Print
Hits: 11937
 1. अचानक कामाची प्रत कमी होणे.
 2. कुठलेही काम करायला आपण असमर्थ आहोत असे वाटणे.
 3. काम सुरू करण्यापुर्वीच काम करता येणार नाही असे वाटणे.
 4. क्षमतेइतकं काम करत नाही असं वाटणं.
 5. बरोबरीच्या मुलामुलींच्या इतपत शिक्षणात प्रगती नसणं.
 6. अंक व अक्षर यांच्या क्रमामध्ये सातत्य ठेवता न येणे.
 7. शरीराचे अवयव ओळखण्यात सातत्य नसणे.
 8. आजूबाजूच वातावरण व किरकोळ आवाज यांनी लक्ष विचलीत होणे.
 9. पुस्तक व चित्र नेहमी उलटी धरून बघणे.
 10. लक्ष देऊन एखादी गोष्ट करण्यामध्ये अडचण येणे.
 11. एकापेक्षा अधिक अंक क्रमाने वापरता न येणे.
 12. अधून मधून स्मरणशक्ती क्षीण होणे.
 13. खुर्ची किंवा बाकावर मागे पुढे झुलत राहणे.
 14. आज एखादी गोष्ट आठवली तर उद्या न आठवणं.
 15. साध्यासुध्या सूचना नीट अमलात न आणता येणे.
 16. पेन पेन्सिल अतिशय घट्‍ट पकडणे.
 17. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ इत्यादी आकृत्या नीट न काढता येणे.
 18. माणसाचं चित्र काढायला सांगितल्यावर नुसत्या रेघोट्या ओढणे.
 19. विषयाशी असंबध्द अशी तोंडी उत्तर देणे.
 20. केस उपटणे.
 21. पेनाची शाई स्वतःवर उडवणं.
 22. नखं कुरतडणं, खाजवणं, नाकात बोटे घालणे.
 23. दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना त्रास देणे.
 24. दुसऱ्या मुलांबरोबर क्रूरपणे वागणे.
 25. जाणीवपूर्वक दूसऱ्या मुलांना इजा पोहोचवणं.
 26. मुक्या प्राण्यांशी क्रूरपणे वागणे.
 27. शाळेची बस किंवा शाळेत जाता येता सतत कटकट करणे.
 28. सतत रागाचा उद्रेक होणे.
 29. शाळेतून किंवा घरून पळून जाणे.
 30. मागील अनुभवावरून काही न शिकणे.
 31. शाळेचे नियम न पाळणे.
 32. अधिकाधिक व्यक्तींना सतत विरोध करणे.
 33. सतत चोऱ्या करणे.
 34. वयाने मोठे असलेल्या व्यक्तींबरोबर जास्ती घसट असणे.
 35. त्याच्याकडे बघून इतरांना त्याच्याबद्दल आत्मीयता न वाटणे.
 36. उलट्या होणे.
 37. गिळण्याला त्रास होणे.
 38. सतत पोटदुखी जाणवणे.
 39. शरीरावर, चेहऱ्यावर सतत पुरळ उठणे.
 40. घशातून सतत चमत्कारिक आवाज येणे.
 41. सतत सर्दी, खोकला होणे.
 42. सतत हगवण लागणे.
 43. जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास देणे, छळणे.
 44. पालक दारू किंवा तत्सम्‌ व्यसणाच्या आहारी गेल्याची लक्षणे दिसणे.
 45. पालक किंवा घरातील इतर कोणाकडून तरी हडतहूडत केलेलं जाणवणे.
 46. मुलाच्या मर्यादा पालकांनी लक्षात घेतलेलं जाणवणे.
 47. मुलाची तक्रार नेल्यानंतर पालकांनी आक्रमक होणे.
 48. पालकांनी मुलाचा सतत पाणऊतारा केलेला असणे.
 49. पालकांनीच मुलाला शाळेत गैरहजर रहायला लावणे.
 50. पालक इतर मुलांच्या बरोबर खेळायला देत नाहीत अशी मुलाची तक्रार असणे.

 1. एका डोळ्याचा वापर दुसऱ्या डोळ्यापेक्षा अधिक करणे.
 2. सतत कान दुखणे.
 3. ऐकण्याची तक्रार असणे.
 4. कानातून रक्त येणे.
 5. गोष्टी दोन दोन दिसतात अशी तक्रार असणे.
 6. सतत घंटा नाद ऐकल्यासारखे वाटते असे म्हणणे.
 7. सतत चकणे बघणे.
 8. डोळे सतत लाल किंवा सुजलेले असणे.
 9. सतत हात थरथरत असणे.
 10. सतत डोकेदुखी असणे.
 11. कपडे खराब करणे. (कपडयात विधी करणे)
 12. आपण चांगलं मूल नाही आहोत असे सतत दाखवणं.
 13. अस्तित्वात नसलेले आवाज ऐकल्याचा भास होणे, नसलेल्या वस्तू दिसत आहेत असं वाटणे.
 14. आपल्याला लोक दुखापत करतील असं सतत वाटणे.
 15. चमत्कारीक भिती सतत मनात असणे.
 16. आपल्यावर कुणाचं प्रेम नाही असं वाटणे.
 17. घरातल्या अडचणींना आपण कारणीभूत आहोत असं सतत वाटणे.
 18. मनामध्ये मृत्यू ह्या कल्पनेने घर करणे.
 19. तोतरेपणा असणे.
 20. थंडी नसतानासुध्दा सतत थंडी वाजत आहे ह्या जाणीवेनं शरीर थरथरणे.
 21. लोकांना आपण आवडत नाही अस सतत वाटत असणे.
 22. आपण इतर मुलांइतके चांगले नाही आहोत अस सतत वाटत असणे.
 23. बोलणे सतत टाळणे.
 24. अतिशय थंडगार घामेजलेले हात असणे.
 25. इतर मुलं आपल्याला त्रास देतील म्हणून शाळेतील मधली सुट्‍टी नकोशी वाटणे.
 26. इतर त्याच्याशी बोलत असताना कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर न देणे.
 27. स्वतःचे विचार व स्वतःच्या कल्पना ह्यात दंग असणे.
 28. पालकांपासून लांब राहण्यामध्ये सतत नाखूश असणे.
 29. इतर मुलांबरोबर न खेळणे.
 30. हिरडयांमधून सतत रक्त येणे.
 31. ओठ, कानाची पाळी व बोटाची नखे ह्याच्यावर निळसर झाक असणे.
 32. थोडयाशा कष्टाने श्वासोछ्‌वासाला त्रास होणे.
 33. लघवी करताना जळजळ किंवा त्रास होणे.
 34. गंभीरपणे भाजल्याच्या खूणा असणे.
 35. मोठया प्रमाणावर खरचटल्याच्या खूणा असणे.
 36. बर्‍या न होणाऱ्या जखमा असणे.
 37. दारू किंवा तत्सम्‌ नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन करणे.
 38. साबण, रंग अशा चमत्कारिक वस्तू खाणे.
 39. सुजलेले किंवा दुखणारे सांधे असणे.
 40. पाय व पाउलं सुजलेली असणे.
 41. सतत अर्थहीन बोलणे.
 42. वजन फार अधिक असणे.
 43. जंत असण्याची शक्यता दर्शवणं.
 44. सतत जलद व अनिश्चित हालचाली असणे.
 45. अधूनच एकदम वाकताना संवेदनाहीन होणे.
 46. चक्कर येणे.
 47. शरीराचा कुठलाही अवयव अचानक संवेदनाहीन होणे.
 48. शरीराची एक बाजू अशक्त असणे.
 49. तोल राखता न येणे.
 50. आकडी, झीट अशा प्रकारचे झटके येणे.