Print
Hits: 8201

Asthma Point अस्थमा बिंदू दम्यासाठी दाब बिंदू
दमा/अस्थमा ही एक अशी परीस्थीती आणि हल्ला आहे की जो केंव्हाही होऊ शकतो. LUS (lungs) किंवा चीनी भाषेत फुट मार्श हा बिंदू हाताच्या आतील बाजूस कोपरा जवळ असतो. फुफ्फूसाचा मार्ग (line) किंवा मेरेडीयन हा हातामधुन जात असतो. जेथे त्वचेचा रंग व पोत बदलत असते तेथून जपानी मध्ये LUS बिंदू लोवर आर्मवर कोपरापासुन १" खाली असतो. फुफ्फूसांची ताकद वाढवण्यासाठी या बिंदूवर वारंवार दाब द्या.

Nose Point नाकाचा बिंदू

सर्दीसाठी दाब बिंदू
चोंदलेल्या नाकापासून व त्याच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी असंख्य दाबबिंदू वापरले जातात. हे विशिष्ट दाब बिंदू नाकाच्या दोन्ही बाजूस असतात. जर आपली समस्या ही सायनस संबधी असेल तर चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी आणखी काही दाबबिंदू आहेत, नाकपूडीच्या सुरवातीला असणा-या याबिंदूस IT 20, Larse म्हणतात. चीनी भाषेत वोलकम परफ्‍युम म्हणतात. नाकाच्या बाजूस असणा-या या बिंदूवर समान दाब द्या.

Sore Throat Point घशाचा बिंदू घसा दूखणे / खवखवणे
अंगठ्याच्या बाहेरील बाजूस व नखाच्या खाली असणा-या बिंदूस LU 11 (lung 11) चीनी भाषेत त्यास लेसर मर्चंट (Lessers marchant) घसा दुखण्याचे, खवखवण्याचे प्रथम चिन्ह दिसताच दुसऱ्या बोटाच्या नखाने किंवा टूथपीक किंवा खोडरबरने दाब द्यावा. यामुळे आपली श्वसनसंस्था बळकट होण्यास मदत होते. खूप वाट बघू नका एकदा का जर सर्दीने जम बसवीला तर मग खूप उशीर होइल आणि मग इतर बिंदू व उपचारांची गरज भासेल. हा बिंदू दम्यासाठी सुध्दा उपयोगी पडतो.

Anxiety Point चितेंचा बिंदू

चिंता
चिंता कमी करण्यासाठी हा एक चांगला बिंदू आहे. पाश्‍चिमात्य क्रमांक पध्दतीमध्ये याला P6 किंवा पेरीकार्डीयम ६ म्हणतात (हीट कॉन्सट्रीक्टर ६ किंवा हार्ट प्रोटेक्टर म्हणूनही ओळखला जातो.)

चीनी भाषेत याला Inner Gate म्हणूनही ओळखले जाते. हा बिंदू मनगटापासुन २,३ बोटे खाली आणि दोन्ही मनगटावर बरोबर मध्ये असतो. याबिंदूवर दाब दिल्याने छातीवरील भार कमी होऊन नर्व्हसनेस किंवा anxiety ची भावना कमी होते. हा बिंदू फक्त चिंतेमध्ये उपयोगी नसून नॉशिया, मॉर्निंग सिकनेस, अतीसारामुळे येणारा अशक्तपणा, डोकेदूखी, निद्रानाश आणि गरगरणे यावर उपयोगी ठरतो.