Print
Hits: 5177

औषधाची कार्यक्षमता सिध्द करण्याची पध्दत होमिओपॅथीमध्ये एकमेव आहे कारण त्यामध्ये औषधांचा माणसांवर काय परिणाम होतो ते अभ्यासले जाते, बाकीच्या शास्त्रांप्रमाणे प्राण्यांवर होणारा परिणाम अभ्यासला जात नाही. व्यक्तिनिष्ठ लक्षणांना जास्त महत्व दिले जाते वस्तुनिष्ठ लक्षणांना नव्हे. माणसांना त्यांच्या भावना व्यक्त करता येतात आणि ते बोलू शकतात त्यामुळे औषधांचा त्याच्या मनावर झालेला परिणाम कळू शकतो.

औषधाची उपयोगिता सिध्द करण्यास अनेक आठवडे लागतात कारण तज्ञांना रोजच्या रोज आढळणारी लक्षणे आणि त्यात होत जाणारा बदल लिहून ठेवावा लागतो. शरीरात होत जाणारे बदल आणि मानसिक बदल ज्याला कळतात अशा चिकीत्सकाला उत्तम तज्ञ समजले जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंघटना असणा-या व्यक्तिंवर उपचार करुन बघितले जातात ज्यामुळे व्यक्तिची स्वयंघटना कळू शकते.

चैतन्य देणारी शक्ति
जर व्यक्तिचे शरीर, मन आणि आत्मा हे एकाच पातळीवर असतील तर त्या व्यक्तिला निरोगी समजले जाते. ही पातळी व्यवस्थित ठेवण्याचे काम जी शक्ति करते तिला चैतन्य देणारी शक्ति असे म्हणतात.

निरोगी व्यक्ती मध्ये ही शक्ति सर्वसाधारण पातळीवर असते. आणि आजारीपणामध्ये ती सर्वसाधारण स्थितीवरुन ढळते. आजारी अवस्थेत औषधांच्या आधारे ती शक्ति परत सर्वसाधारण पातळीवर आणायची असते आणि त्यासाठी औषधांची तीव्रता अशी लागते की जी रोगावर प्रभावी ठरेल आणि त्याला शरीरातून काढून टाकील.

प्रकृतीचे मूलभूत प्रकार
एखाद्या व्यक्तिची रोगाची पातळी ज्यामुळे कळू शकते त्यास प्रकृतीचे मूलभूत प्रकार म्हणतात. निरनिराळया व्यक्तिंच्या दृष्टिने तज्ञांनी त्यात चार प्रकार सांगितले आहेत. जसे, सोरा सिफीलीस, सायकोसीस आणि ट्युबर क्युलर. प्रत्येक प्रकारामध्ये त्याच्या वेगळया लक्षणंचा गट, घटना आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ति या चारापैकी कुठल्यातरी प्रकारात मोडते.

सोरा या प्रकारामध्ये शरीरातील वरवरचे बदल अंतर्भूत केले आहेत उदा. कातडीचे रोग, मानसिक बदल आणि आजार. ह्या प्रकारचे रुग्ण अतिक्रियाशील आणि संवेदनाशील असतात. (अशा व्यक्ती एखाद्या संवेदनाला विचित्र पध्दतीने प्रतिसाद देतात आणि तोही अतिक्रीयाशील पध्दतीने असतो)

सायकोसिस या प्रकारातील व्यक्तींची स्वयंघटना मंद असते आणि त्यांना असे आजार होतात की ज्यामध्ये त्या बसून राहतात आणि मंदपणे स्वस्थ असतात. या व्यक्तिंमध्ये लसिकायुक्त स्वयंघटना असते आणि त्यामुळे त्यांच्या लसिकाग्रंथी वाढलेल्या असतात आणि त्यांना तशाचप्रकारचे आजार होतात.

सिफीलीटीक प्रकाराच्या व्यक्तिंमध्ये मानसिक आणि शारिरीक अशा दोन्ही प्रकारच्या विध्वंसक प्रवृति असतात. त्यामुळे सर्वसाधारण त्यांना विध्वंसंक प्रकारचे उदा. कर्करोग होतात. या प्रकारातील व्यक्तींची जास्त काळजी घ्यावी लागते की ज्यामुळे जास्त शारिरीक गुंतागुंत वाढू नये. होमिओपॅथिची औषधे ही गुंतागुंत होऊ देत नाहीत.