Print
Hits: 31162
आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.कॉम खुपच लोकप्रिय आहे. आरोग्याविषयी सविस्तर माहिती पुरवण्यासाठी ही साईट बांधिल आहे. आरोग्य.कॉम ही साईट एक ब्रँड बिल्डिंगचे माध्यम आहे. आरोग्य.कॉम मधे वेगवेगळ्या विषयावर ५००० पानी माहिती उपलब्ध आहे. यावरुनच यासाईटमुळे मिळणा-या सखोल ज्ञानाची कल्पना येते. यात पर्यायी औषधे व प्रगत एलोपेथिकपद्धती व नवीन निदानपद्धतींचाही समावेश आहे. यासाईटमधे आपण आपल्या विचारांची देवाणघेवाणही करु शकतो. तसेच यात आरोग्य विषयक माहिती व आणखी इतर माहिती जलद मिळवता येईल असे तंत्र उपलब्ध आहे. आरोग्य.कॉम व आमचा "जोडा आणि मिळवत जा ... " याउक्तीवर पुर्ण विश्वास आहे.

आमचा विस्तार व आमचे अस्तित्व ख-याखु-या जगाशी जोडले गेले आहे. मदत गट वास्तविक जीवनात भेटतात. अपंग व्यक्तीदेखील संभाजी पार्कवर आनंद लुटू शकतात. आम्ही बांधलेल्या रॅम्पचे त्यासाठी आम्ही आभार मानतो. किशोरवयीन मधुमेही पिडीतांचे एकत्रीकरण हे आमचे निर्भेळ यशच आहे. व्यसनात अडकलेल्या व्यक्ती आता नविन उभारी घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले अर्थपुर्ण आयुष्य जगत आहेत. आरोग्य.कॉमने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बरोबरीने व्यसनाने पिडीत असलेल्यांना ऑनलाईन समुपदेशन व मदत केंद्राचीही व्यवस्था केलेली आहे. जॉन अल्मेडा, एमडी आपल्या रुग्णांच्या सद्यस्थितीचे आहवाल प्रसारीत करण्यासाठी आरोग्य.कॉमची नित्यनियमाने हाताळणी करतात जेणे करुन त्या रुग्णाला अमेरीकेमधे त्यांच्या ऎवजी दुसरा डॉक्टर उपलब्ध होऊ शकेल. आरोग्य.कॉमनी उपचारांमधे, प्रक्रियांमधे, उत्पादनांमधे, तसेच उपलब्ध सेवांमधिल अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला आहे.

आरोग्य.कॉम ची काही ठळक वैशिट्ये: