Print
Hits: 11480

विश्वास ठेवा अगर ठेवू नका
तुम्ही आता पालक झाला आहात हे लक्षात ठेवा. मुलं तुमची आहेत आणि तुम्ही मुलांचे - बर्‍याच पालकांना याची जाणीव नसते. स्वतःला एकटे न समजता मुलांच्या अधिक सानिध्यात रहा.

पालक असण्यातील सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असण्याची गरज नाही. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर पालकत्वाची जबाबदारीही वाढत जाते. मुलांच्या गरजा पुर्ण करता करता त्यातुन दोघांनाही समाधान कसे मिळेल याचाही तुम्ही स्वतःशीच विचार करून पहा. त्यातुन समतोल राखा.

जन्मल्यापासुन एक वर्षापर्यंत:
बाळाला अंघोळ कशी घालावी त्याचे कपडे कसे केव्हा बदलावेत, हे तुम्ही शिकले पाहिजे. वाचून आपल्या आईवडिलांशी किंवा डॉक्टरांशी बोलुन यासंबंधी माहिती करून घेतली पाहिजे.

मुलांवर प्रेम करा:
तुम्हाला मुलांना जितका आनंद, प्रेम देता येईल तितके द्या. मुलांशी बोलुन, हसुन, खेळुन त्यांना प्रेमाने कुरवाळुन त्यांचा पापा घेत मौजमस्ती केली पाहिजे त्याने मुल किरकीरे होत नाही.

मुलांच्या उच्चारातील अर्थ शोधा:
लहान मुले तोंडाने जे विविध आवाज करतात त्यात काही ना काही अर्थ लपलेले असतात. उदा. आआ म्हणजे आई, पा पा म्हणजे बाबा असे वेगवेगळे उच्चार बाळ करतो. त्याचा उच्चार समजुन घेणे ही पालकांची एक जबाबदारी आहे.

शारीरिक बळाचा वापर करू नका पालक ताण खुप वेगळे असतात. परंतु मुलांना मारून ते त्यांच्यावर व्यक्त करू नका.

मुलांचा धडपडीपणा:
मुलं रांगायला लागली की घरभरातील वस्तु त्या हाताने उचलायला पाहिजे. काय घेउ काय नको असं त्याला झालेलं असतं प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते ती हातात घेण्यासाठी त्याची धडपड चालु असते.

लहान मुल घरभर वावरत आहे याचे भान ठेवून त्याने ज्या वस्तुला हात लावू नये असे आपल्याला वाटत असेल किंवा एखादी वस्तु चुकुन तोंडात टाकली असता त्याला अपाय होण्याची शक्यता असेल हे करू नको, त्याला हात लावू नको अशी वारंवार सांगण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

बंधन साधी व सोपी ठेवा
तुमच्या धडपड्या मुलाला सुरक्षित ठेवणं हे तुमचं खरं ध्येय आहे यासाठी हे कर, हे करू नको अशी त्यांच्यावर लादली जाणारी बंधन सोपी ठेवावीत. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावताना जेवणापुर्वी हात धुवावेत, जेवणानंतर चुळ भरावी असे सोप्या भाषेत त्याला समजुन सांगावे.

विद्यार्थीदशा:
रस दाखवा: मुलांचा गृहपाठ तपासा. शाळेत काय घडतयं त्यास विचारा. त्यांच्या मित्रांकडे याबद्दलची चौकशी करा व मुलांच्या शिक्षकांना भेटण्यासाठी वेळ काढा.

संवाद साधा:
मुलांशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकणे हा पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे.

पौगंडावस्था:
गोंधळुन जाउ नका: पौगंडावस्था काय असते हे वाक्य येणार्‍या मुलांना लहान मुलांप्रमाणे समजावून सांगा व त्यांची मानसिक तयारी करा. मुलांना शरीरात होणारे बदल समजावून देउन त्यांची मानसिक तयारी करा. मुलांना जीवनाबद्दल सांगत असताना तो मला माहित आहे असं सांगण्याचा प्रयत्‍न करेल, त्याकडे दुर्लक्ष करून त्याला जीवनाबद्दलची वस्तुस्थिती योग्यरीत्या पटवुन द्या. तुम्हीच असे एक असता की जे मुलाच्या भावना योग्यरीत्या समजुन घेउ शकतात.

मित्रांच्यासमोर मुलांवरील प्रेमाचे प्रदर्शन करू नका किंवा त्याला रागावू नका. नंतर त्याची चुक दाखवताना आपल्याला त्याची किती काळजी आहे हे लक्षात आणुन द्या.

जुनी मुल्यं, नियम बाजूना ठेवा मुलांशी मित्राप्रमाणे वागा. त्यांना त्यांच्या पध्दतीने जगु द्या हे करताना त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवल्यास मुलं जबाबदारीने वागतात.

शिस्त:
मुलांना शिस्त लावणे ही पालकांची एक महत्वाची जबाबदारी आहे. मुल वागण्यात पुन्हा पुन्हा तीच चुक करत असतील आणि ही चुक टाळायची असेल तर ती चुक कशी टाळता येईल हे त्याला योग्यरीत्या पटवून देता आलं पाहिजे. चुकीतले गांभिर्य लक्षात घेवून त्याप्रमाणे त्याला कडक शब्दात त्याची जाणीव दिली पाहिजे.

शिस्त लावण्यासाठी लालुच आमिष दाखविणे फारसे उपयोगाचे नाही. त्याने केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याची प्रेमाने पाठ थोपटली पाहिजे. असे केल्याने मुलंही चांगला प्रतिसाद देतात.

जेव्हा योग्य अपेक्षांची पुर्तता होत नाही, तेव्हाच शिस्तीचा बडगा दाखवा. तुमच्या त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहेत याची आगावू सुचना देउन स्पष्टता आणा.

समाधानी रहा पाहुणे किंवा आजी - आजोबांसमोर प्रेमापोटी मुलांची शिस्त बिघडु देउ नका.

मुलाकडून अपेक्षांची पूर्तता होते किंवा नाही हे वेळोवेळी तपासा. मुलं कायम निर्दोष नसतात. आणि पालकही सदैव परिपुर्ण असे नसतात. जर मुलांकडुन तुमच्या अपेक्षा पुर्ण होत नसतील तर त्या अपेक्षा गैरवाजवी तर नाहीत ना हे तपासा. असतील तर लवकरात लवकर त्या बदला.

शिस्त लावताना मुलगा - मुलगी अशा वागणुकी मधे फरक करू नका.

तुम्ही आणि तुमचे बाळ
बर्‍याच दिवसांच्या महिन्यांचे प्रतिक्षेनंतर तो दिवस उजाडला आणि तुम्ही पालक बनतात. बाळाचा जन्मदिवस हा पालकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो. प्रथमच आई होणार्‍याप्रमाणेच तुम्हालाही गोंधळुन गेल्यासारखे होईल. बाळाच्या जन्मानंतरचा पहिला दिवस हा तुमच्या आयुष्यातील एक धांदलीचा दिवस असेल.

माझं बाळ माझ्याशी कसा संवाद करेल?
रडणे ही तुमच्या बाळाची तुमच्याशी संवाद साधण्याची महत्वाची पध्दत असेल. परंतू त्यांच्याकडे तुमच्याशी संवाद साधण्याचे इतरही मार्ग आहेत. बाळाच रडणं हे त्यांच्याबाबतीत काहीतरी बिनसलं असल्याचं चिन्ह असेल. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या भुक लागलीय, कपडे ओले झालेत, थंडी वाजतेय किंवा मला कुशित घ्या. असं त्याला तुम्हाला सांगायचे असेल. मुल कशामुळे रडतेय हे हळुहळु तुम्हाला समजू लागेल आणि तुम्ही त्याचा प्रतिसाद देउ लागाल. ‘मी भुकेला आहे’ असं सांगताना तो कदाचीत हळु रडेल. पण मी खूप दुःखी आहे हे सांगताना तो मोठ्याने रडेल.

काही वेळा मुलांच्या रडण्याच्या विशिष्ट कारणामुळे पालकांनी निराश होऊ नये कारण मनावरील अनावश्यक ताण दुर करण्यासाठी मुलं मोठमोठ्याने रडतात.

नवजात बालक वेगवेगळे आवाज करून तुम्हाला काहीतरी सांगण्याचे प्रयत्‍न करत असते. ते समजण्यासाठी तुमच्या बोलण्याला तो कसा प्रतिकार देतो. याकडे तुम्ही लक्षपुर्वक पाहिले पाहिजे. बाळाला भरवताना, खेळवताना, कुरवाळताना तुम्हाला त्याच्याशी असा संवाद साधता येईल. जेव्हा बाळ रडू लागेल तेव्हा लवकरात लवकर त्याला शांत करा त्याचे रडणे थांबविण्यासाठी त्याच्याशी असा प्रेमाने बोलत तेव्हा तो तुमचा आवाज अधिक लक्ष देउन ऐकतो असं तुमच्या लक्षात येईल.

बाळ जेव्हा एक महिन्यांचा होऊ लागेल तेव्हा त्यांच्या हास्यांच तुम्हाला ओझरतं दर्शन होईल त्यानंतर कदाचित हुंदके देत खदखदुन हसु लागेल.

नवजात बालकाची दृष्टी
ते काय पाहु शकते:
नवीन जन्मलेल्या मुलाला १० इंचाच्या परिघातातील वस्तु स्प्ष्टपणे पाहता येतात. मानवी चेहरा आणि हालचाली या विषयी त्यांचे डोळे अतिशय संवेदनशील असतात. नवजात बालकांचे रंगज्ञान सुरूवातीस लाल व निळा या गडद रंगापुरते मर्यादित असते. हळुहळु त्यात हिरव्या व पिवळ्या रंगांचा समावेश होतो.

मुलांची दृष्टी पुर्ण केव्हा विकसित होते
मुल जेव्हा ४ महिन्यांचे होते तेव्हा त्यांची दृष्टी त्रिमितीय होते. आणि ६ महिने झाल्यावर मुलाची दृष्टी विकसीत होते.

मुलांचा दृष्टीदोष कसा ओळखावा
रांगताना मुले समोरील अडथळा आल्यानंतर धडपडली असता किंवा त्यांच्या कडे चेंडू टाकला असता त्या दिशेने ते सरकत नसतील तर त्यांच्या दृष्टीत बदल होतोय तिरळेपणा येतोय याबाबत सावध रहा.

मुलांचा बहिरेपणा
तुमचे बाळ काय ऐकू शकते.
लहान मुले मोठ्या आवाजाने दचकतात. चौथ्या महिन्यात आवाज कोणत्या बाजूने येतो. त्या दिशेने ते पाहतात. ऐकणे व बोलणे यांचा परस्परसंबंध आहे. तीन महिन्यापर्यंत मुलांचे त्यांच्या आईवडिलांशी मोजकेच संभाषण असते. ओळखीच्या आवाजाने काही विशिष्ट भावना उद्दपित होतात.

मुलांची श्रवणशक्ती कशी विकसित होते.
मुलांची वाढ होत असताना त्याला राग व प्रेम या भावनातील फरक समजू लागतो. विविध आवाज मुलांना संवाद साधण्यासाठी मदत करतात. भरवताना, अंघोळ करताना त्याच्याशी खेळताना आईने मुलाशी सतत बोलले पाहिजे.

मुलांचा श्रवण बोलणे यांचा परस्परसंबंध आहे. जर तुमचे मुल ३ वर्षाचे झाल्यानंतरही बोलू शकत नसेल तर तुम्ही त्याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य. श्रवणदोष असेल तर बोलता येत नाही.