Print
Hits: 3341

सकाळ वृत्तसेवा
०४ ऑक्टोबर २०११
मुंबई , भारत

अपंग व्यक्‍तींना रोजगारासाठी यापुढे जागा उपलब्ध करून देताना अपंग महिलांना प्राधान्य देण्याबरोबरच त्याबाबत टक्‍केवारी निश्‍चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्रालयात झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीमती सुनीता चंदू चौरे या ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अपंग महिलेने ठाणे पालिकेकडे स्टॉलसाठी अर्ज केला होता. परंतु आपल्याला डावलून इतरांना स्टॉल दिल्याची तक्रार चौरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी पालिकेच्या निर्णयाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अपंगांसाठी पदपथावर जागा देताना पालिकांनी "हॉकर्स झोन' निश्‍चित करावा व त्यावेळी अपंग महिलांसाठी प्राधान्य देण्याचे धोरण ठरवावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजवर मंत्रालयात झालेल्या 62 लोकशाही दिनाच्या कार्यक्रमांत एक हजार 741 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एक हजार 740 अर्ज निकाली काढले आहेत. एका अर्जावरील कार्यवाही प्रलंबित असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी या वेळी दिली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing&rsquo or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.