सकाळ वृत्तसेवा
३१ मे २०१०
पुणे, भारत
गोमूत्र चिकित्सा पद्धतीने कर्करोग बरा करता येतो, असा दावा इंदूर येथील वीरेंद्रकुमार जैन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, भारत सरकारच्या आयुष'तर्फे यावर संशोधन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून अनेक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आला आहे. रुग्णांना गोमूत्र आणि काही वनौषधींचा काढा एका निश्चित प्रमाणात दिला जातो. या चिकित्सा पद्धतीमुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.
कर्करोगावर गोमूत्र प्रभावी असल्याचा दावा
- Details
- Hits: 3915
0