Print
Hits: 5540

वेदना निवारण कशासाठी?
आपण कधी स्वत:ला विचारले आहे, "वेदना निवारणासाठी मला दुस-या डॉक्टरची गरज काय?" ज्यांना वर्षानुवर्ष एखाद्या जुन्या वेदनेचा त्रास असतो ते अनेक स्पेशिआलिस्ट्सना भेटून येतात. न्युरॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स थेरापेटिक्स, सायकॉलॉजिस्ट इत्यादींना भेटून आले तरीही कधी कधी त्यांच्या वेदनेत काहीच फरक पडत नाही. त्या व्यक्ती वेदनेसहीत जगत रहातात. नंतर नंतर त्यांना काय करावे कळेनासे होते. ह्यासाठी वेदना तज्ञांना भेटणे महत्त्वाचे असते. सर्वप्रथम वेदनेचे कारण आपले आपल्याला समजणे महत्त्वाचे असते. ते समजले तर उपचाराचा मार्ग सापडणे सोपे होऊ शकते. हे पृथ्थकरण एम.आर.आय, एक्स रे, अशा इतर चाचण्यांइतकेच महत्त्वाचे असते. स्वत:च स्वत:च्या शरीराला दिलेली आश्वासने, सूचना आणि मुल्यांकन हे अतिशय महत्त्वाचे असते. पण शेवटी काहीच फरक पडला नाही, तरी त्या वेदनांचा स्वीकार करून त्या सहित जगणे हाच मार्ग आपल्याला स्वीकारावा लागतो. त्या सकारात्मक स्वीकारामुळे आपल्या शारिरीक आणि मानसिक प्रकृतीत नक्कीच फरक पडतो.

लक्षात ठेवा: जुनाट वेदना (क्रॉनिक पेन) खरे तर जुनाट नसतात पण त्या यातनांसहीत जगणे मुश्किल होऊन बसते. वेदना कितपत प्रतिबंधित होऊ शकतात? वेदना निवारणामधे औषधोपचार, इंजेक्शन, नर्व्ह ब्लॉक, फिझिकल थेरपी, बायोफ़ीडबॅक, ऍक्युपंक्चर असे अनेक उपचार येतात. वेदना प्रतिबंधामधे सहसा एकापेक्षा जास्त प्रकारचे उपचार सुचवले जातात.