Print
Hits: 8218

अभ्यासातील दुबळेपण म्हणजे काय?

कमी हुशारी, भावनिक किंवा शारीरिक तक्रार इत्यादींपैकी कोणतेही कारण नसेल आणि तरीही नवीन काही शिकण्यामध्ये अडचण येत असेल तर त्याला अभ्यासातील किंवा शिकण्यातील दुबळेपण म्हणतात.

शिकण्यातील दुबळेपणामुळे मुलावर नेमका कोणता परिणाम होतो?

कोणत्यातरी अडचणीमुळे मुलाचा नवीन काही शिकण्याचा वेग कमी असतो. हे ओळखण्याची सोपी खूण म्हणजे मुल वाचण्यामध्ये कमी पडतं किंवा लिहिण्यामध्ये कमी पडतं. ह्यापैकी कोणतं ना कोणतं एक किंवा अनेक कारण असू शकतं.

कोणत्या प्रकारचा अडथळा, शिकण्यातील दुबळेपण निर्माण होण्यास कारणीभूत होतो?

अजून पर्यंत निश्‍चित एक असं कारण शैक्षणिक दुर्बलता येण्यास कारणीभूत होतं असं कळलेलं नाही, पण खालील पैकी कोणतेही एक किंवा अधिक कारणे ह्या मागे असू शकतात. कोणत्याही संसर्गामुळे मेंदूवर झालेला परिणाम, गरोदर असताना किंवा बाळंतपणात आलेली कुठल्याही प्रकारची अडचण ह्यामुळे असं होऊ शकतं. किंवा एका वेळेला एकापेक्षा अधिक भाषा कानावर पडणं संस्कारातील कमतरता इत्यादी गोष्टीमुळेसुध्दा हा दोष निर्माण होऊ शकतो.

शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणे कोणती?

वयाला अनुसरून अपेक्षित असलेल्या पातळीवर वाचता न येणे, लिहीता न येणे, किंवा ऐकू येणं न येणं, यासारखी लक्षणं, वाचण्यात किंवा लिहीण्यात अडचण येणे, डावा हात वापरणे हे निश्‍चित नसणे.

भावनिक अस्वस्थतेमुळे अभ्यासातील दुर्बलता उद्‍भवते का?

नाही. भावनिक अस्वस्थतेमुळे अभ्यासातील दुर्बलता उद्‍भवण्याऐवजी आपण अभ्यासात कमी पडतो या भावनेमुळे अस्वस्थता निर्माण होते. कारण मुलामध्ये आत्मविश्वास कमी होतो.

शिकण्यातील दुर्बलतेमुळे भावनिक किंवा शारीरिक वर्तणुकीत फरक होतो का?

हो. शिकण्यातील असमर्थतेमुळे मुलांमधे प्रयत्‍न सोडून देण्याची वृत्ती निर्माण होते, आत्मविश्वास कमी होतो, चिडचिडे होतात, बरोबरीच्या मुलांच्याबरोबर जुळवून घ्यायला कमी पडतात, अभ्यासात टाळाटाळ करतात.व शेवटी रडकी मुले म्हणून ओळळली जातात.

शिकण्यातील दुर्बलता औषधामुळे कमी होऊ शकते का?

नाही. असं कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही, ज्यामुळे हा दोष पुर्ण जाऊ शकेल किंवा कमी होऊ शकेल.

कोणत्या प्रकारची उपाययोजना शिकण्यातील असमर्थता कमी करण्यासाठी उपयोगी पडेल?

मानसशास्त्रीय उपाययोजना, व्यवसाय मार्गदर्शन, विद्यार्थ्याची कुवत ओळखून केलेली उपाय योजना या गोष्टी सातत्याने प्रदीर्घकाळ करत राहीलं तर अशी असमर्थता असणाऱ्या मुलाला उपयोगी पडू शकेल.