Print
Hits: 8583

क्षयरोगाचे ताप हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे. ज्यांना सलग दोन आठवडे ताप राहिला आहे अशा सर्व रूग्णांचे क्षयरोगाबाबत तपासणी होणे गरजेचे असते. क्षयरोग झालेल्या व्यक्तींची, भूक मरते, वजन घटते, उत्साह व शक्ती रहात नाही आणी रात्री प्रमाणाबाहेर घाम येत असल्याचे आढळून येते. कोणत्या भागाला क्षयरोगाची लागण झाली आहे त्यावर इतर लक्षणे अवलंबून असतात.

मेंदूच्या क्षयरोगाची लागण झाले असेल तर त्यावर इतर लक्षणे अवलंबून असतात. मेंदूच्या क्षयरोगात डोकेदुखी आणि उलट्या, ह्र्दयाच्या क्षयरोगीत श्वास कमी पडणे, आणि अशक्तपणा, आतड्याच क्षयरोगात हगवण, पोटदुखी, पेरिटोनियल कॅव्हिटीत झालेल्या क्षयरोगात, हळुहळू पोटफुगी होत जाते. फ़ुप्फ़ुसांच्या क्षयरोगात, खोकला, थुंकीतून रक्त पडणे, (हेमोपटायटीस्‌) छातीत दुखणे अशी लक्षणे आढळतात.

फ़्लुरल टी.बी मध्ये छातीत दुखते. दीर्घ श्वसनाबाहेर हे दुखणे वाढत जाते आणि श्वास पुरे पडत नाही, घुसमट होते. सर्वात महत्वाचे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे क्षयरोग हा फक्त फुफ्फुसांना होणारा आजार नाही तर शरीराच्या कोणत्याही अवयवास होणारा आजार आहे.

स्त्रियांच्या गर्भनलिकांना झालेला क्षयरोग वंध्यत्वास कारणीभूत ठरतो. क्वचित प्रसंगी मणक्यांच्या ठिकाणी किंवा सांधेदुखीचे वेळी क्षयरोग आढळून येतो.