लहान मुलांच्या क्रिडाप्रशिक्षणची मुलतत्वे
१. लहान मुलांच्या क्रिडा प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक प्राधान्य, त्यांना आनंद व करमणूक वाटण्यास, कौशल्य आत्मसात करण्यास द्यायला हवे.
२. क्रिडा प्रशिक्षणमध्ये त्यांना सतत प्रोत्साहन देणे, शरीराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी, विविध खेळांचा, क्रिडा प्रकारांचा समावेश करणे.
३. क्रिडा प्रशिक्षणात, लहान मुलांनी, पालकांच्या मार्गदर्शकांच्या , अगर शिक्षिकेच्या आवडीचे खेळ न खेळता स्वत:च्या आवडीचे खेळ खेळणे.
४. खेळताना खालील गोष्टींबद्दल फार आग्रही असू नये. टारगेट फुलफीलमेंट खेळ शेवटपर्यंत खेळणे. काटेकोरपणे नियमांचे पालन करणे टोकांची शिस्तबध्दता, परिपूर्णता, अचूकता
५. लहान मुलांच्या क्रिडा प्रशिक्षणाचा कालावधी एका वेळेला १०-१५ मिनिटांपेक्षा अधिक नसावा.
६. क्रिडा प्रशिक्षण हे त्या खेळांमधील तज्ञांकडूनच दिले जावे.
७. बाल क्रिडापटूंची वेळोवेळी वैद्यकिय तपासणी होणे गरजेचे.
८. प्रत्येक क्रिडा प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रथमोपचाराची व्यवस्था असायलाच हवी.
९. स्पर्धात्मक क्रिडाप्रकरांमध्ये भाग घेणार्या बाल क्रिडापटूंना विम्याचे संरक्षण देणे.
क्रिडाप्रशिक्षण
लहान मुलांना क्रिडा प्रशिक्षण देताना त्यातील तोच तो पणा, एकसुरीपणा टाळून ते सतत उत्तेजना देणारे, शरीराचा व मनाचा सर्वांगिण विकास करणारे आहे ना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
क्रिडा प्रशिक्षणाच्या दरम्यान, ताकदीच्या व्यायामांचा अतिरेक खाल्यास त्याच हाडांच्या वाढीच्या केंद्रावर (Epiphysis) सांध्यांवर, स्नायूंवर त्यावरील आवरणांवर गंभीर दुष्परिणाम झाल्याने, शरिराच्या अंतिम वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतात, जिम्नॅस्टिक, फिगर स्केटींग, विविध बॉलगेम्स मध्ये या गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवतात. खेळताना कठीण पृष्ठभागावर वरचेवर पडण्याने, उड्या मारण्याने पाठीच्या कण्यात आसेप्टीक नेक्रोसिस सारखा दोष निर्माण होऊ शकतो.
लहान वयात खेळताना झालेल्या दुखापतींवर शास्त्रोक्त पध्दतीने योग्य ते उपचार न खाल्यास पुढील आयुष्यात मायोसायटीस ऑसिफिकान्स आर्थोटिक डिजनरेशन, या सारखे दुष्परीणाम होऊ शकतात. स्पर्धात्मक क्रिडा प्रशिक्षण घेणारा खेळाडू हा पूर्णपणे, निरोगी असायलाच हवा. शारीरिक व्यंग असणाऱ्यांनी जास्त भर हा करमणुकीच्या खेळांमध्ये भाग घेण्यास देणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक हितावह ठरते. लहान मुलांचे शरीर, हे शारीरिक प्रशिक्षणामुळे होणाऱ्या शरीरातील बदलांशी उत्तम प्रकारे जुळवून घेते. शारीरिक प्रशिक्षणातील प्रगतितील मर्यादा, प्रामुख्याने , मेंदूच्या विकसितपणावर, नैसर्गिक बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असतात. बाल क्रिडापटूस थकवा येणे, भोक लागणे, खेळातील गोडी, उत्साह नाहीसा झाल्याचे आढळून आल्यास क्रिडा प्रशिक्षणचा, अतिरेक होत आहे हे लक्षात घ्यावे.
लहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण
- Details
- Hits: 8690
3
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
