Print
Hits: 5789

आपण मज्जासंस्थेचे दोन भाग करुयात. मेंदू आणि मज्जारज्जू. पन्नाशी हा आयुष्यातला एक असा टप्पा आहे की तीशी आणि चाळीशीत झालेली धावपळ आपल्याला जाणवायला लागलेली असते आणि त्याचं हळूहळू व्याधीत रुपांतर व्हायला लागलं असतं. पन्नाशी नंतर मज्जासंस्थेच्या अनुशंगानी आपल्याला कोणत्या कोणत्या व्याधींबद्दल जागरूक असावं लागेल हा आपला आजचा विषय आहे. या मधे लकवा, ज्याला म्हणतात पॅरालिसिस, जो रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे होतो; आणि दुसरा म्हणजे बुद्धीभ्रंश. आणि मणक्यांमधे स्पॉंडिलोसिस - मानेचा आणि कमरेचा या दोन्ही विषयी आपण माहिती घेऊयात.

मानेचा स्पॉन्डिलोसिस, कमरेचा स्पॉन्डिलोसिस, मानेच्या रक्तवाहिन्यांमधील खराब्या, आणि बुद्धीभ्रंश या चारही गोष्टी समाजात खूप प्रमाणात आढळतात. आज आपल्या घरात, शेजारच्या घरात आपण ह्या तक्रारी ऐकत असतो आणि का माहित नाही, पण आपण काणाडोळा करतो. असे दुर्लक्ष अजिबात करू नये! ह्यासाठी कराव्या लागणा-या तपासण्यांपैकी कुठल्याही तपासण्या महाग नाहीत, औषढे महाग नाहीत, पण जागरूकता आणि थोडी शिस्त ह्याची आपल्या समाजात खूपच गरज आहे. ही शिस्त आपल्या समाजात खूपच अभावाने आढळते. समाजाचं स्वास्थ्य जर वाढलं तर तेच डॉक्टरांचं काम चोख केल्याची पावती आहे.

आपण न्यूरॉलॉजीतील तीन महत्त्वाच्या विषयांची माहिती घेणार आहोत:

  1. मेंदूतील रक्तपुरवठा
  2. बुद्धीभ्रंश
  3. मणके आणि मज्जारज्जू
(स्त्रोत - सकाळ)