Print
Hits: 5422

एडस्‌ झालेल्या रूग्णाचे उर्वरीत आयुष्य जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेने , जावे, याबाबतीत रूग्णाचा ‘पोषण दर्जा’ सुयोग्य अन्नाचे शक्य तितका चांगला राखता येईल कां? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. रूग्णाला आवडीचा पण सुखकारक आहा र देऊन विरंगुळा देता येईल अन्‌ ‘पोषक तत्वे" पण. त्याच्या व्यथा पण कमी करता येतील. एडस्‌ ग्रस्तांच्या बाबतीत ‘ आहार ’ हा एक संजीवक- उपचार ठरेल.

पाच मूलभूत अन्नगट
अन्नपदार्थातूल पोषक तत्वाच्या अधिक्यानुसार. अन्नपदार्थ पाच मूलभूत गटात वर्गीकृत केले आहेत. रोजच्या आपल्या आहारात आपण घेत असलेल्या आन्न पदार्थाचा सुयोग्य समावेश हवा. तसेच प्रत्येक गटातील अन्नपदार्थ समाविष्ट केले पाहिजेत आणि तेही योग्य प्रमाणात तरच आहार समतोल होईल. त्यासाठी दर्शक म्हणून पाच मुलभूत गटाचा उपयोग करून आहार ‘समतोल ’ करता येतो. शरीरस्वास्थ्य राखता येईल.

अन्नगट-अन्नपदार्थ मुख्य पोषकतत्वे
१. एकदल धान्ये व त्याचे पदार्थ - तांदूळ, गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी, पोहे, रवा, गव्हाचे वा काष्ठीर वा तंतू इतर पीठे कार्यशक्ती, प्रथिने ‘ ब’ जीवनसत्व, लोह.
२. डाळी आणि कडधान्ये - हरबरा, तूर , उदीड, मूग, राजमा, सोयाबीन, चौधारी, घेवडा, डाळी, शेंगदाणे, अक्रोड, बदाम, तीळ कार्यशक्ती, प्रथिने, ‘ ब’ जीवनसत्व, लोह, काष्ठीर वा तंतू.
३. दूध व दूधाचे पदार्थ - दही, दुधाची भुकटी, खवा, पनीर, चीझ्‌, मांस, मासे कोंबडी, अंडी , इतर प्राणी प्रथिने , स्निग्धे, कॅलशियम
४. फळे व भाज्या - फळे- आंबा, पेरू, पपई, संत्री, टरबुज, सीताफळ, सफरचंद भाज्या- पालेभाज्या -चाकवत , पालक, अंबाडी, अळू, शेवग्या ची पाने, मेथी, इ. इतर भाज्या- गाजर, वांगी , भोपळी मिरची, बटाटे, रताळे, भेंडी, शेवग्याच्या शेंगा गार्जरेय (जीवनसत्व ‘अ’) जीवनसत्व ‘क’ कॅलशियम, लोह, ‘ब’ जीवनसत्व, काष्ठीर वा तंतू
५. स्निग्धे व शर्करा - तेल, तूप, लोणी, मोहरीचे तेल, साखर, गुळ, काकवी, मध कार्यशक्ती, आवश्यक स्निग्धाम्ले, जीवसत्वे, अ, ड, इ, के.


हेच गट खालील प्रमाणे ओळखले जातात- १ गट- कार्यशक्ती गट, गट २ व ३ - प्रथिने गट, गट ३ व गट ४ - संरक्षक गट, संपृक्त कार्यशक्ती गट

पोषक पंचक
आहारातून पाच पोषक तत्वे पुरविली जातात. कार्बोदके, प्रथिने, स्निग्धे, जीववसत्वे आणि खनिजे ही ती ‘ पाच पोषकतत्वे’ होत. कार्बोदके, स्निग्धे व गरज पडल्यास प्रथिनापासून कार्यशक्ती मिळणे. या पाच पोषक तत्वाच्या. त्याच्या घटकाच्या सुयोग्य ताळमेळ जमवून,व्यक्तीच्या गरजेनुसार समतोल वा संतुलित आहार बनविता येतो. त्यामुळे सुपोषित होऊन सक्षम होते. रूग्णाची प्रतिकारक्षमता वाढते.

अन्नस्वच्छता व अन्न आरोग्य
‘अन्न तारी अन्न मारी’ यातील उतरार्ध अन्न स्वच्छता व अन्न आरोग्य याची काळजी घेतली नाही तर प्रत्ययास येते एडस्‌ ग्रस्तामध्ये आणि प्रतिकारक्षमता कमकुवत झालेली असते. त्यात पुन्हा संसर्ग झाला तर बघायलाच नको म्हणून उत्तम दर्जाचे अन्न निवडायला हवे. अन्न आणि पाणी निर्जंतुक हवे अन्नाच संपर्कात येणारी सर्व साधने, भांडी निर्जंतुक हवीत, कीटक, कृमी, जंतू, सूक्ष्म जंतू यापासून अन्न पाणी सुरक्षित ठेवले पाहीजे. रूग्णाला संसर्ग होणार नाही. अन्‌ त्याच्या ही द्वारा इतरांना संसर्ग होणार नाही याची खास दक्षता घ्यायला हवी.

एच्‌. आय. व्ही. व आहार प्रबंध
आहार प्रबंध करताना रूग्णांच्या शारीरीक, मानसिक, आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीचा साकल्याने विचार करावयास हवा. रूग्णाचा पोषणदर्जा वा स्थिती, रोगाचा टप्पा, रूग्णामध्ये दिसून येणारी लक्षणे, त्याचे स्वरूप व गंभीरता, औषध - योजना त्याचा होणारा एकत्रित परीणाम ध्यानात घ्यायला हवा. विशेषत: अन्नग्रहण व व्यक्तीच्या पोषकतत्वाच्या गरजेवर होणारा परिणाम, या बाबी महत्वाच्या आहेत.

रूग्णाला दिला जाणारा आहार हा संवर्धनात्मक, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असा त्रिगुणी- त्रिमितीय हवा. सुयोग्य पोषकतत्वे पुरवून शरीराचे घटलेले वजन वाढविता येते. प्रतिजैविके वा ऍण्टीबायोटिक्स दिल्यास शरीरात ‘ ब’ जीवनसत्व तयार करणारे सुक्ष्मजंतू नष्ट पावतात. म्हणून ‘ब’ कॉम्प्लेक्स युक्त आहार दिल्यास त्याआभावी उद्‌भवणार्‍या लक्षणांनी प्रतिबंध करता येईल. बाह्य लक्षणे दृश्यमान असतील तर ती दूर करण्यासाठी योग्य पोषकतत्वेयुक्त आहार द्यायला हवा. रक्तक्षय असेल तर प्रथिने, लोह, जीवनसत्व‘ क’ अधिक प्रमाणात पुरवून रक्तक्षयावर उपचार करता येईल.

आहार पथ्यामध्ये रूग्णाच्या आहार ग्रहणाच्या सवयी महत्वाच्या.आपल्या सवयीचा आहार रूग्णास मानसिक समाधान देणे. अन्न पौष्टिक हवेच. पण स्वादिष्ट, स्वीकारणीय अन्न ओठातून पोटात सुलभतेने जाते. थोड्या थोड्या वेळाने छोटे खानी भोजन, रूग्णाच्या पचनी पडेल. रूग्णाच्या लक्षणानुसार भावेल, पचेल, रूचेल असा आहार हवा. रूग्णाच्या शरीरात पाण्याचा असमतोल होण्याची शक्यता असते. पाण्यामुळे अन्नाची पचनीयता वाढते. पोषणक्षम पोषकतत्वे पेयाच्या माध्यमातूम पुरविता येतात रूग्ण मोसंबी-संत्रे खाताना कंटाळू कंटाळू शकतो, पण त्याचा रस चटकन घशाखाली उतरवू शकतो. रूग्णाची पचन संस्था कमकुवत झालेली असते.

याचा योग्य ताळमेळ घातला पाहिजे. सकाळी रूग्ण ताजातवाना असतो. त्यावेळी भरपूर न्याहारीचे आयोजन करावे. रात्री रूग्णास शांत झोप लागावी म्हणून संध्याकाळी व रात्री हलके जेवण द्यावे. दोन अडीच तासांनी छोटेखानी जेवण वा पेय पदार्थ द्यावेत. कृत्रीम अन्नपदार्थापेक्षा, नैसर्गिक अन्न प्रकार रूग्णाच्या लवकर अंगी लागतो. उपजत जाणीवेने तो अंगीकारला जातो.आत्मसात केला जातो.