Print
Hits: 3261

लोकमत
२७ डिसेंबर २०१२
कोल्हापूर, भारत.

भावातीत ध्यानाचे प्रणेते महर्षी महेश योगी यांनी संपूर्ण जगाला भावातीत ध्यानाची अमूल्य देणगी दिली. त्यांचाच विचार पुढे रुजवताना आता देशातील पहिले महर्षी वैदिक स्वास्थ केंद्र भोपाळमध्ये सुरू होणार आहे. शुद्ध आयुर्वेदासह जगभरातील आधुनिक वैद्यकशास्त्रांवर येथे सर्वांगीण चर्चा घडवतानाच संशोधनासह निष्णात वैद्य निर्माण करण्यावर केंद्राचा अधिक भर असेल. त्याशिवाय शुद्ध आयुर्वेदाचाही एक अभ्यासक्रम तयार केला जाणार असल्याची माहिती आज महर्षी महेश योगी वैदिक विश्‍वविद्यालयाचे कुलपती ब्रह्मचारी डॉ. गिरीश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, "आजवर वैद्यकीय क्षेत्राने अनेक अंगांनी प्रगती केली. अनेक संशोधने पुढे आली. पण दुसरीकडे रुग्णांची संख्याही वाढती आहे. नवनवे आजार वाढताहेत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. मुळात महर्षी महेश योगी यांनी "रोगरहित समाज' ही संकल्पना पहिल्यापासून मांडली आहे. त्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे जगभरातील सर्व वैद्यकशास्त्रातील तज्ञांना निमंत्रित करून अनेक चर्चासत्रे घेतली. संशोधनपर प्रकल्प राबवले. त्यातूनच पुढे त्यांनी "वैदिक स्वास्थ्य पद्धती' समाजासमोर मांडली. शुद्ध आयुर्वेदासह वेदविज्ञानातील चाळीस उपविभागांचा यामध्ये समावेश आहे."

Aarogya news

माणसाला आजार झालाच नसला पाहिजे आणि तो व्हायचा नसेल तर त्याची आचारसंहिता कशी हवी. त्याने कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा, यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हायला हवेत. अगदी दिवसातील सकाळी आणि सायंकाळची प्रत्येकी पंधरा मिनिटे प्रत्येक माणसाने स्वतःसाठी देऊन "भावातीत ध्यान' केले तर तो अनेक आजारापासून लांब राहू शकतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे महर्षी वैदिक स्वास्थ्य केंद्रात कोणत्याही वैद्यकशास्त्रातील तरुणांनी संधी दिली जाईल. तेथे त्यांनी त्यांना आवश्‍यक तितकी वर्षे "वैदिक स्वास्थ्य पद्धती'चा अभ्यास करावा, अशी अपेक्षा आहे. ही पद्धती त्यांनी जर आत्मसात केली तर निश्‍चितच तो एक निष्णात वैद्य होईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला वनौषधी विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, डॉ. दिलखुष तांबोळी उपस्थित होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.