Print
Hits: 3232

सकाळ वृत्तसेवा
०४ सप्टेंबर २०१०
सोलापूर, भारत

मुलाच्या दोन्ही किडन्या (मूत्रपिंड) निकामी झाल्यानंतर मोठ्या धैर्याने या संकटाला सामोरे जात आईनेच स्वतःची एक किडनी दिली आणि मुलाला जीवदान दिले. सिंधू दादा लोकरे (रा. मोदी, सोलापूर) असे त्या आईचे नाव आहे.

मुलगा नितीन (वय 26) याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर सिंधू लोकरे या थोड्याही डगमगल्या नाहीत. त्यांनी तातडीने स्वतःची किडनी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नितीनवर यशस्वी शस्त्रक्रिया करून किडनीरोपण करण्यात आले. नितीन याचा मोदी भागात श्री गणेश एजन्सी नावाने स्टेशनरी व्यवसाय आहे. अडीच वर्षांपूर्वी नितीनला धाप लागल्याने एका रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तपासण्या केल्यानंतर नितीनच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर 12 ऑगस्ट 2008 रोजी त्याला यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. बसवराज कोलूर यांनी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर पुढील अडीच वर्षे नितीनची तब्येत उत्तम राहिली. त्याला परत त्रास सुरू झाल्याने 3 जून 2010 रोजी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी डायलिसिसचा सल्ला दिला. त्यानंतर तब्बल बारा वेळा त्याला डायलिसिस करावे लागले. डॉ. कोलूर यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानंतर नितीनची आई सिंधू यांनी एक किडनी देण्याची तयारी दर्शविली. सर्व तपासण्या केल्यानंतर 30 जुलै रोजी नितीनवर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता नितीनची प्रकृती उत्तम आहे. आईने दिलेल्या किडनीमुळेच नितीनला पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येणार आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.