Print
Hits: 3867

टॉन्सील्स किंवा गिलायु ग्रंथी या आपल्या शरीरामधील उपजत संरचनांच्या योजनेचा एक भाग आहे. या ग्रंथी शरीरामधील रोगप्रतिकारयंत्रणेचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. या टॉन्सिल्स किंवा गिलायु ग्रंथींना जंतुसंसर्गाची लागण होऊन त्यांना जेव्हा सूज येते, त्यास टॉन्सिलायटिस अथवा गिलायुशोथ असे म्हटले जाते.

टॉन्सिलायटिस हा तीव्र (Acute) अथवा जुनाट (Chronic) - वारंवार उदभवणारा असू शकतो.

होमिओपॅथी आणि टॉन्सिलायटिस

तीव्र टॉन्सिलायटिस (Acute Tonsillitis) हा स्ट्रेप्टोकोकाय (streptococci) या जिवाणूंमुळे सामान्यतः १५ वर्षांखालील मुलांमध्ये होतो.

कारणे

१. शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी पडल्यास - ज्या मुलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती अद्याप विकसित झालेली नाही, अशा मुलांमध्ये टॉन्सील्सलाच जंतुसंसर्गाची लागण होऊ शकते.

२. श्वसनमार्गातील संसर्गामुळे.

३. शीत पेय, आईसक्रीम अथवा थंड पदार्थांच्या सेवनामुळे.

४. प्रदूषणाचा अतिरेक.

५. हवा खेळती राहील अशी व्यवस्था नसणारी गर्दीची ठिकाणे.

६. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास.

मुख्य लक्षणे

१. घश्यामध्ये कोरडेपणा जाणवणे आणि टोचल्या सारखे वाटणे.

२. डोकेदुखी व अशक्तपणासह ताप येणे.

३. गिळण्यास त्रास होणे व काही खाऊ न वाटणे.

४. घशाचे दुखणे कानापर्यंत जाणे.

५. ‘आ‘ करून पाहिल्यास टॉन्सील्स (गिलायु ग्रंथी) लाल झालेल्या दिसणे, सुजणे.

६. आवाज बदलणे / बसणे.

७. घश्यात गाठी येतात, त्या सुजतात व दुखतात.

तीव्र फॉलीक्युलर टॉन्सिलायटिस (Acute Follicular Tonsillitis) – टॉन्सिलायटिसच्या या प्रकारामध्ये टॉन्सील्स (गिलायु ग्रंथी) लाल झालेल्या दिसतात, सुजतात तसेच त्यांच्यावर पू झाल्यासारखे पिवळ्या रंगाचे छोटे ठिपके दिसू लागतात.

समस्या

१. मध्यकर्णदाह किंवा कानात वेदना व पु होणे.

२. Tonsillar abscess or quinsy टॉन्सिलर गळू (टॉन्सिलर अ‍ॅब्सेस -Tonsillar Abscess) किंवा उपजिव्हीकांचा शीघ्रकोपी जोरदार दाह होऊन ताप येणे.

३. जुनाट अथवा वारंवार उदभवणारा टॉन्सिलायटिस.

उपचार

१. सौम्य , मऊ , पोषक आहार

२. मीठ घातलेल्या कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घश्याला आराम मिळतो.

३. द्रव पदार्थ आणि कोमट पेय भरपूर प्रमाणात प्या.

४. जास्त त्रास होत असल्यास झोपून राहावे.

५. स्वतःवर स्वतःच औषधोपचार करू नयेत.

६. आवश्यकता असल्यास प्रतिजैविके आणि वेदनशामक औषध घ्यावीत.

७. लक्षणे अतित्रासदायक अथवा वारंवार आढळत असतील तरच टॉन्सील्स किंवा गिलायु ग्रंथी काढण्यात याव्यात, असा सल्ला देण्यात येतो.

होमिओपॅथीक पैलू

१. होमिओपॅथी ही औषधोपचार पद्धत तार्किक नियम व प्रायोगिक माहितीच्या लक्षण साधर्म्यानुसार व कालानुरूप एकच औषध देण्यात येतात.

२. होमिओपॅथी औषधोपचारामुळे रुग्णांचे शारीरिक संतुलन सुधारते व प्रतिकार शक्ती वाढते.

३. तीव्र (Acute) टॉन्सिलायटिसवर, तीव्र लक्षणांचा विचार करून औषधेही तीव्र दिली जातात.

४. जुनाट (Chronic) - वारंवार उदभवणाऱ्या टॉन्सिलायटिसवर, रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक प्रकृतीनुसार उपचार करणे गरजेचे असते. प्रकृतीनुसार औषधोपचार केल्यास टॉन्सिलायटिसची वारंवारता कामी होते.

५. लहान मुलांना टॉन्सील्स किंवा गिलायु ग्रंथी काढल्यानंतर देखील वारंवार श्वसनमार्गाचे संक्रमण होत राहते, असे आढळले आहे. त्यामुळे केवळ अत्यंत गंभीर किंवा जटील प्रकरणांमध्येच टॉन्सील्स काढण्याचा सल्ला देण्यात येतो.

६. प्रकृतीनुसार औषधोपचार केल्याने आरोग्य सुधारते. अगदीच आश्चर्यकारक परिणाम असे नाही, परंतु टॉन्सील्स किंवा गिलायु ग्रंथी काढल्यानंतरही (tonsillectomy) समाधानकारक परिणाम नसतील तर प्रकृतीनुसार औषधोपचार उपयुक्त ठरतात.

त्यामुळे तीव्र अथवा जुनाट टॉन्सिलायटिससाठी वरील अतिरिक्त उपायांसह, होमिओपॅथी ही अत्यंत सुरक्षित, हळुवार व तरीही प्रभावी व विश्वसनीय उपचार पद्धती आहे असे आपण मानू शकतो.