आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • आजार आणि रोग
  • विशिष्ट आजार
  • हृदयविकार
  • हृदयविकाराची सद्यःस्थिती

हृदयविकाराची सद्यःस्थिती

  • Print
  • Email
Details
Hits: 9721
Page 1 of 2
Heart Blood Circulation हृदयाचे रक्क्ताभिसरण

जगातील आणि भारतातील या पुस्तकात हृदयविकाराच्या कोणत्या प्रकारचा विचार केला आहे. हृदय, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हृदय शस्त्रकिया हे आहेत. ‘हार्ट अटॅक’ (Heart Attack), हा शब्द तर मराठीच वाटावा इतका आपल्या भाषेत रूळला आहे.

टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांमधल्या बातम्यांकडे हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावलेल्या एखाद्या प्रसिध्द व्यक्तीसंबधीची बातमी अधीनमधून असतेच. आपले नातेवाईक, आपले परिचित यांच्यातही एखाद्याला हृदयविकाराचा झटका येण्याची, तर कधी त्यामुळे एखाद्याला मृत्यूसुध्दा येण्याची घटना अधूनमधून घडत असते.

एकंदरीत ‘हृदयविकार’ या रोगाला आपण टरकून असतो. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कधीही हृदयविकार होऊ नये अशी आपली मनोमन इछा असते. कारण हृदयविकार झाला तर अचानक झटक्यानं किंवा थोड्याच काळात म्रुत्यू ओढवणार अशी भीती आपल्या मनात असते. हृदयविकार म्हणजे आकस्मिक मृत्यू, आज नाहीतर थोड्याच दिवसात, अशी सर्वसाधारणपणे या रोगाबाबतची समजूत आहे अन्‌ ती फारशी चूकीची आहे असंही नाही. दरवर्षी जगभरात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर आणि एडस्‌ या दोन रोगांची सध्या खूप चर्चा आहे आणि त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. या संशोधनावर अफाट पैसाही खर्च होतो आहे.

अजूनही त्यांच्यावर म्हणण्यासारखे उपाय सापडलेले नाहीत. असं असलं तरी वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे कॅन्सर, एडस्‌, संसर्गजन्य रोग, अपघात, खून (यात युध्दात मारले जाणारे अंतर्भूत नाहीत) यासरख्या सर्व कारणांनी मरणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या अधिक असते.

भारतातील प्रमाण
जगभरात एकून मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे हे खरं. पण भारतातही हीच स्थिती आहे का?

हृदयविकाराच्या दृष्टीनं आज आपल्या देशाची काय स्थिती आहे? भारतात हे दुखणं किती प्रमाणात आहे? हे प्रमाण वाढतं आहे की घटत आहे? हे प्रश्न या संदर्भात कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. आपल्या देशातही हृदयविकार होणाऱ्यांची आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दक्षिण आशियातील सर्वच देशांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जगातील इतर देशांपेक्षा अधिक आहे आणि ते वाढतं आहे.

भारतात तर या विकाराची घोडदौद चालू आहे असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. त्यातही शहरी भागात हे दुखणं फार झपाट्यानं वाढतं आहे. १९६० पासून १९९० पर्यंतच्या काळात शहरी भागात हृदयविकाराचं प्रमाण ९ पटींनी वाढलं आहे. इंडियन हार्ट जर्नल या नियतकालीकाच्या मे-जून ९६ च्या अंकात डॉ. राजीव गुप्ता आणि डॉ. व्ही. पी. गुप्ता यांनी प्रसिध्द केलेल्या ‘मेटॅ-ऍनानिसिस ऑफ कोरोनरी हार्ट डिसीज प्रिव्हॅलन्स इन इंडिया’ (Meta-analysis of coronary. Heart Disease Praevalence in India.) या लेखात ही माहीती आणि आकडेवारी दिलेली आहे. देशभरात ठिकठिकाणी झालेल्या अभ्यासांमध्ये गोळा झालेल्या आकडेवारीची चिकित्सा त्यांनी केली आहे. १९६० साली शहरी लोकसंख्येचा १.०५ टक्‍के इतकं असलेलं (आग्रा, १९६०) हे प्रमाण १९९५ साली ९.५९ टक्‍के इतकं झालेलं आहे. (जयपूर - ७.५९ टक्‍के, मोरादाबाद - ८.५५ टक्‍के, तिरूवानंतपुरम्‌ - १२.६५ टक्‍के, सरासरी ९.५९ टक्‍के) दिल्लीमध्ये हेच प्रमाण ९ पटींनी वाढलं आहे असं म्हणता येतं.

ग्रामीण भागातली परिस्थिती यापेक्षा बरी आहे. १९७४ साली २.०६ टक्‍के असलेलं हृदयविकाराचं प्रमाण (हरीयाना - २.०६ टक्‍के) १९९५ साली ३.०९ टक्‍के (उत्तर प्रदेश - ३.०९ टक्‍के) झालेलं होतं.

१९९४ मधील पंजाब आणि राजस्थान या प्रांता मधले आकडेही साधारण याच प्रमाणात होते. (पंजाब - ३.०९ टक्‍के, राजस्थान - ३.५३ टक्‍के). पण केरळमध्ये १९९३ साली झालेल्या एका अभ्यासात तिथे मात्र हे प्रमाण ७.४३ टक्‍के पर्यंत वाढलेलं आढळलं होतं. हृदयविकाराचं प्रमाण ठरविण्यासाठी केलेले हे अभ्यास देशातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये केले गेलेले नव्हते. तसचं सर्व ग्रामीण भागामध्येही ते केले गेलेले नाहीत. शिवाय एकाच ठिकाणचे वेगवेगळ्या वर्षांमधले आकडेही उपलब्ध झालेले दिसत नाहीत. म्हणजे १९६० साली असलेलं हृदयविकाराचं १.०५ टक्‍के हे प्रमाण जयपूर इथल्या पाहणी अभ्यासात आढळून आलेलं आहे. तर १९९५ सालचं १२.६५ टक्‍के हे प्रमाण तिरूव‍अनंतपुरम्‌ इथलं आहे. या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनसुध्दा असं निश्‍चितणे म्हणता येतं की भारतात हृदयविकाराचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.

परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण मोठं आहे. आणि विशेष काळजीची गोष्ट म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण वाढतं आहे. हृदयविकार हा मध्यम वयीन आणि वृध्द व्यक्तींना होणारा आजार आहे असं साधारणपणे समजलं जातं पण आता तरूणामध्येही हा आजार लक्षणीय प्रमाणात असल्याचं आढळून येत आहे. १९९५ मध्ये जयपूर इथे पार पाडलेल्या एका अभ्यासात २० ते २९ वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण ३.४२ टक्‍के इतकं असल्याचं दिसून आलं आहे.

भारतीयांमध्ये हा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे? आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे? ‘मेटॅऍनालिसिस..’ मध्ये डॉ. गुप्ता आणि डॉ. गुप्ता यांनी असं नमूद केलं आहे की ज्यांच्यावर कॉरोनरी अँजिओग्राफी केली जाते त्यांच्यापैकी ३५-४० टक्‍के रूग्णांना हा विकार असल्याचं कारण निश्‍चितपणे सांगता येत नाही. उच्च रक्तदाब, मधूमेह, कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, धूम्रपान, आनुवंशिकता या गोष्टी म्हणजे हृदयाच्या दृष्टीनं धोक्याचे घटक आहेत. पण ३५-४० टक्‍के रूग्णांमध्ये हे घटक फारसे नसतानासुध्दा त्यांना हृदयविकार झालेला आढळून येतो. शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण होणारे ताण-तणाव, जीवनशैलीत करावे लागलेले बदल या गोष्टींचाही हृदयविकार होण्यात वाटा असावा, हेही धोक्याचे घटक असावेत असं यावरून दिसून येतं असं डॉ. गुप्तांनी म्हटलं आहे.

हृदयविकाराचं शहरी लोकवस्तीतील प्रमाण (भाग वर्ष प्रमाण टक्‍के)

भाग वर्ष प्रमाण टक्‍के
आग्रा १९६० १.०५
दिल्ली १९६२ १.०४
चंदीगढ १९६८ ६.६०
रोहटक १९७५ ३.६३
दिल्ली १९९० ९.६७
जयपूर १९९५ ७.५९
मोरादाबाद १९९५ ८.५५
तिरूव‍अनंतपुरम्‌ १९९५ १२.६५


हृदयविकाराचं ग्रामीण भागातील प्रमाण (भाग वर्ष प्रमाण टक्‍के)

भाग वर्ष प्रमाण टक्‍के
हरीयाना १९७४ २.०६
विदर्भ १९८८ १.६९
केरळ १९९३ ७.४३
पंजाब १९९४ ३.०९
राजस्थान १९९४ ३.५३
उत्तर प्रदेश १९९५ ३.०९

या आकडेवारीवरून एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते, ती म्हणजे बाकी राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये असलेलं हृदयविकाराचं मोठं प्रमाण. हे प्रमाण शहरी भागात (तिरूव‍अनंतपुरम्‌) १२.६५ टक्‍के तर ग्रामीण भागात ७.४३ टक्के इतकं आहे.

केरळमध्ये रोजचा स्वयंपाक आणि बहूतेक सर्व खाद्यपदार्थ खोबरेल तेलात बनवले जातात आणि पैसे कमावण्यासाठी त्या भागातून बरेच लोक मध्यपूर्वेत जातात या दोन गोष्टी सर्वश्रुत आहेत.

आप्तस्वकीय दूर राहील्यामुळे निर्माण होणारा मानसिक ताण आणि खोबरेल तेलाचा वापर या दोन गोष्टींचा आणि त्या राज्यात हृदयविकार मोठ्या प्रमाणात असण्याचा काही संबध आहे का हे तपासणारा एखादा अभ्यास व्हायला हवा आहे. (कदाचीत तसा तो झालाही असेल.) सकृतदर्शनी तरी या गोष्टींचा थेट संबंध असल्यासारखं वाटतं. अर्थात हे एका अ-तज्ज्ञ व्यक्तीचं मत आहे.

  • 1
  • 2

1

हृदयविकार

  • प्रश्‍नोत्तरे
  • डॉ. डीन ऑर्निश यांचा कार्यक्रम
  • इलेक्ट्रोफिजियॉलॉजी
  • धोक्याचे घटक
  • पाळायची पथ्ये
  • हृदयाला उपकारक पाककृती
  • हृदयविकाराची सद्यःस्थिती
  • हृदयरोगाचे निदान

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का? जगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.