Print
Hits: 14590

पुरूषांच्या केसगळतीशी मुकाबला:
टक्कलाशी संबंधित असा जो अतिरीक्त केस गळण्याचा प्रकार पुरूषांच्या बाबतीत संभवतो तो थांबविता येऊ शकतो काय? या प्रश्‍नाच उत्तर तो प्रश्न विचारणारी व्यक्ती कोणत्या वयोगटातील आहे, तिचे प्रकृतीमान काय आहे. यावर बरेचसे अवलंबून असते. केस गळतीची खरी कारणे व त्याविषयी अधिक काही

लैंगिक संबंधातून प्रसारित होणारे रोग
सुरक्षित प्रणयासाठी
कामजीवन - सावधानता हवी जेव्हा तुम्हाला लैंगिक संबंधातून प्रसारित होणार्‍या रोगासंबंधी काळजी करण्यासारख काही नसतं तेव्हा केलेला संभोग हा चांगला. असुरक्षित संभोग हा तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला अडचणीत आणू शकतो. तेव्हा सुरक्षित संभोग करा. निरोधच वापरा, असे केल्यास तुम्हाला निश्‍चिंत वाटेल व तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल.

वृषाणूंच्या कर्करोगास कारणीभूत जनुकांचा शोध
वृषाणूंचा कर्करोग कोणत्या जनुकांमुंळे होतो, या शोध लागला आहे. असा दावा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या परीषदेने केला आहे. ब्रिटीश संशोधकांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले या नवीन शोध लावलेल्या जनुकाचे नामकरण ‘टीजीसीटी’ असे करण्यात आलेले आहे . शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, मातेपासून मिळणाऱ्या ‘एक्सक्रोमोझोन’ मध्ये असणाऱ्या जनुकांपैकी एक हा ‘टीजीसीटी १’ असतो. यामुळे व्यक्तिला वृषाणूंचा कर्करोग होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते.

सर्वसामान्यपणे तरूणांमध्ये आढळून येणार्‍या वृषाणूंच्या कर्करोगाचे निदान व त्यावरील उपचार प्राथमिक अवस्थेत घेण्यास या संशोधनाने मोठी मदत होणार आहे.

पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग ( प्रोस्टेट कॅन्सर)
टेस्टोस्टेरॉन या वृषाणूतील हार्मोन्सच्या अतिरीक्त वाढीमुळे पुरूःस्थ ग्रंथींचा कर्करोग बळावतो. पुरूःस्थ ग्रंथींच्या कर्करोगामुळे शारीरीक व भावनिक पातळीवर काय परिणाम होतात याविषयी जागृती होणे आवश्यक आहे. यावरील उपचाराचा परिणाम म्हणून काही पुरूषांना वंध्यत्व येऊ शकते. लघवीवर नियंत्रण रहात नाही. या परिणामांच्या विरोधात कित्येक नामांकित व्यक्तिंनी लढा पुकारलेला आहे.