Print
Hits: 2502

महाराष्ट्र टाइम्स.
22 मे 2012

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शारीरिक–मानसिक विकार हे शरीरामधील यंत्रणा बदलल्याने होतात. संगीतोपचारामुळे मज्जासंस्था कार्यक्षम होऊन त्या व्याधी ब–या करण्यास वेगाने मदत करतात. त्यामुळेच, शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी संगीतोपचाराचे वरदान ठरते आहे.

सूर–संजीवनी म्युझिक थेरपी ट्रस्टतफेर् पुण्यात नुकतेच संगीतोपचाराचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञ पं. शशांक कट्टी यांनी त्या वेळी मार्गदर्शन केले. रूपाली बिडवई यांनी स्वागत करून संगीतोपचारासंदर्भात अनुभवकथन केले. ट्रस्टतफेर् आयोजित उपक्रमांची माहिती देताना कट्टी यांनी सांगितले की, माणसाच्या आरोग्यातील असमतोलपणा सुरांच्या गुणधर्मांच्या मदतीने दूर करणे म्हणजे संगीतोपचार. विशिष्ट रोगांवरील उपचार करताना ठराविक राग ठराविक वेळेला ऐकल्यानंतर उपयुक्त ठरतात. त्यांचे अपेक्षित परिणाम मिळतात. संगीतोपचार या शास्त्रामध्ये आधुनिक वैद्यकीय संशोधन, आयुवेर्दातील तत्त्वे आणि संगीतामधील परंपरा यांची सांगड घातली जाते. नामवंत वैद्यांच्या मदतीने संधीवात, पित्तविकार, मायग्रेन-निदानाश, नैराश्य, मधुमेह-कावीळ, कोलायटिस, अस्थमा, उच्चरक्तदाब, अपचन, ताण-तणाव, अशा आजारांवर मात करण्यात यश मिळाले आहे. या कार्यशाळेदरम्यान सतारीवर काही रागांचे मिश्रण करून संगीतोपचाराची प्रात्यक्षिके दाखवली. संमोहनतज्ज्ञ डॉ. हिमालय पंतवैद्य यांनी रोग हे जंतूपासून, तर व्याधी शरीरातील यंत्रणेत बदल झाल्यामुळे होतात, असे सांगितले.

ट्रस्टच्यावतीने संगीतोपचार पद्धतीचे शास्त्रीय शिक्षण देण्याच्या लखनौ आणि मुंबईतील यशानंतर आता पुण्यातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयात ९ जूनपासून पार्टटाइम प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, संगीततज्ज्ञ आदींना होईल. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : ९८८१११२५२१, ९८२००४६९२०

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.