Print
Hits: 17436

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी
आयुर्वेदामध्ये त्वचा, केस आणि शरीरासंबंधी विविध समस्यावर उपचार आहेत. खाली असे काही उपचार दिले आहेत. पण या उपचारांचा वापर करण्यापुर्वी छोट्या प्रमाणात वापर करून बघा.

विविध त्वचा प्रकारात वनौषधी फेस पॅक
त्वचेला उजाळा आणण्यासाठी व कांती चमकदार होण्यासाठी फेस पॅक कोरड्या रुक्ष व सुरकुतलेल्या त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी फेस पॅक ऍक्‍ने व मुरमे होणाऱ्या त्वचेसाठी
डागयुक्त त्वचेसाठी फेस पॅक डाग आणि रंगासाठी
डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी क्रिम त्वचा उजळ करण्यासाठी
सर्वोपयोगी वनौषधीयुक्त फेस पॅक कातडी वरील पांढऱ्या डांगासाठी


आरोग्यपुर्ण व तजेलदार त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक सर्व प्रकारासाठी उपयुक्त आहे. यामुळे मधील मृत पेशी काढुन टाकल्या जातात. यामुळे त्वचा ताणली जाउन त्वचेवरील डाग जातात. व त्वचा तजेलदार होते.

घटक कृती
ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मुलतानी माती १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/८ टीस्पुन पाणी किंवा दुध यामधे मिसळुन वापरा


वर उल्लेख केलेल्या सर्व वनौषधी पावडर वर सांगितल्या प्रमाणात घेउन योग्य मिश्रण करा. त्यामधे योग्य प्रमाणात पाणी किंवा दूध घालुन पेस्ट तयार करा. पाण्याऐवजी उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरू शकता. नीम व त्रिफळा त्वचा साफ करते व ताणते. मंजिष्ठा आणी चंदन कांती सुधारण्यास मदत करते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा थंड होते. व रंध्रे मोकळी/स्वच्छ होतात. व ताणली जातात. यामुळे मुरूमे/ऍक्‍ने होण्यास प्रतिबंध होतो.

घटक कृती
नीम १/२ टीस्पुन, ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, चंदन १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/२ टीस्पुन पाणी किंवा दुधात मिसळून वापरा