मॉइस्चरायझिंग
प्रत्येक प्रकारच्या त्वचेला मॉस्चरायझिंगची आवश्यक्ता असते. जर आपल्या त्वचेला तडे जात असतील तर हलका तेलविरहीत मॉस्चरायझर वापरावा. चांगल्या मॉस्चरायझरच्या पर्यायासाठी सूर्याच्या प्रखरतेपासून बचाव करणा-या (SPF) 15) ची निवड करावी. चांगल्या मॉस्चरायझरमधे बरेच लोशन आणि क्रिम्सचा समावेश असतो. कारण यामूळे त्वचेमधे नैसर्गिक आर्द्रता आणण्यास मदत होते. एखादे विशिष्ट उत्पादन प्रत्येकासाठी चांगलेच ठरेल असे नाही. कदाचित चांगला प्रभावी मॉस्चरायझर मिळवण्यासाठी आधी बरेच मॉस्चरायझर वापरावे लागतील.
हलके मॉस्चरायझिंग हे तरुण त्वचेसाठी योग्य ठरते. मॉस्चरायझरच्या रोज वापरामुळेच ते चांगले परिणाम देऊ शकतात. ब-याच मॉस्चरायझिंग क्रिम्स मधे अल्फा-हायड्रोसिल ऍसिड(हे दुध,फळे आणि साखरेतही असते)असते. हे सुरकुत्यांवर प्रभावी ठरतात.
आपली त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी व सुदृढ ठेवण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्वांचा वापर करावा
- आंघोळीसाठी किंवा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा.
- हलके साबण वापरावे.
- त्वचा स्वच्छ झाल्यानंतर गरजेपेक्षा जास्त काळ पाण्यात राहू नये.
- मॉइस्चरायझरचा वापर आंघोळीनंतर त्वरीत करावा.
- हिवाळ्यात त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्यतो हात हातमोज्यांनी व चेहरा झाकून ठेवावा.
त्वचेचे सूर्याच्या प्रखरतेपासून रक्षण करणे
सूर्याच्या प्रखरतेपासून त्वचेचे रक्षण करण्याला आपल्या दैनंदीन जीवनातली एक सवयच घालून घेतली पाहीजे. सूर्याचा प्रकाशात दोन प्रकारच्या लहरी असतात जसे UVA & UVB
UVA : हे किरण त्वचेच्या कडा घेतात व त्वचेच्या खोल भागापर्यंत जाऊन रेडिकल हलचाली निर्माण करतात. हे कर्करोगासाठी किंवा संवेदनशील प्रतिक्रीयांना कारणीभूत ठरू शकते.
UVB : हे किरण त्वचेला भाजत जातात व त्वचेवर तपकीरी रंग आणतात. यामूले त्वचेचा कर्करोग उद्भवू शकतो. हे किरण UVA पेक्षा अधिक तीव्र असतात.
याचा प्रभाव त्वरीत दिसत नसला तरी जास्त सूर्यासमोर रहाणे धोक्याचे आहे हे आपल्याला कळले पाहीजे. तसेच पर्यावरणात होणारे अनियमित बदल, प्रदुषण आणि तीव्र साबण आपल्या त्वचेला हानी पोहचवतात.
सूर्याच्या प्रखरतेपासून बचाव करण्यासाठी काही मार्गदर्शन
सुरकुत्यांपासून बचाव
- सूर्याच्या प्रखरते पुढे जास्त काळ राहणे हे सुर्कुत्यांना तसेच जास्त वय दिसण्याला कारण ठरु शकते.
- त्वचेमधे ईलास्टिक कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचेत शिथिलता येते.
वयाच्या पंचविशीनंतर रोजच्या फेशियल करण्याने त्वचेत लवचिकता टिकून राहते. त्वचेत वेळोवेळी रक्त पुरवठा होत राहतो.
आपण त्वचेवर वापरण्यासाठी विविध कोलेजन उत्पादने खरेदी करू शकता. पण हे अद्यापही सिद्ध झालेले नाही की ही उत्पादने त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवतात.
त्वचेवर वापरण्यासाठी कोणतेही उत्पादन वापरण्याआधी त्वचा तज्ञांना विचारुनच आमलात आणावे. त्वचेतील सुरकुत्या काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे कोलेजन फिबरचे इंजेक्शन किंवा प्लास्टिक सर्जरी वगैरे. पण हे कायमस्वरूपी उपाय नाहीत. तसेच यांच्यावापरा आधी ब-याच गोष्टींचे व त्वचेच्य संवेदनशीलतेचे निरिक्षण आवश्यक असते.
सुरकुत्या येणे ही चिकित्साविषयक समस्या नाही. तरीही काही लोक त्याची मदत घेतात. याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे की जो डॉक्टर यावर उपचार करणार आहे तो व्यवस्थित या क्षेत्रात पारंगत आहे किंवा नाही, त्वचा तज्ञ आहे किंवा नाही किंवा प्लास्टिक सर्जन आहे किंवा नाही. या सर्व गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.