Print
Hits: 7543

विविध चाचण्यांद्वारे केलेले रोग - निदान
सध्याचे अधुनिक जग हे भयानक ताण तणाव, आणि हवा, पाणी आणि ध्वनिप्रदुषणाच्या अंमलाखाली वावरत आहे. ज्याचा हळूहळू किंवा दमा दमाने तुमच्या मनावर व शरीरावार परीणाम होतो. अमर्याद उत्तेजकता, आणि निरनिराळ्या उद्दिपीत करणा-या गोष्टी आपल्याला सतत अतिशय वेगात हलत ठेवतात. बेसुमार खाणे आणि पिणे हे असमतोलपणा वाढवते.
रोग्याची माहीती घेणे
८० टक्के रोग निदान हे रूग्णांच्या इतिहासावरून केले जाते असे बहुतेक वैद्यांचे/चिकित्सकांचे मत आहे. त्यासाठी रोग, कालमर्यादा व आजाराची लक्षणे ह्यांची नोंद केली जाते.
जीभ
जिभेचा रंग, तेथील त्वचेची घडण, व जिभेवरील लेप हे सर्व पाहून रोग-निदान केले जाते.
धडधडणे
हाताला जाणवेल असे तापमान, नाजुकपणा, कडकपणा अथवा स्नायुंना आलेला आकुंचनाचा झटका, तपासणी पूर्ण करते.
नाडी परीक्षा
नाडी परीक्षा ही योग्य अशा प्रशिक्षणानंतरच तज्ञ व्यक्तींनी करणे योग्य असते. नाडी परीक्षा ही तिन बोटांनी केली जाते, प्रत्येक बोट एक याम्योत्तर वृत्त दर्शविते. आपल्या उजव्या मनगटावरील तीन याम्योत्तर रेषा नाडीच्या पृष्ठभागावर असतात. स्पर्शज्ञानाने खोलवर असलेल्या नाड्यांवरील दाब वाढवून आणि तीन अधिक याम्योत्तर रेषांचे स्थान यावरून त्यांची किंमत ठरविता येते. त्याचप्रमाणे डाव्या मनगटावरील तीन पृष्ठभागांवरील व तीन खोलवर असलेल्या नाड्यांमुळे सहा याम्योत्तर रेषांची किंमत ठरविली जाते.

वरील कार्यपध्दतीचा वापर करून, अवघड प्रश्नांचे साधनांच्या योगे मुल्यमापन करून आणि रूग्णांची अवस्था बघून त्याला देण्यात येणा-या औषाधोपचारांची पुढील योजना ठरवून वैद्य त्याचे निदान करतात . त्यासाठी दाबतंत्राचा वापर करण्यासाठी आणि त्यावर योग्य औषधोपचार करण्यासाठी अचुक निदानाची नितांत आवश्यकता असते.