जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मुलाची वाढ व विकास अधिक गतीने होत असतो. सर्वसाधारपणे मुलाच्या जन्मानंतर त्याचे वजन पहिल्या चार महिन्यात दुपटिने वाढते. तर त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्यात तिप्पटिने वाढ होते. अशी आश्चर्यजनक वाढ होण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबरच बाळाला आनंदी वातावरणही मिळाले पाहीजे. त्याच बरोबर वाळ गुटगुटित होण्यासाठी पाणी, जीवनसत्वे, प्रथिने, खनीजे, मेदयुक्त पदार्थ असे जवळपास ४० पौष्टिक घटक त्याला त्याच्या आहारातुन दिले गेले पाहिजेत. गर्भाची पुर्ण वाढ होवून मुलाचा जन्म झालेला असेल तर त्या बालकाच्या शरीरात सुरूवातीला काहीकाळ पुरेल असा पोषक मुल्यांचा विशेषत: पाण्याचा पुरेसा साठा असतो. दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवसापासुन तुमच्या बाळाला पाणी व पोषक मुल्यांची गरज भासत असते.
जन्मापासुन चौथ्या महिन्यापर्यंत

‘स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार होय. परंतू काही आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा पहिलटकरणींना पुन्हा त्यांच्या कामास सुरूवार करायची असल्याने त्यांना बाळाला पुरेसे स्तनपान करता येत नाही. अशावेळी काही माता बाटलीतील दुधाची मदत घेतात. ज्या बायका मुलांना अंगावर दुध पाजतात. त्यांना दररोज किमान ५०० कि. ग्रॅ. कॅलरीजचे गरज असते. या शिवाय ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व २० ग्रॅम प्रथिने तिला मिळालीच पाहिजेत त्यासाठी तिच्या आहारात दुध, दुधाचे प्रदार्थ, अंडी मांस, व ब्रेड मिळालेच पाहीजेत. तसेच ती जेवढ्या प्रमाणात पाणी पिईल तेवढ्या प्रमाणात तिला जास्त दुध सुटेल.
स्तनपानाचे फायदे
मातेच्या दुधात नवजात बालकासाठी आवश्यक ते सर्व पोषकमुल्य असतात. पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईचं दुंध बाळाचे सुक्ष्मजीव जंतु पासुन संरक्षण करते. अंगावर दुध पाजल्याने बाळाला जठरासंबंधी किंवा पोटाचे विकार उद्भवत नाहीत.
स्तनपानाचे तोटे
अल्कोहाल, कॅफिन किंवा औषधामधील काही अनावश्यक घटकद्रव्य स्तनपानातुन बाळाच्या शरीरात गेले तर त्याचे काही दुष्परिणाम होउ शकतात. यासाठी स्तनपानाच्या काळात कॅफिन व मद्य यांचे सेवन मातांनी कमी केले पाहीजे व डॉक्टरांच्या सल्यानुसार मोजकी औषधे घेतली पाहीजेत. काहीतरी काम करत असताना बाळाकडे लक्ष देणे शक्य नसल्यास त्यांच्या तोंडातदुधाची बाटली देणे हे तुलनेने सोपे असते. बाटलीचे दुध ही काही मुलांच्या बाबतीतली एक वाईट सवयच बनून जाते. काही मुल तोंडात दुधाची बाटली ठेवूनच झोपतात. तर काहीनां दुधाच्या बाटलीशिवाय झोपच येत नाही. याचा परिणाम म्हणजे मुलांचे दात लवकर किडतात. कारण दुधात नैर्सगिक शर्करा असते. जिचे आवरण दातावर बसून त्याचा परिणाम दात किडण्यावर होतो.
स्तनपानाच्या वेळा
दर तीन तासांनी बाळाला दुधाची गरज भासते. पहिल्या काही आठवड्यात स्तनपानात अनियमितपणा आला तर मुलाला भुक लागते. परंतू जशजशी त्याची वाढ होत जाते. तसतशी त्याची भुकही वाढल्याने स्तनपानात मातेला नियमितपणा आणावा लागतो.
पाणी
छोटी मुले किंवा प्रौढांच्या प्रमाणेच बाळाला दुधा इतकीच पाण्याची गरज असते. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत होते. १८ पौंडाच्या वजनापर्यंत बालकांना त्यांच्या एका पौंड वजनासाठी एक तृतीयांश कप पाणी लागते. वजन जास्त असेल तर पाणी कमी लागते. उदा. १२ पौंड वजनाच्या दिवसाला ४ कप पाणी लागेल. यातील बहुतेक द्रवाची गरज स्तनपानातुन भागवली जाते. परंतू उन्हाळ्यात अशा द्रवाची अधिक गरज भासते.
जीवनसत्व व खनीज द्रवांचा पुरवठा
सर्वसाधारण बालकांसाठी आईच्या तसेच बाजारी पावडरच्या दुधात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे व खनीजे असतात. जरी मातेच्या किंवा पावडरच्या दुधात ‘क’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असले तरी ते लहान मुलाची गरज भागवण्याइतके असते. तरीही आईच्या दुधातील जीवनसत्वे व खनीजे मुलाकडून अधिक शोषून घेतली जातात. बाळाची वाढ पुर्ण झालेली असतील तर अशा बालकाच्या शरीरात सहा महिने पुरेल इतका लोहाचा साठा असतो.
पोटशुल
काही मुले स्तनपानानंतर नेहमीच रडतात, काहीजणांना उलटी येते. हा प्रकार पोटशुलामुळे होतो. आईच्या आहारात काही बाधक पदार्थ आल्यास दुधावाटे ते बाळाच्या पोटात जाउन याचा त्रास बाळाला होतो. बरेचदा मुलांना हा त्रास अनावर होतो. अशावेळी गाणी गाउन किंवा त्यांच्याशी बोलून त्यांना शांत केले पाहिजे.
प्रसन्न, प्रेमळ वातावरण
लहान मुलांना स्तनपानाच्या वेळी मातेच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पटकन कळतात. यावेळी शक्यतो वातावरण आनंदी ठेवावे. कुटुंबाच्या हिताचे निर्णय पालकांनी वेळीच घेणे महत्वाचे असते. मुलाला दुग्धपान करण्यासाठी कोणतीही पध्दत वापरली तरी त्यावेळी आजुबाजुला आनंदी वातावरण हवे. स्तनपान करताना मातेने एखादे गाण गुणगुणावे, थोपटावे किंवा बाळाशी वातावरण खेळते ठेवावे. या प्रेमळ स्पर्शाशिवाय मुलांची योग्य वाढ विकास होउ शकत नाही. घन पदार्थाचा आहार देताना घ्यायची काळजी: घन आहार देताना असे सुचविले जाते की मुल ४ ते ६ महिन्यांचे होई पर्यंत थांबावे. तोपर्यंत मुलाला मान सांभाळता येते व ते ताठ बसु शकते. यामुळे ते चमच्याने भरवलेले पदार्थ नीट ग्रहण करू शकते. ४ ते ६ महिन्यांनंतर मुलांना घन पदार्थातील पोषण मुल्यांची अधिक गरज भासते. या वेळेपर्यंत त्याचे वजन दुप्पटिने वाढलेले असते व त्यांची अन्नाची गरजही वाढलेली असते.
घनपदार्थ कसे द्याल?
घनपदार्थांचा आहार बाळाला हळुहळु द्यावा. सुरूवातीस १ किंवा २ चमचे पुरे एकावेळी एकच नवा पदार्थ त्याला भरवावा. दुसरा पदार्थ भरवण्यापुर्वी काही दिवस पहिला पदार्थ भरवण्याची सवय करावी. त्यामुळे त्याला कोणता पदार्थ बाधतो हे ओळखणे सोपे जाते. भाताच्या पेजेपासुन त्याच्या आहाराची सुरूवात करावी. इतर धान्याच्या तुलनेने भात बाधक असल्याने बरेच आहारतज्ञ बाळाला भात भरवण्याचा आग्रह धरून लोहयुक्त भाताची ते शिफारस करतात. भातातुन लोहाप्रमाणेच कॅलरीज, कार्बोहायड्रेटस्, प्रथिने व मेदयुक्त पदार्थ यांचा समतोलपणा राखला जातो. बाळाला प्रथम घनआहार देताना स्पर्शाचेही विशेष महत्व आहे. घनपदार्थ भरताना मुलांना व्यवस्थित धरून ठेवा.
मायक्रोव्हेव व बाळाचे अन्नपदार्थ
बाळाचे अन्नपदार्थ मायक्रोव्हेव गरम करत असताना विशेष दक्षता बाळगली पाहिजे. कारण मायक्रोव्हेव मधे अन्नपदार्थ सारख्याच प्रमाणात गरम होत नाहीत. एखादा भाग अधिक गरम होवू शकतो. मुलाला अन्न भरवताना एखादा चमचा गर्म पदार्थाचा जाउ शकतो. तर पुढचा चमचा थंड पदार्थाचा असु शकतो. प्रत्येक गरम करून देण्याची गरज नाही. ते सामान्य तपमानाचे असले तरी चालते. त्यातुनही गरम करावा. पदार्थ द्यावयाचे असतील तर तो चांगला ढवळुन गरम करावा म्हणजे तो सर्व बाजूंनी सारखा गरम होतो. तरीही तो पदार्थ भरवण्यापुर्वी त्यांची खात्री करून घेवून मगच भरवावा.