Print
Hits: 6366

अ‍ॅक्युप्रेशरपद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. जसे दाब देणे, रगडणे, हळूवार ताण देणे, घासणे, रोलिंग करणे व खेचणे. त्याचबरोबर काही निवडक व्यायामही असतात. दाबतंत्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवर दाब दिला जातो. काही वेळा सुरवातीला हलका व वर वर दाब दिला जातो आणि त्यानंतर हळुहळू खोलवर दाब दिला जातो. नेहमी सराव करणारा प्रशिक्षक एखाद्या, विशिष्ठ जागी किंवा तक्रारींशी संबंधीत इतर बिंदुंवर अधिक क्रियाशिलता किंवा अधिक दाब देऊ शकतो. पण ते त्या त्या व्यक्तीच्या तक्रारींवर अवलंबून आहे. त्यासाठी विशिष्ठ कालावधीचा अभ्यासक्रमही असू शकतो.

अ‍ॅक्युप्रेशरसाठी हातावरील जागा
जेव्हा योग्य बिंदु मिळालेला असतो आणि जर आपल्या बोटांना त्या योग्य जागी नीट हलचाल करता येत असेल तर दाब देण्यासाठी त्या बिंदुच्या दिशेने आपले वजन झुकवण्यास सुरवात करावी. आपल्या शरिराचा वरचा भाग दाब देण्यासाठी वापरल्याने कोणताही ताण न भासता स्थीर ताण देता येतो. आपल्या दीर्घ, हळू व खोल श्वास घेत थेट दाब देत रहवा. जोपर्यंत नाडी सर्वसामान्य अवस्थेत येत नाही किंवा जोपर्यंत त्रास कमी झालेला जाणवत नाही तोपर्यंत दाब एका पातळीवर स्थिर धरुन ठेवावा. त्यानंतर हळूवार तरल स्पर्शाने दाब कमी कमी करत जावे.

हलका स्पर्श
तसे पाहीले तर हलक्या स्पर्शाचा वापर हा प्रभावी उपचारासाठी ओळखला जातो. तर खोल स्पर्श हा तीव्र परिस्थितीतील उपचारासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे. जरी खोल स्पर्श हा तीव्र परिस्थितीतील उपचारासाठी योग्य असला तरी त्याचा वापर ग्राहकाच्या सहनशक्तीपुरताच मर्यादीत असावा. तक्रार असलेल्या जागी खुप रगडण्यापेक्षा त्याबिंदुवर स्थिर बोटांनी दाब देत रहावा.

अंगठ्याचा जो नियम आहे तो हळूवार वापरासाठी तसेच त्वचेवर नव्वद अंशाच्या कोनातून स्थीर दाब देण्यासाठी आहे. जर आपण त्वचेला ओढत असाल तर त्यावरील दाबाचा कोन चुकेल. लक्षपुर्वक व हळूवार शरिराच्या त्याभागाच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायला हवा. या उपचाराला योग्य निकालाकडे नेण्यासाठी हळूहळू दाब देणे व सोडणे महत्वाचे आहे. बोटंच्या अचुक हलहाली, योग्य पद्धत व एकाग्रतेनेच प्रभावी उपचार होऊ शकतात.

प्रत्येक अ‍ॅक्युप्रेशर सत्रामध्ये दाबासाठी वेगवेगळी पातळी गाठल्यामुळे आपल्याला त्याविशिष्ठ जागेची नाडी जाणवायला लागते. हे नाडीचे ठोके जाणवणे म्हणजे चांगले संकेत मानले जातात. याचा अर्थ रक्तसंचार वाढला आहे. त्यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण त्या कदाचित जास्त क्रियाशील किंवा दुबळ्याही असू शकतात. त्याबिंदुला नाडीचा तोल असेपर्यंतच धरुन ठेवावे.

जर आपले हात थकत असतील तर हळूहळू दाब काढून घ्यावा व हातांना हवेत हलवून घ्यावे तसेच श्वास पुर्ववत करुन घ्यावा. आपण ताजेतवाने झाले असाल तर पुन्हा त्याजागेवर दाब देण्यासाठी तयार व्हा. पुन्हा दुखणारी जागेवर थेट दाब द्या. नाडीचे ठोके सर्वसामान्य अवस्थेत येईपर्यंत किंवा दुखणे कमी होईपर्यंत दाब देत रहावे. त्यानंतर जवळजवळ २० सेकंद हलक्या हाताने दाब कमी कमी करत जावे.

प्रत्येक शरिराला आणि प्रत्येक शरिराच्या प्रत्येक भागाला वेगवेगळ्या पातळीवरील दाबाची आवश्यकता असते. जर आपण दाब देत असलेल्या जागी चांगल्या परीणामाबरोबर वेदनाही होत असतील तर हलक्या हाताने कमी तिव्रतेचा दाब द्यायला सुरवात करावी. चेहरा, जननेंद्रिये यांच्या प्रमाणे काही शरिराचे भाग संवेदनशील असतात. पाठ, नितंब, खांदे याप्रकारच्या शरिराच्या भागात अधिक खोल व कठीण दाबाची आवश्यकता असते.

सखोल स्पर्श
प्रत्येक आवेगाबरोबर आपले शरीर प्रतिक्रिया देत असते जेनेकरुण समतोल राखला जाईल. सॉफ्ट टिश्यु, याप्रकाराचा स्नायू किंवा हाडांचे जोड यांना आराम किंवा कार्यरत करण्यासाठी वापर होतो. आपल्या शरिरातील एखादा बिंदु किंवा एखादी जागा आपल्याला जागृत करणारी, प्रेरणा देणारी, भडकवणारी किंवा तिव्रता वाढवणारी असते आणि ती नैसर्गिकच असते. शरिराला अस्तित्व प्रकट करण्यासाठीच त्याची निर्मिती केलेली असते. या नैसर्गिक प्रतिक्रियेपासुन बचाव करण्यासाठी नाहक उर्जा खर्च केली जाते. जेव्हा शरीर प्रेरणा ग्रहण करत नाही त्यावेळेस शरिरात ताण तयार होत जातो. पिन पॉईंट ही खोल स्पर्श तंत्रात मोडणारी पद्धत आहे. ह्या पद्धतीमध्ये दुखापत असलेल्या जागेशी संबंधीत असलेल्या विरुद्ध बिंदुवर अंमलबजावणी केली जाते. या तंत्रात पारंगत असलेले प्रशिक्षक आत्म-चिकित्सेव्दारे स्वतःला प्रोत्साहन देतात. तसेच प्रभाव झालेल्या जागी उर्जाही निर्माण करु शकतात.

अ‍ॅक्युप्रेशरपद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. जसे दाब देणे, रगडणे, हळूवार ताण देणे, घासणे, रोलिंग करणे व खेचणे. त्याचबरोबर काही निवडक व्यायामही असतात. दाबतंत्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवर दाब दिला जातो. काहीवेळा सुरवातीला हलका व वरवर दाब दिला जातो आणि त्यानंतर हळुहळू खोलवर दाब दिला जातो. नेहमी सराव करणारा प्रशिक्षक एखाद्या, विशिष्ठ जागी किंवा तक्रारीशीसंबंधीत इतर बिंदुंवर अधिक क्रियाशिलता किंवा अधिक दाब देऊ शकतो. पण ते त्या त्या व्यक्तीच्या तक्रारींवर अवलंबून आहे. त्यासाठी विशिष्ठ कालावधीचा अभ्यासक्रमही असू शकतो.

हे वाहक किंवा वाहिन्या आपल्या अंतर्गत विशिष्ठ अंगाने प्रार्थमिक १२ आणि ८ अतिरीक्त वहिन्यांशी जोडले जातात. ह्या वाहिन्या शरिराच्या तरल त्वचेवर प्रकटीत होतात. सखोल स्पर्श हे पद्धती विशेषतः बिकट परिस्थितीमध्ये वापरली जाते. खोल स्पर्श हा तीव्र परिस्थितीतील उपचारासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे. जरी खोल स्पर्श हा तीव्र परिस्थितीतील उपचारासाठी योग्य असला तरी त्याचा वापर ग्राहकाच्या सहनशक्तीपुरताच मर्यादीत असावा.

सखोल स्पर्श ही पद्धती खोलवर असलेल्या जागा शोधण्यासाठी व त्यावर उपाय करण्यासाठी वापरली जाते. शरिरात असणारे असे क्षेत्र शोधुन काढणे, व उर्जा निर्माण करुन इलाज करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. जास्त ताण असणारे क्षेत्र जसे पाय व त्यांसारख्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते.

सुक्ष्म परंतु खोल स्पर्श एक्युपंचर वाहिन्यांना प्रेरीत करतो त्यासाठी अंगठे, बोट, कोपरे आणि गुडघे यांचा वापर होतो. हलके किंवा गतिशीलतेमुळे शरिराच्या त्या अंगाला सखोल आराम मिळतो. तसेच उर्जा निर्माण होवून संतुलन राखण्यास मदत होते. उर्जेच्या स्रोतांना उत्तेजित करण्यासाठी मदत मिळते. विशिष्ठ जागा, वाहिन्या यांसोबत खोल संवेदनशील स्पर्शाचा अनुभव घेतला जाऊ शकतो. याप्रकारच्या तंत्रामुळे संतुलन पुन्हा राखण्यास मदत होते. चेहरा आणि शरिरावरील हे बिंदू ताणून धरल्याने शरिरात सुटसूटीतपणा येतो, स्नायुंमधील ताण नाहीसा होऊन आराम मिळतो. या उपचारात कधी खोल आराम मिळतो तर कधी वेदना शमवल्या जातात. ग्राहक त्याचा उल्लेख चांगले दुखणे असा करतात. संवाद साधणे हे महत्वाचे आहे कारण त्याशिवाय खोल स्पर्श आराम देतो आहे की हलका स्पर्श आराम देतो आहे हे कळणारच नाही. प्रत्येकवेळी आणखी दाब हवा आहे किंवा नाही हे विचारणे देखील गरजेचे आहे.