हृदयक्रिया बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे म्हणजे काय?
हृदयाचे स्नायू खराब होण/बिघडणे म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे/झटका येणे. हृदय रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात, त्यामुळे रक्ताभिसरण थांबून हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते.
जर हे रक्तभिसरण ६ तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्य त्या भागातले स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हार्ट ऍटक/हृदयक्रिया बंद पडणे असे म्हणतात. हृदयस्नायूंमध्ये रक्ताची गुठळी होणे (Myocardial Infraction) किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणे असेही म्हणतात. यात जर हृदयाच्या थोड्या भागावर परिणाम झाला असेल तर त्याला छोट्या प्रमाणातील हार्ट ऍटक आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला हृदयाचा तीव्र झटका असे म्हणतात.
रोहिणीमध्ये/रक्तवाहिन्यांमध्ये कशामुळे गुठळीतयार होते किंवा त्या कशामुळे बंद होतात?
ज्या रोगामुळे रक्तवाहिन्यांचे तोंड बंद होते त्याला धमन्यांच्या आवरणास ग्रासणार रोग Atherosclerosis असे म्हणतात. कोलेस्टेरॉल-रक्त आणि पित्तामध्ये आढळणारा पांढऱ्या रंगाचा वासरहित स्निग्ध पदार्थ रक्तवाहिनीच्या भिंतीमध्ये वर्षभरात ह्ळुहळू साठत जातो, आणि नंतर तो इतका साठतो की त्यामुळे रक्तवाहिनीची पोकळी कमी होउन रक्तवाहिनी चे तोंड बंद होते. या परिस्थितीत कधी कधी लक्षणे दिसून येतात तर कधी नाही दिसत. एखाद्या दिवशी कोलेस्टेरॉल च्या वर रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तवाहिनीचे तोंड १००ऽ बंद होते.
- हळुहळु कोलेस्टेरॉल साठत जाणे आणि,
- तीव्र गतीने रक्ताची गुठळी तयार होणे.
या अनुक्रमाने रक्तवाहिनीचे तोंड बंद होते.
अशाप्रकार फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात का?
धमन्यांच्या आवरणास ग्रासणारा रोग हा सामान्य असून तो शरीरातील कोणत्याही भागातील रक्तवाहिनी वर परिणाम करू शकतो. साधारणपणे प्रथम २.५ ते ४mm डायमिटर च्या दरम्यान असलेल्या रक्तवाहिनी वर परिणाम होतो. मेंदूत असणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास अर्धांगवायू किंवा मेंदूला झटका बसतो. हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्यास हृदयाचा झटका येतो. मूत्रपिंडातील रक्तवाहिनी चे तोंड बंद झाल्यास मूत्रपिंडात बिघाड होऊ शकतो. पायातील रक्तवाहिनी बंद झाल्यास पायाला गॅंगरीन होऊ शकते. अशाप्रकारे शरीरात कोठेही रक्तवाहिनी चे तोंड बंद होऊन त्या विशिष्ठ अवयवावर परिणाम होऊन त्याचा रक्तपुरवठा बंद होतो. साधारणपणे हृदयाच्या रक्तवाहिनी चे तोंड बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याखालोखाल मेंदूतील रक्तवाहिन्या आणि नंतर पायातील रक्तवाहिन्या.