Print
Hits: 3244

सकाळ
१८ मे २०१०
मुरुड, भारत

रुग्णांना अनेक प्रकारच्या रुग्णसाहित्याची नितांत गरज असते; परंतु हे साहित्य विकात घेणे सर्वांनाच शक्‍य नसते. ही बाबत लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मुरूड या संस्थेने सेवा कार्य म्हणून रुग्ण साहित्य उपलब्ध करून देण्याचा सेवा प्रकल्प नुकताच सुरू केला आहे.

या प्रकल्पांतर्गत रुग्णांना फोल्डीग स्ट्रेचर, बेड पॅन, वॉटर बेड, ट्रॅकशन किट, क्रॅडल वॉकर, स्टिकस, टॉयलेट चेअर, व्हील चेअर, कुबड्या यासह अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी केवळ नाममात्र शुल्क आकारले जाते. हा सेवा प्रकल्प मुरूडमधील मिनी मार्केट इमारतीतील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी 5 ते 7 या वेळात गरजूंनी संपर्क साधावा.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.