Print
Hits: 6330

४० वर्षापूर्वी मूत्रपिंड रोपण केले गेले आणि तेव्हापासून मोठ्या संख्येने मूत्रपिंड रोपण केले जात आहे. संसर्गास दाद न देणार्‍या घटकांमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. मूत्रपिंड शरीराकडून नाकारले जाऊ नये, यासाठी यांचा उपयोग होतो.

मूत्रपिंड रोपणाचे कोणते विविध प्रकार आहेत?
Living Related (जिवंत नातेवाइकांशी रक्ताचेसंबंधित)
यात मूत्रपिंड दान करणारा रूग्णाचा भाऊ, बहीण, वडील किंवा आई असतात.
Livinag Unrelated (रक्ताचे नाते नसलेल्या जिवंत नातेवाइकांशी संबंधित)
यात मूत्रपिंडात करणारा रूग्णाचा पती/पत्‍नी, मित्र किंवा त्या समाजाचा एखादा सदस्य असतो.
Cadeveric (शवतुल्य दाता)
ज्यांचा मेंदू मृत पावलेला असतो अशा व्यक्तीचे मूत्रपिंड घेतले जाते. यात त्या व्यक्तीची हृदयक्रिया सुरू असते पण मेंदूचे कार्य मात्र थांबलेले असते, ही लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे.
Non Heart Beating (हृदयक्रिया बंद असलेला दाता)
यात दात्याची हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मूत्रपिंड काढले जाते. पाश्‍चिमात्य देशांमध्ये Cadeveric Donation म्हणजे शवतुल्य मूत्रपिंड दानाचे जास्त प्राबल्य आहे. विकसनशील देशांमध्ये मूत्रपिड दानासाठी रक्ताचे नातेवाईक किंवा इतर जिवंत लोकांचे मूत्रपिंड वापरले जाते.

एखाद्या अवयवाचे दान करण्याचा कायदा करण्याची भारतात गरज का भासली?
मूत्रपिंड ची व्यावसायिक खरेदी करण्याच्या वृत्तीला आळा बसावा म्हणून कायदा केला गेला. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना त्यांचे मूत्रपिंड घेऊन अतिशय कमी रक्कम दिली जात असे. काही वेळेला तर असेही घडलेकी रूग्णाला माहिती नसताना त्याचे मूत्रपिंड काढले गेले. Non Heart Beating ला प्रोत्साहन मिळावे म्हणून या कायद्यात कोणत्या स्थितीत मेंदू मृत समजावा याचे मार्गदर्शन केले आहे.

मूत्रपिंड रोपणात रक्तगटाचे महत्व काय?
मूत्रपिंड रोपणात रक्तगट जुळणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. खालील मार्गदर्शक तत्त्वे उपयोगात आणली जातात.
पुढील रक्तगटाच्या जोड्या देखील चालू शकतात.

दाता ज्याला दान करायचे त्याचा रक्तगट
A A, AB
B B, AB
AB AB
O A, B, AB, O

Rh प्रकारच्या रक्तात समान रक्तगट असणे आवश्यक नाही. उदा. ए (अ) आईकडून ए (-) असलेल्या रूग्ण मुलीला.

मूत्रपिंड रोपणात ‘मूत्रपिंड जुळणे’ म्हणजे काय?
रक्तगट जुळणी बरोबरच HLA जुळणी देखील केली जाते. Human Leukocyte Antigens म्हणजे पांढर्‍या रक्तपेशींमध्ये जी प्रथिन असतात ते जवळच्या गुणसुत्रांचे उत्पादन असते. अशी १०० पेक्षा जास्त प्रथिन आहेत. ते वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागले जातात - A,B,C आणि D आणि DR या प्रत्येकासाठी उपसमूह जुळणी केली जाते.

काही एक जुळत नसताना मूत्रपिंड रोपण होऊ शकते काय?
अशी परिस्थिती येऊ शकते, तिला शून्य जुळणी म्हणतात. रोपण करणारे शल्यविशारद गरजेचे मूल्यमापन करतात आणी त्याप्रमाणे निर्णय घेतात.

Cadeveric मूत्रपिंड रोपण हे Living Related रोपणासारखेच चांगले आहे काय?
Living Related रोपणाचे चांगले फायदे दिसून येतात आणि नेहमी रोपणासाठी आधी याचा उपयोग करावा.

मूत्रपिंड रोपणासाठी वयाची काही अट आहे काय?
पाच वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील व्यक्तींवर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया केली जात नाही.

मूत्रपिंड दानासाठी वयाची आहे काय?
चार ते सत्तर वर्षे वयाच्या व्यक्तींकडून मूत्रपिंड स्वीकारले जाते. परंतु पंचावन्न वर्षे वयाच्या वरील व्यक्तींकडून मूत्रपिंड घेताना त्यांची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे.

मूत्रपिंड रोपण करण्यावर काही मतभेद आहेत काय?
खालील प्रकारच्या रूग्णांवर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करू नये
१) हृदयरोग असणारे (तीव्र)
२) फुफ्फुसांचे विकार असणारे (तीव्र)
३) ७५ पेक्षा जास्त वयाचे
४) कर्करोग (तीव्र)
५) अतिलठ्ठपणा असलेले
६) मद्य किंवा नशिल्या पदार्थांचे व्यसन असणारे
७) मूत्रपिंडदाह असणारे

मूत्रपिंडरोपणात मूत्रपिंडाचे कोणत्या जागी रोपण केले जाते?
साधारणपणे रूग्णाचे आधीचे मूत्रपिंड काढले जात नाही. जर संसर्ग झाला किंवा Ploysystic मूत्रपिंड रोग झाला तर मूत्रपिंड काढले जाते. रोपण करताना मूत्रपिंड उदरपोकळीत खालच्या बाजूला केले जाते. रोहिणी आणि शिरा किंवा नस एका मोठ्या वाहिनीत एकत्र येतात मुख्यत: नीलरक्तवाहिनीमध्ये.

मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रूग्णाचे काही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे काय?
होय. महत्वाची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खेळ किंवा इतर जड कामे टाळावीत. संसर्ग असणार्‍या रूग्णांपासून दूर रहावे. रूग्ण नेहेमीचे सामान्य आयुष्य जगू शकतो पण ताप आला किंवा इतर काही तक्रार असेल त्याबाबत जागरूक राहून लगेच मूत्रपिंड तज्ञाला कळविले पाहिजे.

मूत्रपिंड तीव्रतेने नाकारणे म्हणजे काय? (Acute rejection)
जेव्हा संसर्गास दाद न देणारी पध्दत (Immune system) रोपण केलेल्या मूत्रपिंडावर हल्ला करते, तेव्हा मूत्रपिंड नाकारण्याची स्थिती निर्माण होते.मूत्रपिंड रोपणानंतर पहिल्या ६ महिन्यात किंवा वर्षानंतर साधारणपणे अशी स्थिती निर्माण होते. यात कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन, रोपण केलेल्या मूत्रपिंड वेदना, ताप आणि Serum Cretaniym मध्ये वाढ झाल्याची तक्रार रूग्ण करतो.

मूत्रपिंड नाकारले जाण्यावर कोणते उपचार आहेत?
मूत्रपिंड तज्ञ साधारणत: मूत्रपिंड रोपणापूर्वी सजीव शरीरातील पेशीसमूह वेगळा करून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासतात (Biopsy) आणि नकाराची श्रेणी ठरवून त्याप्रमाणे उपचार करतात. नेहेमी वापरले जाणाते औषध म्हणजे Steroids, जर हे Steroids तितकेसे परिणाम कारक नसतील तर OKT3 जास्त घटक किंवा Monoclonal सारखे रोगप्रतिबंधक पदार्थ वापरले जातात.

मूत्रपिंड रोपण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची औषधे रूग्ण घेतो?
मूत्रपिंड रोपण झाल्यानंतर Rejection होऊ नये म्हणून रूग्णाला ती औषधे दिली जातात. तीन औषधे वापरली जातात. Cyclosporine, Prednisolon (Steroid), Mycopheno Latemofetil Mofetil किंवा Azathioprine.

मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णास कोणत्या प्रकारच्या संसर्ग होऊ शकतो? या प्रकारच्या रूग्णाची संसर्गाशी लढण्याची क्षमता/शक्ती कमी झालेली असते. खरं तर ७५ टक्के रूग्णांना रोपण झाल्यापासून पहिल्या वर्षात संसर्गाला सामोरे जावे लागते. या रूग्णांना होणारा संसर्ग सामान्यांना होणार्‍या संसर्गापेक्षा वेगळा असतो. पहिल्या महिन्यात होणारा संसर्ग Bacterial असतो. पहिल्या महिन्यानंतर अतिसूक्ष्म जीवाणूंचा (Viral Infections) संसर्ग होतो, जसे Ascytomegalo Virus, बुरशीचा संसर्ग, टी.बी - क्षय आणि कर्करोगजन्य रेणूचा संसर्ग.

मूत्रपिंड रोपणानंतर जगण्याचा दर किती असतो?
Living Related मूत्रपिंडात ८५ ते ९० टक्के असतो आणि Cardaveric मध्ये ८० टक्के असतो.

मूत्रपिंड रोपणात उपयोगात आणल्या जाणार्‍या औषधांचे दुष्परिणाम असतात का?

  1. बराच काळ Steroids घेतल्याने उच्च रक्तदाब, वजन वाढणे, साखरेच्या प्रमाणात जास्त वाढ, Cushings Syndrome, मोतीबिंदू, आणि फॅक्चर इत्यादी.
  2. Cyclosporin चे देखील दुष्परिणाम असतात जसे उच्च रक्तदाब बळावणे - केसांची जास्त वाढ आणि Gingival ची वाढ, मूत्रपिंडासाठी हे औषध विषारी ठरू शकते. जर त्याची पातळी व्यवस्थित राखली गेली नाही.
  3. Cell Cept मुळे अस्थिमज्जा दबल्या जातात आणि रूग्णाला पंडुरोग होऊ शकतो. पांढर्‍या रक्तपेशींची कमी संख्या किंवा Platelet ची कमी संख्या. Cell Cept मुळे अतिसार होऊ शकतो.