Print
Hits: 3001

होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅमेमन यांच्या सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीचे स्वास्थ्य किंवा त्याचे आजार या अवस्था निर्धारित करणाऱ्या घटकांस मायझम असे म्हणतात.

मायझम

चिकित्सकांनी मायझमचे (Miasm) चार प्रकार केले आहेत ज्यामध्ये सर्व व्यक्तींचे वर्गीकरण केले जाऊ शकते ते म्हणजे - सोरा (Psora), सिफिलिस (Syphilis), सायकॉसिस (Sycosis) आणि ट्युबर्क्युलर (Tubercular). प्रत्येक मायझमचा वर्गीकृत असा लक्षणांचा आणि घटकांचा संच आहे आणि सर्व व्यक्ती त्यापैकी एकामध्ये समाविष्ट करता येतात.