Print
Hits: 76354

प्रौढांची सुंता
शिश्नाच्या टोकांवरील कातडी कापून टाकली असता स्त्रीचे लैंगिक समाधान जास्त करता येते. लैंगिक जीवनमान उंचावता येते असे ज्या पुरूषांच्या मनात ठामपणे बसले असेल त्यांच्या बाबतीत ‘सुंता करणे’ (शिश्नाच्या टोकावरील कातडी कापणे) हा एक उपाय ठरू शकतो. (महिलांना याबाबत काय वाटते, लहान मुलांच्या सुंतेबद्दलचा विवाद आणि अधिक याविषयी वाचा)

शिश्नाची (लिंगाची) ताठरता
अधिक काळ सायकल चालविणे हे एक लिंगाच्या ताठरतेविषयी घातक आहे. शरीराचा संपूर्ण भाग हा बैठकीच्या दोन हाडांवर व्यवस्थित तोलला जाईल या पध्दतीने योग्य अशी मानवी पार्श्वभागाची रचना असते. या रचनेला स्नायू व चरबी यांचे अशापध्दतीचे संरक्षण असते की शरीरातील कोणत्याही वाहीन्यांना इजा होत नाही अथवा त्या दुमडल्या जात नाही. जोपर्यंत व्यक्ती खुर्ची अथवा कोणत्या सपाट पृष्ठभागावर बसते, तोपर्यंत बैठकीची हाडे योग्यपध्दतीने वजन तोलून धरतात, परंतु जेव्हा सायकलच्या अरूंद सीटवर व्यक्ती दीर्घकाळ बसते तेव्हा त्याचे वेगळे परीणाम संभवतात.

नपुसकत्व
नपुसकत्व किंवा लिंगाच्या ताठरतेतील कमतरता हे कदाचित हृदय विकाराच्या धोक्याचे चिन्ह असू शकते. धमन्यांचे विकार हे सामान्यपणे नपुसकत्वाचे सामान्य कारण समजले जाते. तसेच नपुसकत्व हे धमन्यांच्या समस्येतून उद्‌भवते, वाहिन्यांशी संबंधित असणार्‍या रोगांचं नपुसकत्व हे महत्वाचं लक्षण आहे.

नसबंदी म्हणजे काय?
आजच्या अतिरीक्त लोकसंख्येच्या जगात गर्भ निरोधकांचा वापर अत्यंत गरजेचा बनला आहे. अनावश्यक गर्भधारणा टाळण्याच्या उपायात पुरूष नसबंदी हा एक समर्थ पर्याय ठरू शकतो. संकुचित धर्मांध गटाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून लोकसंख्येचा विस्फोट थांबवायचा असेल जगभरातील अब्जावधी पुरूषांनी अशा पर्यायाचा स्वीकार करायला हवा. (नसबंदी हा योग्य पर्याय आहे का आणि अधिक)