Print
Hits: 5728

सर्वप्रथम अशी जागा शोधून काढावी जिथे आपणास नियमितपणे अभ्यास करता येईल. ही अभ्यासाची जागा एखादी लहान खोली असू शकते किंवा आपल्या घरातील छोटासा कोपराही असू शकतो. अशी कोणतीही जागा चालू शकते जिथे आपण रोज काही मिनिटे डोळे बंद करुन शांतपणे बसू शकतो. यामुळे लवकर मन:शांती मिळण्यास मदत होईल.

तुम्ही जमिनीवर किंवा खुर्चीवर बसू शकता. जर आपण बसण्यासाठी खुर्ची निवडली तर आपणास बसताना पाठ ताठ ठेवण्यास मदत होईल. जर आपण जमिनीवर बसणार असाल तर आपली पाठ न वाकवता सरळ बसावे. जर आपण बसण्यास सक्षम नसाल किंवा दुबळे असाल तर जमिनीवरून पडूनही ध्यान करता येते. पण लवकरात लवकर उठून बसण्याचा प्रयत्न करावा.

आपण बसण्याच्या जागी समोर कोणताही पृष्ठभाग असणे गरजेचे आहे. जर आपण खुर्चीवर बसणार असाल तर त्यासमोर एखादा कप्पा किंवा टेबल असणे गरजेचे आहे. जर आपण जमिनीवर बसणार असाल तर लाकडी पाट किंवा छोटी मांडणी असणे आवश्यक आहे जेणेकरुन आपणास त्यावर काही गोष्टी ठेवता येतील.

सर्व तयारी झाल्यावर खालील पैकी एक किंवा सर्व वस्तू ठेवाव्यात

नैसर्गिक वस्तू आपली ऊर्जा सशक्त करण्यास मदत करतात. तसेच आपल्यात चैतन्य निर्माण करण्यासही मदत करतात.

आपल्या ध्यानासाठी जागा करताना घाई करु नका. ध्यानाला सुरवात करताना नुसत्या मेणबत्तीने सुरवात केली तरी चालते. त्यानंतर हळुहळू व स्थिरतेने आपल्या अंर्तमनातील मार्गदर्शनाने ज्या ज्या वस्तुंची आवश्यक्ता भासेल त्याप्रमाणे त्या वस्तू वापरात आणत जावे.