Print
Hits: 2492

सकाळ
6 Jun 2012

मुंबई – मुंबईतील परळ येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जमीन टाटा कर्करोग रुग्णालयाला देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे; मात्र त्याला "हाफकिन'कडून कडाडून विरोध होण्याची शक्‍यता आहे.

"हाफकिन'च्या जमिनीतील पाच एकरचा भूखंड "टाटा मेमोरियल सेंटर'च्या महिला आणि मुलांच्या कर्करोग युनिटला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास "हाफकिन'मधून मोठ्या प्रमाणात विरोध होईल, असे सूत्रांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने पाच एकर जमीन देण्यात येईल. प्रत्येक वर्षी भाड्यापोटी मिळणाऱ्या 13 कोटी 28 लाख रुपयांतील निम्मा निधी "हाफकिन'ला मिळेल. "हाफकिन'ला सध्या देण्यात येणारे अनुदानही नियमित सुरू राहील. जमीन दिल्यास कर्करोगग्रस्त सरकारी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयात ठराविक खाटा आरक्षित ठेवल्या जातील, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.

टाटा रुग्णालयात दर वर्षी तीन लाख कर्करुग्ण उपचार घेतात. "हाफकिन'च्या जमिनीवर महिला आणि मुलांच्या कर्करोगावरील उपचार केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.