Print
Hits: 7446

मूत्रपिंडाचे चित्रीकरण (Imaging) आणि रोगनिदान निश्‍चित करण्यासाठी मूत्रपिंडातील सजीव पेशीसमूह शस्त्रक्रियेने वेगळा करून सूक्ष्मदर्शक यंत्रातून तपासणे (Biopsy)

मूत्रपिंडाचे चित्रांकित करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती कोणत्या?
अल्ट्रासांउंड, CT स्कॅन, एम.आर.आय, आय.व्ही.पी, मूत्रपिंडाचा स्कॅन, Renal Arteriogram या पध्दती सामान्यपणे वापरल्या जातात.

मूत्रपिंडाच्या चित्रावरून त्याचा अभ्यास केल्याने काय उपयोग होतो?
१) मूत्रपिंडाची जागा आणि त्याचा आकार (size) समजतो.
२) मूत्रमार्गात एखादी अडचण निर्माण झाली असल्यास त्याचा आकार आणि जागा समजते.
३) मूत्रपिंडाला होणारा रक्तपुरवठा दृश्यांकित करता येतो.
४) पाणथळ पिशवी किंवा टण्णू असल्यास त्यांचा शोध लागू शकतो.

IVP म्हणजे काय?
Jntravenous Pyelogram म्हणजे आयव्हीपी. यात आयोडीनयुक्त इन्ट्राव्हीनस इंजेक्शनचा वापर केला जातो, ते मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटामधून गाळले जाऊन मूत्रपिंडातील नळ्यांमध्ये एकत्र येते आणि तेथून गर्भाशयात जाते आणि शेवटी मूत्राशयातून लघवीत येते. इंजेक्शन दिल्यापासून थोड्या थोड्या वेळाने क्ष-किरण तपासणी केली जाते. इंजेक्शन दिल्यानंतर १ ते ३ मिनिटानंतर रंग दिसतो. यामुळे मित्रपिंडाची संख्या, त्यांचा आकार इत्यादी आणि जर त्यांच्यात काही दोष असतील तर ते समजण्यास मदत होते. पाच मिनिटांनी पुढील भागात गर्भाशय आणि मूत्राशय दृश्यांकित होतात IVP मध्ये किरणोत्सर्जन होते, त्यामुळे गर्भवती महिलांमध्ये किंवा अगदी लहान मुलांमध्ये हा उपचार देत नाही. याबरोबरच Radio Contrast मूत्रपिंडाला घातक ठरू शकते आणि ज्यांच्यात आधीपासून मूत्रपिंडाचा दोष आहे, त्यांना IVP त्रासदायक ठरू शकते.

Ultrasound मध्ये मूत्रपिंड कसे दिसते?
अल्ट्रासाउंड लहरी Echo निर्माण करतात, जेव्हा त्यांच्या मार्गात पेशींचा समूह हवा किंवा एखादा प्रवाही पदार्थ अडथळा निर्माण करतात, हे तत्व अल्ट्रासाउंड मध्ये वापरले जाते. पाणी, चरबी, खनिज पदार्थ यांच्याबाबतीत हा अडथळा वेगळ्या प्रकारचा असतो. या लहरी ज्या परावर्तित होतात त्यांची खुण म्हणून नोंद केली जाते.

मूत्रपिंडाविषयीच्या अल्ट्रासाउंडचा उपयोग कोणता?
मुख्य उपयोग अशा प्रकारे:
१) मूत्रपिंडाचा नेमका आजार समजण्यासाठी
२) मूत्र प्रवाहात काही अडथळा आहे का हे पाहण्यासाठी
३) पाणथळ पिशवी आणि टण्णू यांचे मूल्यमापन करण्यासाठी

दोन्ही मूत्रपिंडामध्ये मोठ्या संख्येने पाणथळ पिशव्या असणे हे साधारणपणे Polysystic रोग दर्शविते. घट्ट पदार्थसमुच्चय असणे मूत्रपिंडात टण्णू असल्याचे दर्शविते.

मूत्रपिंड चित्रांकीत/दृश्यांकित करण्यासाठी CT Scan वापरले जाते का?
निश्‍चितपणे. पाणथळ पिशव्या टण्णू स्त्राव किंवा संसर्ग दिसण्यास मदत होते

मूत्रपिंडाची Arteriography म्हणजे काय?
रोहीणीमध्ये इंजेक्शन देऊन मूत्रपिंडातील रोहीणीचे दृश्यांकन म्हणजे Arteriography. मूत्रपिंडातील रोहीणीचे जर आकुंचन झाले असेल तर त्याचे निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. धूम्रपान करणार्‍यांमध्ये रोहिणीचे आकुंचन दिसून येते.

मूत्रपिंडाचे Scan म्हणजे काय?
मूत्रपिंडाच्या Scan मध्ये Radio Nuclide घटक असलेले Intravenous इंजेक्शन वापरले जाते, जे किरणोत्सर्जनास मदत करते. Scintillation कॅमेर्‍याने हे किरण टिपले जातात. या स्कॅनमुळे मूत्रपिंडात होणार्‍या रक्तप्रवाहाची माहिती मिळते. या घटकाच्या उत्सर्जनास जर वेळ लागला तर मूत्रपिंडात अंतर्गत रोग आहे, कमी रक्तप्रवाह किंवा मूत्रप्रवाहाला अडथळा आहे हे समजते. याचा वापर मुख्यतः Contrast Material चा ज्या रूग्णांवर उलटा परिणाम झाला आहे, त्यामुळे Reanalarteriogramy किंवा IVP करणे शक्य नाही, अशा रोग्यांच्या मूल्यमापनासाठी ही पध्दत वापरली जाते.

मूत्रपिंडातील सजीव पेशीसमूह शस्त्रक्रियेने वेगळा करून तपासणे (Biopsy) म्हणजे काय?
मूत्रपिंडातील समान कार्ये करणार्‍या पेशींचा समूह सूक्ष्मदर्शकाखाली तपासणे म्हणजे Biopsy.

Renal Biopsy करावी लागण्याची खूण कोणती?
१) स्थिर असणार्‍या रूग्णांच्या लघवीमध्ये प्रथिन आणि/किंवा रक्त असणे.
२) कोणतेही कारण नसतांना अचानक मूत्रपिंडाचे कार्य बंद होणे.
३) मूत्रपिंडरोपणात काही नकारात्मक आहे का हे पाहण्यासाठी.

Renal Biopsy कशी केली जाते? तेव्हा संपूर्ण भूल देण्याची गरज असते का?
Ultrasound च्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेची सुई मूत्रपिंडात घातली जाते. बहुतेक वेळा यामध्ये संपूर्ण भुल देण्याची गरज नसते, आणि स्थानिक भूल देऊन ते करता येते. रूग्णाला पोटावर झोपविण्यात येते. अल्ट्रासाउंडच्या मदतीने मूत्रपिंड शोधले जाते स्थानिक भूल देण्यात येते आणि सुई जोपर्यंत मूत्रपिंडाच्या पृष्ठभागाला लागत नाही तोपर्यंत आत घातली जाते.

मूत्रपिंडाला या शस्त्रक्रियेसाठी काही निषिध्द गोष्टी आहेत का?
एकच मूत्रपिंड असणार्‍या आणि जेथे रक्तस्त्राव किंवा उच्च रक्तदाब आहे, अशावेळी ही शस्त्रक्रिया निषिध्द आहे.

या शस्त्रक्रियेत काही गुंतागुंत निर्माण होते का?
रक्तस्त्राव ही सगळ्यात महत्वाची निर्माण होते, किंवा ५ ते १० रूग्णांमध्ये रक्ती लघवी दिसून येते, जी साधारण २४ ते ४८ तासात बंद होते. क्वचितच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो ज्यामुळे रक्त द्यावे लागते.

ही शस्त्रक्रिया कशी दिसते?
Hematoxylyn आणि Eosin करून मूत्रपिंडाचे तुकडे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले जातात. काही वेळा गरज असल्यास विशिष्ट रंग वापरले जातात. रक्तात निर्माण केले जाणारे रोगप्रतिबंधक पदार्थ Antibody आणि हे पदार्थ निर्माण करण्य़ासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ Antigen पाहण्यासाठी Immunofloresenace केले जाते. विद्युत सूक्ष्मदर्शकामुळे मूत्रपिंडाचे लवचिक आवरण दिसू शकते.