Print
Hits: 11473

पुनर्नवा (वसू) (Boerhavia duffusa)
वर्णन

Boerhavia duffusa पुनर्नवा

एक वर्षाचे किंवा बहुवर्षापर्यंतचे झुडुप किंवा वेल. ०.६६ ते १ मीटर लांब ग्रीष्मात हे सुकते व पावसाळयात पुन्हा फुटते. पर्ण २.५ ते ४ सेमी. लांब गोल किंवा अण्डाकार, मांसल मागील बाजूस पांढरे असणारे. पुष्प लहान पांढरे किंवा गुलाबी, मूळ मोठे, बळकट पांढरे व वाळल्यावर त्याला पिळा पडतो, पाने अभिमुख असून त्यातील एक लहान व एक मोठे असते. वर्षाऋतूत फुले व फळे येतात. भारतात सर्वत्र मिळते.
औषधी गुणधर्म
सुजेवर पुनर्नवा, देवदार, सुंठ व वाळा यांचा काढा द्यावा. रांताधळेपणात पांढऱ्या पुनर्नवेची मुळी कांजीत उगाळून अंजन करावे. लघवीला jive होत असल्यास पुनर्नवा काढा २० ते ४० मिलि. प्रमाणात रोज दोन वेळा द्यावा. दर चार दिवसाला येणाऱ्या तापावर श्वेतपुनर्नवाची मूळे दूधात उगाळून द्यावे.

रूई (Araka)
१ ते २ मीटर उंचीचे गुल्मजातीय छोटे. कठीण काण्डत्वचा धुरकट आणि रेषायुक्त. पर्ण १० ते १५ सेमी. लांब व २.५ ते ७ सेमी. आयताकार. वरचा पृष्ठभाग गुळगुळीत व मागील पृष्ठावर पांढरी लव, पुष्प पांढरे वरच्या अर्ध्या भागात तांबूस वांगी रंगाचे फळ लांब आतल्या बाजूस वळलेले वाळल्यावर फळे आपोआप फुटून त्यातून मऊ कापूस बाहेर पडतो. त्याला बिया चिकटलेल्या असतात. त्या वायाबरोबर पसरतात. बीज लहान व काळे असते.

संबंध भारतात कोरडया आणि तुरट रेताड जमिनीत उगवते. वसंत ऋतूत फुले व ग्रीष्मात फळे येतात.
औषधी गुणधर्म
रूईच्या मुळाच्या सालीचा उपयोग गुप्तरोगावर होतो. कान दुखत असल्यास रूईची पिकलेली पाने तूप लावून अग्नीवर शेकून त्यांचा काढलेला रस कानात घालावा. दमा खोकला असेल तर रूईच्या पानांचा रस पोटात दिल्याने उलटी होऊन कफ पडून जातो (हा प्रयोग वैद्यांच्या देखरखीत करावा).

रूईची फुले, काळी मिरी, लवंग आणि शुध्द अफू समभाग प्रमाणात एकत्र खलून केलेल्या गोळ्या ३०० ते ६०० मि. ग्रॅ. प्रमाणात भूक न लागणे आणि पोट दुखणे यामध्ये द्याव्यात.

रूईची पाने व त्यांच्या. १२ प्रमाणात सैंधव मीठ एकत्र करून काळे भस्म तयार होते ते १ ते २ ग्रॅम प्रमाणात दिल्याने यकृत- प्लीहा रोग, गुल्म, पोटात पाणी होणे हे विकार बरे होतात.