Print
Hits: 6269

शरीराच्या कार्याविषयीचा विद्युतीय अभ्यास
विद्युतीय अभ्यास
आपल्या शरीरातील इतर अवयवांसारखे हृदयदेखिल स्वत:वर नियंत्रण ठेवू शकते. ते धडधडण्यासाठी मेंदूच्या संदेशाची वाट पहात नाही. हृदयात त्याची स्वत:ची विद्युत पध्दती असते (याला वहन पध्दती असेही म्हणतात), जी हृदयाच्या ठोक्यांचा दर आणि त्यांची गती निश्चित करते.

सोडियम आणि पोटॅशियम हृदयाच्या वहन पध्दतीत अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जेव्हा सोडियम आणि पोटॅशियमचे आयन्स्‌ हृदयातील पेशीभित्तीमधून जातात तेव्हा Electrical Impulses निर्माण होतात. या हालचालीमुळे पेशींच्यात बदल होतो, त्याचा परिणाम Eletrical Impulses तयार होण्यात होतो. हृदयातील काही विशिष्ठ पेशी हा विद्युत भारीत प्रवाह हृदयात नियोजित मार्गाने पाठविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असतात. या विशेष पेशी हृदयात अदृश्य विद्युत मार्ग निर्मांण करतात. विद्युतभारीत प्रवाह या मार्गाने जात असताना, हृदयातील स्नायू रक्त पंप करून त्याला प्रतिसाद देत असतात.

हृदयातील विद्युत पध्दतीमध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. हृदयात जेथून विद्युतभारीत प्रवाह सुरू होतो आणि/किंवा ज्या मार्गाने हा प्रवाह जातो. तेथे हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. यामुळे वहन पध्दतीत अडथळा निर्माण होतो, त्याला Arrhythmicy असे म्हणतात. हृदयातील विद्युत वहन पध्दतीचे विद्युतहृदलेखाद्वारे निरीक्षण केले जाते.

शरीराच्या कार्याविषयीचा विद्युतीय अभ्यास
इलेक्ट्रोफिजियॉलॉजीचा अभ्यास
आपल्या शरीरातील इतर अवयवांसारखे हृदयदेखिल स्वत:वर नियंत्रण ठेवू शकते. ते धडधडण्यासाठी मेंदूच्या संदेशाची वाट पहात नाही. हृदयात त्याची स्वत:ची विद्युत पध्दती असते (याला वहन पध्दती असेही म्हणतात)

इलेक्ट्रोफिजियॉलॉजी (EP) ही हृदयाच्या कार्याविषयी व रोगांविषयी अभ्यास करणारी विशेष पध्दत आहे, यात हृदयाच्या पोकळीतून हृदयाच्या विद्युतकार्याची नोंद केली जाते. इलेक्ट्रोफिजियॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी विद्युतभारीत नळ्या (लांब लवचिक तारा) नसांमध्ये घातल्या जातात आणि क्ष-किरणांच्या मदतीने त्यांचा अभ्यास केला जातो.

हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा अभ्यास करण्यासाठी या पध्दतीचा वापर केला जातो. हा अभ्यास म्हणजे निदान परीक्षा आहे ज्यात औषधांच्या सहाय्याने कोणती पध्दत उत्तम आहे हे पाहिले जाते तसेच Radio Frequency Ablation.


अभ्यासातील धोके
या प्रकारच्या कोणत्याही पध्दतीत शरीरात कॅथेटर घालावे लागते जे धोक्याचे वाटते, पण हा धोका तसा कमी प्रमाणात असतो आणि क्घ चा अभ्यास त्यामानाने कमी धोक्याचा आहे. काही रूग्णांना कॅथेटर लावलेल्या ठिकाणी रक्तस्त्राव होतो. फार क्वचित हृदयाच्या पोकळीत रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, किंवा वाहिन्यांना जखम होते किंवा हृदयाच्या झडपेत जखमा होतात. इलेक्ट्रोफिजियॉलॉजीचा अभ्यास सुरू असतांना किंवा त्याच्याशी संबंधित मृत्यूचे प्रमाण अगदी क्वचित आढळते. तीन हजारात एकापेक्षा देखील कमी. इलेक्ट्रोफिजियॉलॉजीचा अभ्यास करत असतांना चार ते सहा तास आडवे पडून रहावे लागते, आणि रूग्णाला पुढल्या औषधोपचारासाठी दाखल करून घेतले जाते किंवा लगेच सोडून दिले जाते हे तपासणीच्या निकालावर अवलंबून असते. हृदयाचे ठोके अतिशय जलद गतीने पडणे (Supraventricular Tachycardia) जेव्हा हृदयाचे ठोके नॉर्मलपेक्षा जास्त पडतात तेव्हा त्याला Tachycardia म्हणतात. हे प्रमाणापेक्षा जास्त जलद गतीने पडणारे ठोके जेव्हा हृदयाच्या वरच्या भागावर परिणाम करतात, तेव्हा त्याला Supraventricular Tachycardia असे म्हणतात.

यातील नेहेमी आढळून घेणारा प्रकार म्हणजे Atrioventricular (AV) node reentry: दोन विभिन्न विद्युतभारीत AV node क्षेत्रात जातात आणि अनियमित, नियमित हृदयाच्या ठोक्यांवर परीणाम करतात.

Wolff-Parkinson-White syndrome हे असे सहाय्यक कॉम्बीनेशन आहे जे Atria पासून हृदयाच्या पोकळीपर्यंत (ECG वर डेल्टा लहरी निर्माण करून) मार्ग निर्माण करते आणि मग हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात, उत्तेजित होतात. फक्त या ठोक्यांमुळे जी लक्षणे निर्माण होतात, त्याशिवाय दुसरे कोणतेही दीर्घकालीन परिणाम Wolff-Parkinson-White Syndrome मध्ये दिसत नाहीत.

अतिजलद ठोके नियंत्रित करणारे स्वयंचलित उपकरण हे असे उपकरण आहे जे रूग्णाच्या छातीच्या वरच्या बाजूस बसविले जाते. विद्युतभारीत तार नसेमार्फत हृदयाचा उजव्या बाजूच्या पोकळीत घातली जाते. जेव्हा हृदयाच्या ठोक्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तेव्हा या तारेद्वारे विद्युत झटके दिले जातात. ज्या लोकांचे हृदयाचे ठोके अतिजलद पडत असतील, पूर्वी हृदयाचा झटका आला असेल, हृदयात बिघाड झाला असेल आणि शस्त्रक्रिया करावी लागली असेल, यात बायपास आणि झडप बदलणे समाविष्ट आहे, अशा लोकांसाठी हे उपकरण वापरले जाते.

ऑपरेशनच्या खोलीत हे उपकरण बसविले जाते आणि आता ते सामान्य भूल देऊन केले जाते. काही केसेस मध्ये Intravenous उपशमना बरोबर भूल दिली जाते. शल्य चिकित्सक गळपट्‌टीच्या हाडाजवळ डाव्या बाजूला छेद देतो आणि तेथे Pulse Generator Pocket ठेवतो. त्यावेळी इलेक्ट्रोफिजियॉलॉजिस्ट विद्युतभारीत शिसं घालतो, यात हृदयाकडून येणारे संदेश ग्रहण करण्याची क्षमता असते, आणि शिशाची टोकं व ठोके नियंत्रित करणारे स्वयंचलित उपकरण यांत विद्युत झटके पोहचविण्याची क्षमता असते.

शस्त्रक्रिया करतेवेळी हे उपकरण (Device) योग्य प्रकारे बसविले गेले आहे की नाही आणि ते तत्परतेने आणि योग्य प्रकारे प्रतिसाद देते की नाही याची तपासणी केली जाते. या तपासणीच्या वेळी रूग्णाला बचावासाठी बाहेरून विद्युत झटका देण्याची गरज भासू शकते. या अभ्यासा दरम्यान रक्तदाब, प्राणवायुचा पुरवठा इत्यादीवर सतत लक्ष ठेवले जाते. या पध्दतीचा उपयोग केल्याने रूग्ण रूग्णालयात २४ ते ४८ तासात बरा होऊ शकतो. त्याला (रूग्णाला) नसेतून बॅक्टेरिया प्रतिबंधक औषधे दिली जातात, क्ष-किरण तपासणी केली जाते.

कायमचा पेसमेकर
ज्या लोकांच्या हृदयाचे ठोके अगदी हळू पडतात किंवा अनियमित पडतात, त्यांचे ठोके नियमित करण्यात पेसमेकर ची मदत होते. पेसमेकर हळू पडणाऱ्या ठोक्यांना जलद करतो आणि अनियमित ठोक्यांना नियमित करतो.

पेसमेकर पध्दतीचे दोन भाग आहेत: धातूच्या लहान तुकड्याला Pulse Generator आणि इन्सुलेटेड तारेला शिसे असे म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर्स आहेत आणि ते बसविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

तुमचा हृदयरोगतज्ञ तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुमची परिस्थिती (शारीरिक) पाहून ठरवेल.

पल्स जनरेटर हे एक विद्युत उपकरण आहे ज्यात बॅटरी आहे, विद्युत वहन पध्दती आहे आणि शिसं जोडण्यासाठी मार्ग आहे. पल्स जनरेटर इलेक्ट्रिक संदेश निर्माण करते, शिशाद्वारे तो संदेश हृदया पर्यंत पोहचविला जातो आणि धडधडण्यासाठी हृदयाला उत्तेजित केले जाते. हे उपकरण छातीच्या वरच्या भागाच्या त्वचेखाली भूल देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. रूग्णाच्या परिस्थितीप्रमाणे त्याला पेसमेकर बसविला जातो. ही ऍडजस्टमेंट संगणकाद्वारे केली जाते.

रूग्णाने रोज त्याच्या स्पंदनाची नोंद घेतली पाहिजे. काही वर्षांपासून पेसमेकर्स बनविले जात आहेत. हृदयाच्या ठोक्यांमध्ये येणाऱ्या विशिष्ठ अडथळ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून रेडियो फ्रिक्वेन्सी ऍबलेशन (RFA) या उपचारपध्दतीची निवड केली जात आहे. उच्च फ्रिक्वेन्सीच्या रेडियो लहरी उष्णतेने हृदयाच्या ज्या भागातून Arrthythmia निर्माण होतो, तेथील भाग जाळून टाकतात.रेडियो फ्रिक्वेन्सी ऍबलेशन
हृदय व रक्तवाहिन्यांच्या रोगासंबंधी नेहेमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे
हृदय व रक्तवाहिन्यांचे रोग म्हणजे नक्की काय आणि धोक्याचे घटक कोणते आहेत?
उत्तर - हृदयात आणि रक्तवाहिन्यांमध्ये जे अडथळे निर्माण होतात, त्यांचा या रोगांमधे समावेश होतो
यातील धोक्याचे घटक खालीलप्रमाणे

हृदयरोगास प्रतिबंध करण्यासाठी मी काय करावे?
उत्तर - सर्वात आधी धूम्रपान बंद करा. आधी स्वत: प्रयत्‍न करा किंवा डॉक्टरांची मदत घ्या. तुमच्या डॉक्टरांना नेहेमी मधुमेह आणि उच्च रक्तदाब घातक घटकांची तपासणी करण्यास सांगावे. कोलेस्टेरॉल बंद करा, तुमच्या आहारातून स्निग्ध पदार्थ कमी करा, व्यायाम करा आणि योग्य वजन राखा.
हृदयरोगास प्रतिबंध करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत?
उत्तर - हृदय आणि रक्तवाहिन्या तंदुरूस्त राहण्यासाठी रोज नियमित आणि माफक प्रमाणातील व्यायाम सहाय्यकारी ठरतील. योग, पोहणे, जलद चालणे, धावणे किंवा सायकल चालविणे यामुळे हृदय सशक्त बनते. २० ते ३० मिनिटे माफक प्रमाणातील व्यायाम आठवड्यातून ३ ते ५ वेळा करावेत अशी शिफारस केली आहे.
कोणत्याही वयात व्यायाम उत्तम आहे, परंतु नियमित व्यायाम सुरू करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रक्ताभिसरणातील दोषामुळे रक्तसंचय होऊन हृदयक्रिया बंद पडणे म्हणजे काय?
शरीरातील पेशीसमुहाला रक्त आणि प्राणवायुचा पुरवठा करण्यासाठी जेव्हा हृदय त्याची पंपिंग क्रिया व्यवस्थित करू शकत नाही तेव्हा रक्ताभिसरणातील दोषामुळे हृदयक्रियेत अडथळा निर्माण होतो.
असंख्य घटकांमुळे रक्ताभिसरणातील दोषामुळे रक्ताचा संचय होऊन हृदयक्रिया बंद पडू शकते.
जुनाट उच्चरक्तदाब, हृदयातील शुध्द रक्तवाहिन्यांचे रोग, जन्मत:च हृदयरोग असल्यास, झडपेचे रोग, अतिजलद किंवा अति हळू गतीने हृदयाचे ठोके पडणे
हृदयक्रियाबंद पडण्याचा एकच प्रकार आहे काय?
उत्तर - हृदयक्रिया बंद पडण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत - हृदयस्नायूंच्या आकुंचनासंबंधी (Systolic) आणि हृदय प्रसरणाविषयी (Distolic). याची लक्षणे आणि परिणाम रूग्णामधे भिन्न दिसून येतात.

  1. हृदयस्नायूंच्या आकुंचनामुळे हृदयक्रिया बंद पडणे (Systolic) - जेव्हा हृदयांची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होते, तेव्हा हृदयक्रिया बंद पडते. हृदय योग्य वेगाने रक्ताभिसरण पध्दतीत रक्त पोहचवू शकत नाही. फुफ्फुसांमधून हृदयात जे रक्त येते ते हृदयापर्यंत न पोहचता फुफ्फुसांमधुन गळून जाते, या परिस्थितीला फुफ्फुसांशी संबंधित रक्तसंचय होणे असे म्हणतात.
  2. हृदयस्नायूंच्या प्रसरणामुळे हृदयक्रिया बंद पडणे (Diastolic) - जेव्हा शिथिल होण्यास हृदयात त्रास होतो, तेव्हा हृदयक्रिया बंद पडते. हृदयाचे स्नायू ताठर झाल्यामुळे हृदयास व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे त्याची प्रसरण पावण्याची क्षमता नष्ट होते. यामुळे पावलांमध्ये, घोट्यांमध्ये आणि पायांमध्ये रक्तसंचय होतो. काही रूग्णांमध्ये फुफ्फुसात रक्तसंचय होतो.

हृदयक्रिया बंद पडण्याची लक्षणे कोणती?
उत्तर - हृदयक्रिया बंद पडण्याची बरीच लक्षणे संबंधित आहेत पण एखादेच कारणीभूत ठरू शकते असे नाही. सगळ्यांना माहिती असलेले लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. कष्टश्वास. फुफ्फुसात जास्त स्त्राव झाल्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. आराम करत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. काहींच्या बाबतीत हे खूप तीव्र असते ज्यामुळे झोपमोड होऊ शकते. थकवा येणे किंवा शीण जाणवणे हे दुसरे सामान्य लक्षण आहे. हृदयाची पंपींग क्षमता कमी झाल्यामुळे स्नायूंना आणि इतर पेशींना ऑक्सिजन आणि पोषक पदार्थ कमी प्रमाणात मिळतात. पुरेसे इंधन मिळाल्याशिवाय शरीर काम करू शकत नाही. त्यामुळे थकवा येतो. स्त्राव जमा होणे किंवा पाणथळ यामुळे पावलं, घोटे, पाय यांना सूज येते आणि कधी कधी उदरपोकळीतदेखिल सूज येते. जादा स्त्राव शरीरात साठून राहिल्याने त्याचा परिणाम वजन वाढण्यात होतो.

दीर्घकालीन खोकला हे आणखी एक सामान्य लक्षण आहे. विशेषतः असा खोकला ज्यात सतत श्लेष्मा निर्माण होतो किंवा रक्तयुक्त कफ पडतो. काही लोकांच्या घशात श्वास घेताना घरघर असा आवाज येतो. हृदयक्रिया बंद पडण्याची क्रिया हळुहळू सुरू असते, त्यामुळे काही वर्ष झाल्याशिवाय लक्षण दिसत नाहीत खालील प्रश्न निर्माण झाल्यास हृदय ऍडजस्टमेंट करून उशीर करू शकते, पण पंपींग क्षमतेला जो हास होत असतो, त्यास प्रतिबंध करू शकत नाही. हृदय हृदयक्रिया बंद पडण्याच्या परिणामांना लपवून तीन मार्गाने त्यांना तोंड देते.

  1. विस्तार करणे, ज्यामुळे हृदयात जास्त रक्तपुरवठा होतो.
  2. स्नायुंच्या तंतूंना घट्‍ट करणे, त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत बनतात, त्यामुळे हृदय जास्त वेगाने आकुंचन पावते आणि जास्त पंप करते आणि त्यामुळे रक्ताभिसरण वाढते.

हृदयक्रिया बंद पडू नये म्हणून कोणत्या प्रकारची औषधे उपयोगी ठरतात?
उत्तर - सगळी औषधे प्रत्येक रूग्णासाठी उपयोगी ठरतीलच असे नाही आणि एकापेक्षा जास्त औषधांची देखील गरज भासू शकते. मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणारी औषधे शरीरातील जादा स्त्राव बाहेर टाकतात आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांना तसेच ज्यांच्या शरीरातील जादा स्त्राव पूर्णपणे बाहेर टाकले जात नाहीत त्यांना उपयोगी पडते.
ACE inhibitors रक्तवाहिन्यांना आकुंचित करणाऱ्या रसायनांचे उत्पादन थांबविते. या औषधांना प्राणवायू कमी प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे हृदयाचे दृद्वद्यद्रद्वद्य वाढते आणि मापक प्रमाणात डाव्या बाजूच्या पोकळ्या आणि नलिकांमध्ये वाढ होते.

Digitalis हृदयाच्या आकुंचनाचा वेग वाढविते. हे औषध जलद पडणाऱ्या ठोक्यांना नियंत्रित करते. त्यामुळे ठोके कमी वेगाने पण जास्त कार्यक्षम होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात रक्त सोडतात.

Hydralazine. हे औषध रक्तपेशींचे प्रसरण करतात आणि रक्तप्रवाह सुरळीत करतात.

Nitrates. हे औषध मुख्यत: छातीत होणाऱ्या वेदनांसाठी वापरले जाते, पण हृदयक्रियाबंद पडण्याची लक्षणे नाहीशी करण्यासाठी सुध्दा यांचा उपयोग होऊ शकतो. हे स्नायू शिथिल करणारे आणि रक्तवाहिन्या मोठ्या करणारे औषध आहे. आकुंचनामुळे जो रक्तदाब वाढतो तो कमी करण्यास हे औषध उपयोगी पडते.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची कारणे कोणती?
ज्या रोगामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, त्या रोगास धमन्यांच्या आवरणास ग्रासणारा रोग असे म्हणतात. काही वर्षात कोलेस्टेरॉल, रक्त आणि पित्तामध्ये आढळणारा वासरहित स्निग्ध पदार्थ आणि इतर पदार्थ रक्तवाहिन्यांच्या भितींमध्ये साठू लागतात, यांना प्लाक असेही म्हणतात,
यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. काहीवेळा रक्तवाहिनी १०० टक्के बंद होते, कारण सॉफ्ट अशी रक्ताची गुठळी कोलेस्टेरॉल टणक गुठळीवर तयार होते. अशाप्रकारे रक्तवाहिनी १०० टक्के बंद दोन पध्दतीने होते.

  1. वर्षानुवर्ष पदार्थ साठत राहणे
  2. तीव्र पध्दती म्हणजे रक्ताची गुठळी होणे

कॉरोनरी अँजियोग्राफी किंवा कार्डियाक अँजियोग्राफी हा शुध्द रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा अभ्यास आहे. यात लवचिक नळी हृदयास घातली जाते. क्ष-किरणांद्वारे रक्तप्रवाहाचा अभ्यास केला जातो.

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने व्यवस्थित रक्ताभिसरण होत नाही त्यामुळे अनेक रक्तवाहिन्यांनी युक्त असलेल्या भागात दोष निर्माण होतात. हे अडथळे कॉरोनरी रक्तवाहिनीत असू शकतात (ही रक्तावाहिनी हृदयाला रक्तपुरवठा करते आणि हृदयरोगतज्ञच यावर उपाचार करतात), मानेची रक्तवाहिनी (जी मेंदूला रक्तपुरवठा करते), मानेच्या जवळील बगलेतील म्हणजे खांद्यापासून कोपरापर्यंतचा भाग (वरचा भाग-हात) आणि बरगड्या व कुल्ले यांच्या मधील उदराची बाजू, गुडघ्याच्या मागील पृष्ठभागात हे अडथळे असू शकतात. नसांमध्ये सुध्दा अडथळा निर्माण होऊ शकतो. जेव्हा आकुंचन होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

कोलेस्टेरॉल आणि निकोटिन साठणे, तणाव, मधुमेह आणि आयुमर्यादेत झालेली वाढ ही अडथळे निर्माण होण्याची सगळ्यात जास्त कारणे आहेत.
हातापायात झिणझिण्या येणे, मुंग्या येणे, चालल्यावर पाय दुखणे, हातापायातील हालचाल करण्याची शक्ती कमी होणे, अचानक दृष्टिदोष निर्माण होणे, ही रक्तवाहिनीत अडथळे निर्माण झाल्याची लक्षणे होत. कलर डॉपलर तपासणी ही Non - Invasive पध्दत आहे. ती ८० ते ८५ टक्के बरोबर असते त्यावरून किती रक्तवाहिन्यांमध्ये कितपत अडथळे निर्माण झाले आहेत याची कल्पना येते.