Print
Hits: 6303

खाली, शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणं दिली आहेत. पण कोणतेही एक लक्षण असलं तर मूल दुर्बल आहे हे निश्‍चित होणार नाही, निरनिराळी लक्षण एकत्र करून येणारा परीणाम हे एकच परिमाण मूल शिकण्यात असमर्थ आहे हे निश्‍चित करता येईल ही यादी ७ वर्षावरील मुलांच्यासाठी तपासून पहावी.

जे विधान आपल्या मुलाला लागू पडत असेल त्याच्या पुढे ‘आहे / हो’ म्हणा व होकाराला एक मार्क द्या.

 1. वर्गात आपली जागा मिळवण्यास अडचण येते.
 2. शारीरिक शिक्षणाच्या तासाला अडचण येते.
 3. माणसांचे चित्रं अर्धवट काढणे.
 4. घरामध्ये कुटुंबपातळीवर वाचण्यात असमर्थता असणे.
 5. शब्द उलट अर्थी वापरणे, जसे जा च्या ऐवजे ये, उठ च्या ऐवजी बस इत्यादी.
 6. फार काळ लक्षपूर्वक एखादी कृती करता न येणे.
 7. खेडवळ किंवा एकापेक्षा अधिक भाषांचा वापर असणे.
 8. आठवणीने क्रमवार घटना सांगता न येणे.
 9. शब्द चुकीचे लिहीणे.
 10. मूल किंवा मुलाच्या घरातील कोणीतरी उजव्या किंवा डाव्या हाताचा वापर सारख्याच कुवतीने करणारे असणं.
 11. वाचलेलं लक्षात ठेवायला अडचण येणे.
 12. पटकन लक्ष विचलीत होणे.
 13. कोणत्याही वस्तूच्या किंवा जागेच्या आकारमानाचा अंदाज बरोबर नसणे.
 14. कागदाची घडी घालता न येणे.
 15. डोक्याला/ मेंदूला दुखापत झालेली असणे, अधून मधून अपस्माराचे झटके येणे.
 16. सतत डाव आणि उजव ह्यामध्ये गोंधळणे.
 17. काही नवीन शिकण्यासाठी आवश्यक तेवढे लक्ष देण्यास असमर्थ असणे.
 18. लिहीणं टाळणे.
 19. लक्ष केंद्रित करण्याची कुवत कमी असणे.
 20. शब्द भांडार कमी असणे.
 21. मित्र कमी असणे.
 22. बघणं आणि करणं ह्यामध्ये एक वाक्यता नसणे.
 23. शरीराच्या हालचाली अस्वस्थ असणे.
 24. नेहमीच्या वापरातले शब्द लक्षात ठेवण्याची कुवत कमी असणे.
 25. स्मरणशक्ती कमी असणे.
 26. अक्षर अतिशय गुंतागुंतीचं आणि वेडवाकडं असणे.
 27. वस्तू हरवण्याची सततची सवय असणे.
 28. अतिशय भावनाप्रधान असणे.
 29. आत्मविश्वास कमी असणे.

गणना - आपल्या मुलाला १२० पेक्षा अधिक मार्क असतील तर त्याला व्यावसायिक सल्ल्याची गरज आहे.