Print
Hits: 5734

डायलेसीस म्हणजे काय?
सच्छिद्र पडदा वापरून द्रवामधील स्फटिक पदार्थ आणि द्रवभाग निरनिराळे करणे किंवा कृत्रिम गाळणी वापरून शरीरातील निरूपयोगी पदार्थ आणि जास्तीचे पाणी रक्ताभिसरणाद्वारे काढून टाकून पुन्हा शरीरात घालणे.

हेमोडायलेसीससाठी शरीरक्रिया सिध्दान्त कोणता?
उदा. अ द्रावणातून विद्राव्य द्रवामध्ये विरघळणारा पदार्थ व द्रावणात शरीरातील अंतर्गत अवयव व काही बाह्य अवयवांना गुंडाळून घेणारे जे पातळ लवचिक आवरण असते त्याला भेदून जाते, ही डायलेसीसची प्रक्रिया आहे.

पाण्याचे रेणू आणि लहान रेणू विद्राव्य द्रवामध्ये विरघळणारे पदार्थ दोन द्रावणातून लवचिक आवरणातून जातात, पण मोठे रेणू जसे प्रथिनं यातून जाण्यास आडकाठी येते. भिन्न घनतेचे वायू व द्रवपदार्थ एकमेकांत मिसळणे आणि Ultra Filtration या दोन यांत्रिक क्रियांचा डायलेसीस मध्ये समावेश असतो. विद्राव्य द्रवामध्ये विरघळणार्‍या पदार्थाची लवचिक आवरणाला भेदून जाण्यासाठी वरून - खाली द्रावाची तीव्रता वाढविण्यासाठी जी हालचाल होते तिला Deffusion असे म्हणतात.

भिन्न घनतेचे वायू व द्रवपदार्थ एकमेकात मिसळण्याचा दर खालील गोष्टींवर अवलंबून असतो?
१) कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियन्ट
२) रेणूचा आकार
३) पातळ, लवचिक आवरणाची जाडी आणि सच्छिद्र आकार

Ultra Filtration ही विद्राव्य द्रवामध्ये विरघळणार्‍या पदार्थाला वाहून नेण्याची दुसरी यांत्रिक क्रिया आहे. पाण्याचे रेणू अतिशय लहान असतात आणी भेदून जाण्यायोग्य पातळ, लवाचिक आवरणाला भेदून जाते तेव्हा Ultra Filtration होते. यात पाणी विद्राव्य द्रवात विरघळते याला विद्रावक असे म्हणतात.

डायलेसीस फिल्टर चे वर्णन करा.
हेमोडायलेसीसच्या साहित्यात डायलेसर असते. यात चार Uprots असलेली नळी असते. या नळीत पोकळ तंतूच्या स्वरूपात पातळ, लवचिक आवरण असते. ज्यातून रक्त वाहून नेले जाते. हे तंतू वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
नैसर्गिक तंतू: हे प्रक्रिया केलेल्या कापसातून तयार केले जातात अस Cellulose किंवा Cellulse Acetate
कृत्रिमरित्या बनविलेले तंतू: Polyacrylnitrilem, Polysulfone Polymethylmethacrylate.

हेमोडायलेसीससाठी कोणत्या प्रकरचे आवरण चांगले असते?
डायलेसीस चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृत्रिमरित्या बनविलेल्या तंतूचे आवरण वापरणे योग्य असते, तामुळे दुष्परिणाम झाल्याची फार कमी उदाहरणे आहेत.

एकदा वापरलेले आवरण पुन्हा वापरता येते का?
होय. पण फक्त त्याच रूग्णामध्ये ही पध्दत सुरक्षित आणि परिणामकारक असून ती जगभर वापरली जाते. डायलेसर पुन्हा वापरण्याची संख्या वेगवेगळी असते, पण डायलेसीस युनिट सगळीकडे सरासरी ५ ते १० च्या दरम्यान प्रत्येक डायलेसरसाठी पुन्हा वापरले जाते. वापरून झाल्यानंतर डायलेसर रासायनिक प्रक्रियेने जंतुनाशक केले जाते.

डायलेसर स्वच्छ करण्यासाठी कोणते घटक वापरले जातात?
हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा ब्लीच वापरून डायलेसर स्वच्छ केले जाते. एकदा स्वच्छ केल्यानंतर डायलेसर रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेतून गेले पाहिजे, त्यामुळे त्यातील सगळे जीवजंतू मरून जातात किंवा परिणाम शून्य होतात. Formaldehyde, Gluteraldehyde Mixture इत्यादी जंतुनाशके वापरली जातात.

डायलेसीसचे द्रावण कसे बनलेले असते?
डायलेसीससाठी लागणारे पाणी साधारणपणे नळातून घेतले जाते. हे पाणी शुध्द करून त्यात विद्युत अपघट्य (Eldctrolytes) मिसळले जातात. अशाप्रकारे डायलेसीस चे द्रावण तयार होते. या द्रावणात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट असतेच, विद्युत अपघट्य आधीच मिसळून ठेवावे आणि प्रत्येक मशीनमध्ये मध्यवर्ती पुरवठा केंद्राद्वारे पुरवावे किंवा प्रत्येक मशीनमध्ये विद्युत अपघट्य मिसळावे.

प्रत्येक डायलेसीसला किती पाणी वापरले जाते?
प्रत्येक डायलेसीस उपचारात १२० लिटर पाणी वापरले जाते.

डायलेसीससाठी पाणी वापरण्यापूर्वी ते शुध्द करून घेणे आवश्यक आहे काय?
होय. पाणी शुध्द करण्यासाठी ऍल्युमिनियम, कॉपर, क्लोरामाईन इत्यादी महत्वाचे घटक वापरलं जातात. नगरपालिके तर्फे पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात जंतूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्लोरामाईन नेहेमी वापरले जाते.

पाणी जंतुमुक्त असणे आवश्यक आहे काय?
पाणी पूर्णपणे निर्जंतुक करण्याची आवश्यकता नसते कारण डायलेसर मध्ये जे आवरण असते ते जंतू आणि अन्य विषारी पदार्थांना आडकाठी निर्माण करते. तरीही पाण्यात जंतूचे प्रमाण २००० colonies/ml च्या खाली ठेवावे, आणि मधून मधून पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया निर्जंतुक करावी.

डायलेसीससाठी पाणी शुध्द करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती कोणत्या?
पाणी शुध्द करण्याच्या पध्दती पुढीलप्रमाणे:

  1. परावर्ती अभिसरण (Reverseosmosis) पध्दतीत पाणी पातळ सच्छिद्र लवचिक आवरणातून ढकलले जाते. त्यामुळे लहान रेणूंमधील विद्राव्य द्रवात विरघळणार्‍या पदार्थांना अटकाव होतो. या पध्दतीत ९०% पेक्षा जास्त पाणी शुध्द होते आणि डायलेसीस साठी वापरता येते.
  2. चिकट सेंद्रीय पदार्थ आयन पाण्यातील Charged Iron दूर करते.
  3. काही डायलेसीस यंत्रातील डायलेसीस द्रावणात Ultra Filter तंतू वापरले असतात. त्यामुळे जंतू आणि विषारी पदार्थ पाण्यातून निघून जातात.

डायलेसीस द्रावणाची तीव्रता कशावरून ठरवावी?
डायलेसीस सुरू होण्याआधी द्रावण जास्त तीव्र नाही किंवा सौम्य नाही हे डायलेसीस यंत्र स्वत:च तपासते याबरोबर द्रावणाचे तापमान देखील यंत्र तपासते.

डायलेसीस साठी रक्त शरीराबाहेर कसे घेतले जाते?
या प्रक्रियेत कॅथेटरद्वारे किंवा नळीसारखा एखादा अनैसर्गिक मार्ग तयार करून रक्ताभिसरणात जाण्याची वाट केली जाते. याला Vascular Access म्हणतात.

या रबरी नळ्या किती काळ वापराव्यात?
साधारणपणे या नळ्या जास्तीत जास्त चार आठवडे वापराव्यात, ज्यामुळे कायमचा मार्ग तयार होणासाठी वेळ मिळतो. सिलिकॉनच्या रबरी नळ्या (Permacath) जास्त काळासाठी म्हणजे ६ ते १२ महिन्यांपर्यंत वापरता येतात.

कॅथेटर घालण्यासाठी संपूर्ण भूल देण्याची गरज आहे का?
कॅथेटर घालण्यासाठी संपूर्ण भूल देण्य़ाची गरज नाही

कॅथेटर घालण्याच्या प्रक्रियेत काही गुंतागुंत निर्माण होते का?
रक्तस्त्राव, फुफ्फुसाला किंवा नसांना इजा पोहचू शकते. अनुभवी डॉक्टर असेल तर अशाप्रकारची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. जर कॅथेटरमध्ये संसर्ग निर्माण झाला असेल तर तो काढून टाकणे आवश्यक आहे.

अनैसर्गिक मार्ग तयार करणे म्हणजे काय?
(Fistula चा खरा अर्थ भगंदर असा आहे, परंतु येथे तो अनैसर्गिक मार्ग तयार करणे या अर्थाने घेतला आहे). रोहिणी आणि रक्तवाहिनी यांना जोडाणारा हा मार्ग आहे, ज्यामुळे रक्तवाहिनी मोठी आणि जाड होते, त्यामुळे डायलेसीससाठी सुई आत घालता येते. हा मार्ग Fistula साधारणत: Mnon Dominant ar मध्ये तयार केला जातो. म्हणजे स्वत:ला डायलेसीस करता येते आणि एखादी अडचण निर्माण झाल्यास त्याचे परिणाम रोखता येतात.

हा अनैसर्गिक मार्ग किती दिवस वापरता येतो?
जोपर्यंत तो काम करतो आहे तोपर्यंत AV Fistula हा सुरक्षित आणि दीर्घकाळ चालणारा कायमचा मार्ग आहे.

अनैसर्गिक मार्ग केव्हा तयार करावयाचा?
हेमोडायलेसीस करायच्या २ ते ३ महिने आधी AV Fistula तयार केला पाहिजे. जुनाट मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णाचे मूल्यमापन करतांना हात सुरक्षित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. याचा अर्थ, रक्त काढण्यासाठी किंवा औषधे देण्यासाठी हाताच्या रक्तवाहिनीत सुई घालायची नाही.

Fistula तयार केल्यानंतर किती लवकर तो वापरात आणला पाहिजे?
मार्ग तयार केल्यानंतर तो पक्व होण्याची वाट पाहिली पाहिजे. पक्व होण्याचा कालावधी साधारण ४ ते ८ आठवड्यापर्यंत असतो. कमीत कमी ४ आठवडे तर वेळ दिला पाहिजे. १५ ते १६ गेजच्या सुयांनी छिद्र पाडले जाते.

रोपण Graft म्हणजे काय?
जेव्हा नळी घालण्यासाठी अनैसर्गिक मार्ग (Fistula) तयार करणे शक्य नसते. तेव्हा कृत्रिम साहित्य वरून तयार करणे शक्य नसते, तेव्हा कृत्रिम साहित्य वापरून तयार केलेली नळी रोहिणी आणि रक्तवाहिनी यांना जोडण्यासाठी वापरली जाते. यात संसर्ग आणि गुठळी होण्याची शक्यता जास्त असते.