुडघे आणि पाठीचा खालचा भाग यांच्यात प्रादुर्भाव प्रामुख्याने अढळतो. तर नखे, तळवे आणि शरिराचा इतर भागातही काही कमी प्रमाणात अढळतो.

सोरायसिसवर उपचार
परंपरागत उपचार हे तिव्र रसायने व ऑईनमेंटचा समावेश असलेल्या औषधांनी होत असते. ह्या उपचारांनी काही काळापुरता हा आजार बरा होतो परंतु कालांतराने हा आजार अधिक तिव्रतेने उफाळून येतो. प्रत्येक वेळेस अधिक तिव्रतेच्य औषधांची, उपचारांची आवशक्ता असते. हे उपचार वारंवार घेत राहिल्याने यकृत व मुत्राशयाला अपाय होण्याची शक्यता असते. यामुळे आयुष्याला धोका निर्माण होतो. कधी कधी ह्या उपचारांनी काहीच उपाय होत नाही. हा आजार आणि त्याचे तिव्रता वाढत रहतो.

पारंपारिक पद्धत कधी कधी त्वचेच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. पण त्वचेच्या पेशींची वाढ होत राहण्याचे कारण त्याच्यावर नियंत्रण रक्तापेशी (T) करत असतात. पारंपारिक औषधांचे त्यांच्यावर नियंत्रण नसते. म्हणूनच आजाराची तिव्रता वारंवार वाढतच असते.

रचनात्मक होमिओपेथिक उपचार या आजाराच्या मुळाशी म्हणजे (T) पेशींवर नियंत्रण मिळवते. होमिओपेथिक उपचार रोगप्रतिकार शक्ती परत करते. तसेच आपले आरोग्य सामान्यस्थितीत आणते.

होमिओपेथिक पद्धतीने उपचाराची प्रक्रिया
होमिओपेथिक पद्धतीने फक्त सोरायसिसवर उपचार केला जात नाही तर त्याच्या वारंवारतेवरही आळा घालता येतो. जर रुग्ण धैर्यशील असेल आणि डॉक्टरांनी आजाराचे योग्य कारण शोधले असेल तर इलाज निश्चितच आहे.

खरतर या आजाराची लक्षणे या आजाराप्रमाणे नसतात. या आजाराची लक्षणे म्हणजे आजाराला दूर करण्यासाठी रोग प्रतिकार शक्तीने केलेले अत्यल्प प्रयत्न आहेत. उपचारांनी त्या लक्षणांना दूर करण्यावर प्रधान्य दिले जाते, रोग प्रतिकार शक्तीला रोखून आजराला अंतर्गत वाढीला वाव दिला जातो. अंतर्गत वाढ होत असताना आजाराची तिव्रता जास्त असते, दरम्यान पुन्हा रोग प्रतिकार शक्ती त्याच्या वाढीला प्रतिबंध करते. या प्रतिकारादरम्यान रोगप्रतिकार शक्ती व शरिरातील काही महत्वाच्या पेशींना नुकसान होते त्याचे परिणाम यकृत व मुत्रशयावर होतात.

होमिओपेथिक औषधे रोगप्रतिकार शक्तीला बळकटी आणतात जेणेकरून आजाराला शरिराबाहेर करण्यास मदत मिळते. ह्याच कारणामुळे आजाराची तिव्रता कमी होत असताना योग्य होमिओपेथिक औषधे वाढवली जातात याला ऍग्रेव्हेशन ऑक्युअर असे म्हणतात. यातुनच आजारापासून कायम स्वरुपी सुटका मिळते.

जुना झालेला आजार आणि अशा रुग्णाची शारीरिक परिस्थिती पाहता आजारावर उपचारांऎवजी त्याला रोखण्यावर भर दिला असल्याचे दिसून येते. होमिओपेथिक उपचारांनी शरिरावस्था कायमस्वरुपी पुर्ववत व सुदृढ होते.

सोरायसिसच्या आजारामधे (T) पेशींचा संचार पुर्ववत होऊ लागतो जेणे करुन या आजाराची वारंवारता अजिबात उद्भवत नाही. सोरायसिस आजारामधे खरी निरोगीता आणि आजारात नैसर्गिकतेने घट होणे यांच्यातील फरक. काहीवेळा सोरायसिस उपचारांशिवायही बरा होतो याला नैसर्गिक घट (नॅचरल रेमिशन)असे म्हणतात. पण ह्यामधे आजार पुन्हा काही महिन्यांनी पुन्हा प्रकट होतो. ही परिस्थिती पूर्णतः बरे होण्याविषयी दुविधा निर्माण करते. ज्ञात व्यक्ती होमिओपेथिक उपचार हे नैसर्गिक घट आणणारे आहेत असे मानत नाहीत. यासाठी याच्यातील फरकाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

नैसर्गिक घट होणे याप्रकारात हा आजार काही काळासाठी नाहीसा होतो पण त्याआजाराला अनुकुल असणा-या वातावरणात, ताणतणावाच्या काळात अधिक तिव्रतेने पुन्हा प्रकट होतो. तेव्हा तो आजार शरिरावरील जास्त भागावर पसरत असतो. पुन्हा प्रकट झाल्यानंतरचा तो आजार अधिक काळासाठी असतो. सहसा तो पुन्हा निघुन जात नाही. त्यावेळेस अधिक शक्तीशाली औषधांची आवशक्ता असते. म्हणजेच तो त्वचेवरून नाहीसा होत असला तरी तो अंतर्गत भागात तो वाढतच असतो.

होमिओपिथिक उपचारांच्या कालावधीत हा आजार कधी कधी पुन्हा प्रकट होतो परंतु त्याची तिव्रता कमी असते. त्याचा प्रदुर्भाव कमी भागात होतो. अधिक सखोल व मुळावर उपचार केल्याने पुन्हा उद्भवू नये यासाठी अधिक प्रभावाने इलाज केला जातो. असे निरिक्षण केले गेले आहे की आपले आरोग्य न जपणा-या रुग्णांमधे, बदलत्या हवमानामुळे, व्यसनाच्या आहारी गेलेल्या रुग्णांमधे हा आजार पुन्हा उद्भवतो पण त्याची तिव्रता कमी स्वरुपाची असते. तसेच उपचारांनी लवकरच सुटका मिळते. सोरायसिस फक्त पारंपारिक होमिओपेथिक पचारपद्धतीने व उच्चशिक्षित होमिओपेथिक डॉक्टरांच्या मदतीने बरा होऊ शकतो.

हा आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते. जर एकादा व्यक्ती अमुक एक आजाराने पिडीत आहे तर त्या आजाराची काही लक्षणेही असतात व ती त्या रुग्णामधे दिसुन येतात. हा आजारपुर्णपणे प्रभावी होण्याआधी त्या रुग्णाच्या वर्तणुकीमधे वयक्तिक व समाजिक बदल होत जातात. यासर्व बदलाचा या आजाराच्या उपचारात विचार होणे गरजेचे आहे. म्हणजेच डॉक्टरांना याचे ज्ञान असणे गरजेचे आहे की तो रुग्ण हा फक्त शाररिकरीत्या पिडीत नसून मानसिकरीत्याही तो या आजारामुळे पिडीत आहे. मार्गदर्शनासाठी रुग्णासाठी प्रश्नावली उपलब्ध असते.

या आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी रुग्णाची आवडनिवड, स्वभाव, वर्तणुक, दृष्टिकोन यांची नोंद असणे गरजेचे आहे. तो रुग्ण या आजाराला मानसिकरीत्या हाताळतो आहे किंवा नाही हेही जाणून घेणे फार गरजेचे आहे. यासर्व दृष्टिकोनाने विचार करुन उपचार केल्यामुळे फलस्वरुप प्रतिकार शक्ति चुकीचे संकेत पाठवणे बंद करते.

आजाराचा सामाजिक भाग
सोरायसिसमुळे त्वचेवर थेट परिणाम होतात, तसेच लोकांच्या भावनांवर, वर्तणुकीवर व अनुभवांवरही परिणाम होत असतात. याआजाराची योग्य पद्धतीने हाताळणी करण्यासाठी या आजाराच्या समाजिक भागाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. काही लोक या आजाराला शाररिक व मानसिकरीत्या व्यवस्थित हाताळू शकतात. पण प्रत्येक व्यक्ती हाताळू शकेलच असे नाही. सोरायसिस रुग्णाला इतर लोकांपासून दुर करतो कारण त्यांची त्वचा इतर लोकांपेक्षा वेगळी दिसत असते. काहीवेळा लोक त्यापिडीत व्यक्तीशी उद्धटपणे वागतात किंवा त्यांना वाळीत टाकतात कारण त्यांना अशी त्वचा बघण्याची सवय नसते किंवा हा आजार आपल्यालाही जखडून घेईल अशी भिती त्यांना वाटत असते. यासर्व गोष्टीला एकच कारण असते ते म्हणजे त्यांना या आजाराविषयी काहीच कल्पना नसते. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया रोखण्यासाठी व स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.