Print
Hits: 5787

मूत्रपिंड शरीराच्या कोणत्या भागात असते?
उदरपोकळीत छातीच्या समोर आणि पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला मूत्रपिंड असतात.

मूत्रपिंडाची सरासरी लांबी आणि वजन किती असते?
प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या मूत्रपिंडाचे वजन १३०-१७० ग्रॅम्स असते आणि लांबी साधारणपणे १०-१२ सेंटीमीटर असते.

मूत्रपिंडाचे दोन भाग केल्यास ते कसे दिसेल?
जर मूत्रपिंडाचे दोन भाग घेतले तर आतील भागाला मेड्युला म्हणतात आणि बाहेरच्या भागाला कोर्टेक्स म्हणतात आतील भाग - मेड्यूला १२ ते१८ त्रिकोणकृती गोळ्यांना बनलेला असतो त्याला पिरॅमिड म्हणतात. पिरॅमिडचे आरंभस्थान पोकळीतील गराच्या (Medulla) शेवटी आणि टेक ओटीपोटाच्या दिशेला असते. मूत्रपिंडामधील महत्वाचा कार्यगट जो गाळणीचे कार्य करतो तो बहुतांशी कोर्टेक्स मध्ये असतो.

मूत्रपिंडांना रक्ताचा पुरवठा कशाप्रकारे होतो?
प्रत्येक मूत्रपिंडाला एका रोहिणीद्वारे रक्तपुरवठा केला जातो, ती रोहिणी पाठीच्या बाजूला असणार्‍या मोठ्या रोहिणीमधून निघालेली असते. नंतर ही रोहिणी वेगवेगळ्या शांखांमध्ये विभागली जाऊन आतील बाजूस रक्त पोहचविते. तिचा शेवट केशवाहिन्या मध्ये होतो तिला Glomerulus (मूत्रपिंडातील महत्वाचा कार्यगट) या नावाने ओळखले जाते.

नेफ्रॉन म्हणजे काय?
मूत्रपिंडाचे कार्य करणारा घटक म्हणजे नेफ्रॉन. प्रत्येक व्यक्तीच्या मूत्रपिंडात साधारणपणे १,२०,००० नेफ्रॉन्स असतात. प्रत्येक नेफ्रॉन मूत्रपिंडातील महत्वाचा कार्यगट (Glomerulus) बोमॅन्स संपुट यांनी बनलेला असतो आणि छोट्या नळीला जोडलेला असतो. या छोट्या नळीत काही वेगवेगळे कार्य करणारे खंड असतात त्यांना (Proximal Tubule) जवळच्या छोटया नळ्या म्हणतात.

मूत्रपिंडाचे Mesangium म्हणजे काय?
केशवाहिन्यामधील जाळीमध्ये जे अंतर असते त्याला Mesangium असे म्हणतात.

मूत्रपिंडात मूत्र कसे तयार होत?
मूत्रपिंडामध्ये शरीरातील रक्तापैकी २५ टक्के रक्त हृदयातील येते किंवा १.१ लिटर रक्त दर मिनिटाला येते. ते रक्त रोहिणीमधून केशवाहिन्यांमध्ये येते आणि तेथून मूत्रपिंडातील महत्वाचे कार्य करणार्‍या केशवाहिन्यांमध्ये जाते. येथे जो दाब निर्माण होतो त्याला द्रव स्थैतिक दाब (Hydrostatic Pressure) म्हणतात. याचा परिणाम बोमॅन्स संपुटातील केशवाहिन्यांमधील रक्त गाळण्यात होतो. याला Glomerularfiltration म्हणतात.

बोमॅन्स संपुटातून नंतर ते छोट्या नळ्यांमध्ये जाते. या नळ्या मुख्यत: पाणी शोषून घेणे, आयन्स ची अदलाबदल याच्याशी संबंधित असतात. या सगळ्यांचा अंतिम परिणाम मूत्रनिर्मितीत होतो.

मूत्रपिंड कोणते कार्य करते?
शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे मध्यवर्ती कार्य मूत्रपिंड करते, त्याला Homeostasis असे म्हणतात.

शरीरातील विद्युत अपघट्याचे (Electrolyte) पोषण. शरीरातील रक्तदाब नियंत्रित करणे, चयापचय क्रियेतील निरूपयोगी पदार्थांचे उत्सर्जन करणे उदा. लघवीत आढळणारे पांढर्‍या रंगाचे स्फटिक (Urea), मूत्राम्ल, क्रिटिनिन, सल्फेट, फॉस्फेट इ. विषारी पदार्थांना बाहेर टाकणे, त्यांचा विषारीपणा दूर करणे, औषधे आणि त्यांचे चयापचय. इरीथ्रोपोटीला नावाच्या संप्रेरका मध्ये वाढ करून लाल रक्तपेशींचे उत्पादन नियंत्रित करणे, कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारख्या खनिज पदार्थांचे नियंत्रण.

यूरिया आणि क्रिटेनिन म्हणजे काय?
नेत्रयुक्त पदार्थांच्या चयापचय क्रियेतील यूरिया हा निरूपयोगी पदार्थ आहे. स्नायूंमध्ये जी प्रथिनं असतात. त्यांना क्रिटेनेन म्हणतात. त्यापासून क्रिटेनेन बनते आणि त्याचे मूत्रात उत्सर्जन होते.

रक्तात क्रिटेनेन आणि यूरिया यांची पातळी सामान्यपणे किती असते?
यूरिया - १५-४० mg/dl
क्रिटेनिन - ०.२-१.३ mg/dl

क्रिटेनिनेचे वाढलेले प्रमाण काय दर्शवते?
जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य थांबते, तेव्हा रक्तातील क्रिटेनिनची पातळी वाढते. रक्तजन क्रिटेनिन मूत्रपिंडाच्या कार्याचे मापक म्हणून वापरले जाते.

शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित करण्यात मूत्रपिंडाची कशी मदत होते?
‘ड’ जीवनसत्वाचा सक्रिय भाग मूत्रपिंडात तयार होतो. आतड्यातील कॅल्शियमचे शोषण नियंत्रित करणे हे त्याचे कार्य आहे.

मूत्रपिंडाचा आजार (Rrenal Failure) असणार्‍या रूग्णांमध्ये रक्ताल्पता का आढळते?
Erythropoeitin नावाचे संप्रेरक मूत्रपिंडाचे तयार होते. या संप्रेरकामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते. मूत्रपिंडाला आजार असणार्‍यांमध्ये या संप्रेरकाचे उत्पादन घटते आणि त्यामुळे या रूग्णांमध्ये रक्ताल्पता आढळते.

रेनिन - लॅन्जिओटेन्सिन पध्दती म्हणजे काय?
जेव्हा रक्तदाब सतत कमी होतो, तेव्हा मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो, तो मूत्रपिंडातील रेनिन (मूत्रपिंडात सापडणारे एन्जाइम) चे प्रमाण कमी करतो. हे रेनिन Angiotensin मध्ये परावर्तित होते.
Angiotensin चे परिणाम खालीलप्रमाणे:
१) ते रक्तवाहिन्यांना संकुचित करते, विशेषत: नसांना.
२) सोडियम आणि पाण्याला थांबविण्यासाठी, रोखण्यासाठी Aldosteronewhich ची मदत होते. त्यांचे प्रमाण वाढविणाय्साठी Angiotensin प्रेरित करते. अशा प्रकारे रक्तदाब नियंत्रित होतो.