Print
Hits: 7553

नॅचरोपॅथी म्हणजे काय?

नॅचरोपॅथी म्हणजे आजार नैसर्गिक उपचारां मार्फत बरा करण्याची थेरेपी. नॅचरोपॅथी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्व पूर्ण कार्य करते, तुमची आहार पध्दती सुधारुन, ताण कमी करुन जीवन शैली सुधारण्याचा प्रयत्न करते. उदा. हर्बल रेमिडीज, होमिओपॅथी, शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मसाजचा वापर करावा.

औषधोपचारात कशाचा समावेश असतो?

पहील्या भेटी मध्ये नॅचरोपॅथी डॉक्टर तुमच्याशी आहार पध्दती, झोपण्याची वेळ, पध्दत, भावनिकता, इतर आरोग्य बाबत प्रश्न व त्याबरोबरची लक्षणे या विषयी तास दोन तास चर्चा करतात. नेहमीच्या फिजीशियन्स प्रमाणे ते ही’ X-Ray, रक्त, लघवी तपासणी वगैरे मार्ग अवलंबतात, काही वेळा औषधे देऊन नंतर सर्जरीचा उपाय सुचवीतात पण शक्यतो ते नैसर्गिक उपाचारांवर विश्वास ठेवतात, आणि आहाराला जोड म्हणून औषोधोपचार सुचवीतात त्यामुळे आहारातील समतोल दूर होऊ शकतो. जर आहार हे आपल्या आजाराचे कारण असेल तर त्या आहाराच्या गटाला टाळणे सुचवीतात. उदा. बायोफीडबॅक, मेडिटेशन किंवा मसाज.

हे सर्व कार्य करते का?

खूप जास्त दुखणे असणा-या रोगयांमध्ये नॅचरोपॅथीच्या औषधोपध्दतीचा जास्त फायदा होतो. ब-याच केस मध्ये आहार पध्दती बदलावी लागते, क्वचित मसाज घ्यावा लागतो, यामुळे बरेच आरोग्य बाबतचे प्रश्न सुटतात. अनेक नॅचरोपॅथी टेक्निकच्या मागे छोटेसे शास्त्र असते, अभ्यासक म्हणतात की काही व्हिटॅमिनची कमतरता, सायनस, डीप्रेशन हे विशिष्ट आहार पध्दती अवलंबल्याने बरे होऊ शकतात’.

सुरक्षित आहे का?

लायसन्स नॅचरोपॅथी डॉ. जवळ चांगले व सुरक्षित रेकॉर्ड असावयास हवे, तसेच जास्त प्रॅक्टीस हे सुरवातीच्या पध्दतीव्दारे उपचार करुन होते. पण काही नॅचरोपॅथी उपचार पध्दती त्रासदायक ठरल्या आहेत. उदा. चेलेशन थेरेपी (chelation therapy) यामध्ये केमिकल्सचे इंजेक्शन देऊन आर्टरीज कमी केल्या जातात. पण त्यामुळे मृत्यू येऊ शकतो किंवा किडनी फेल होऊ शकते. नॅचरोपॅथी प्रक्टीशनरची खात्री करुनच तो योग्य औषधोपचार अवलंबवतो याची माहीती घेऊनच मग त्याची औषधोपचार पध्दती अवलंबवावी.