Print
Hits: 5659
 1. प्युरिटस ऍलर्जी
  ह्या प्रकारची ऍलर्जी मुख्यत: एखाद्या विशिष्ट स्पर्शाने होते. वेगळ्या प्रकारची गोधडी, ब्लॅंकेट किंवा वेगळाच स्पर्श ह्यामुळे त्वचेमधे एक प्रकारची खाज निर्माण होते, आणि त्याच्या बरोबरीने लालसर पुरळ येते.
 2. ऍलर्जीक -हायनिटिस
  ऍलर्जीक -हायनिटिस म्हणजे नैसर्गिक गोष्टींमधून येणारी ऍलर्जी. परागकण, धूळ, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, प्राण्यांचे केस अशा गोष्टींची ऍलर्जी ह्या प्रकारत मोडते.
 3. अन्नपदार्थांची ऍलर्जी (फूड ऍलर्जी)
  फूड ऍलर्जी आजकाल खूप जणांमधे दिसून येते. त्यात मुख्यत: ग्लुटेन (कणिक, मैदा), दूध, सोया, अंडे, मासे, शेंगदाणे, एखादे तेल ह्या प्रकारची ऍलर्जी दिसून येते. परंतु आपल्याला ऍलर्जी आहे हे समजून यायलाच खूप उशिर लागतो. ऍलर्जी टेस्ट मध्ये सर्व ऍलर्जी व्यवस्थित समजतातच असे नाही. तर कधी कधी ते आपले आपल्यालाही शोधून काढावे लागते. एकदा ऍलर्जी कोणती आहे हे समजल्यावर ती पथ्ये पाळणेही खूपच जरुरीचे असते.
 4. औषधांची ऍलर्जी
  औषधांची ऍलर्जी हे अशा वेळी कळते, की जेव्हा एखाद्या औषधावर ऍलर्जिक रिऍक्शन येते. पॉलिमायक्सिन, मॉर्फिन, एक्स-रे डाय इत्यादी औषधांची असण्याची शक्यता जास्त असते.