Print
Hits: 4582

घटस्फोटित व्यक्तीला जे काही झाले त्याबाबत प्रचंड चीड असते. ते तो आपल्या जोडीदाराचा द्वेष करू लागतात. दोघेही आक्रमक रीतीने वागतात, आपल्या जोडीदाराने आपल्याला फसवले, अशी भवना त्याच्या/तिच्या मनात घर करून असते. घटस्फोटानंतरचे जीवन खडतर, एकाकी वाटले, तरी आयुष्य पणाला न लावता, या घटनेकडे एक घटना म्हणून पाहिले तर नव्या जीवनाची पहाट आणि सुसह्य ठरते.

घटस्फोट घेतल्यानंतर कुठल्याही कुटुंबाची अवस्था दोर तुटलेल्या पतंगासाखी असते. कुटुंबातील व्यक्ती, विशेषत: लहान मुले भरकटल्यासाखी होतात. त्यामुळे पती - पत्‍नीनी शक्यतो घटस्फोटाचा पर्याय टाळावा, हे उत्तम. पण काही वेळा पतीपत्‍नींमधील तणाव एवढे वाढतात की सर्वसाधारण वैवाहिक जीवन जगणे अशक्य होऊन जाते. तडजोड, पडते घेणे, सहन करणे हे सगळं मार्ग खुंटतात आणि केवळ एकमेकांपासुन अलग होणं. एवढा एकच पर्याय शिल्लक राहतो. अशा वेळी घटस्फोटाचा अवघड निर्णय पतीपत्‍नी घेतात आणि एका नव्या जीवनाला सामोरे जाण्याचा प्रयत्‍न करतात.

पतीपत्‍नीनी परस्पर विचाराने, सामंजस्याने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असेल तर घटस्फोटानंतरचे आयुष्य सुरळीत व्हायला बरीच मदत होते. एकमेकांविषयी कटुंता रहात नाही. आणि मानसिकदृष्ट्या घटस्फोट घेण्याची तयारी झाली असल्यामुळे पतीपत्‍नी दोघेही परस्थितीला सामोरे जाण्यास तयार असतात. अशा जोडप्याला मुले असतील तर त्यांनाही याची कल्पना असते आणि आपल्या वेगळे होण्याचे घातक परिणाम मुलांवर होऊ नयेत. याची काळजी घेण्याचा जागरूकपणा हे जोडपे दाखवते.

मात्र घटस्फोटाचा निर्णय घेणे सोपे नसते. भारतीय समाजात पती पत्‍नीची सोबत साता जन्माची मानली जाते. ही समजूत आता मगे पडली असली तरी आयुष्यभर एकमेकांची सोबत करण्याची अपेक्षा दोघांनाही असते. अशा वेळी एकमेकांबद्दल वाटणारी आत्मीयता, समंजसपणा, समजूतदारपणा, परस्पर विश्वास, सहकार्याची वृत्ती यापैकी एखादा गुणही जर कमी पडला तर ते कुटुंब उद्‌ध्वस्त होते. भारतात घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तीकडे थोडे हीन दृष्टीने पाहिले जाते. घटस्फोटित पुरूषांपेक्षा घटस्फोटीत स्त्रीला अधिक अवहेलना सोसावी लागते.{mospagebreak} घटस्फोटित व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा विचार तिच्या/त्याच्या आप्त स्वकीयांनी मित्रपरिवारांने करायला हवा. घटस्फोटित व्यक्ती आपले मानसिक संतुलन गमावून बसलेली असते घटस्फोंट घेतल्याने तिच्या व्यक्तिमत्वावर, कामावर वाईट परिणाम होतात. त्यातच सामाजिक अवहेलनेलाही तिला/त्याला तोंड द्यावे लागते. तिच्या त्याच आप्तस्वकियांच्या मित्रांच्या आधाराची तिला, त्याला गरज असते. हा आधार मिळाल्यास प्राप्त परिस्थितीला तोंड दिण्याचे सामर्थ्य तिच्यात/त्याच्यात येते.

घटस्फोटित व्यक्तीने आपले मानसिक संतुलन ढळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. या कामी त्याला/तिला आपल्या मित्र परिवाराबरोबरच मानसोपचार तज्ञांचीही मदत होऊ शकते. आता माझे आयुष्य संपलं काही करण्यासारखे उरले नाही अशासारखी निराशाजनक भावना मनात आणण्यापेक्षा जे काही घडले ते अनिष्ट होते, ते टाळायचा मी प्रयत्न केला. त्यात मला यश आले नाही, पण याची सावली मी माझ्या पुढील आयुष्यावर पडू देणार नाही. मी धैर्याने समजाला/मला स्वत:ला सामोरे जाईन असे विचार मनात आणले तर घटस्फोटाने दिलेल्या मानसिक धक्क्यातून सावरायला मदत होईल.

आपल्या माजी जोडीदारावर किंवा स्वत:वर दोषारोप करून परिस्थितीत बदल तर होत नाहीत पण घटस्फोटित व्यक्ती स्वत:चे आणि त्याबरोबरच आपल्यामुलांचे अक्षम्य नुकसान करते. घडून गेलेल्या गोष्टींवर सतत विचार करते, त्याचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा घटस्फोटानंतरच्या आपल्या आयुष्याची व्यवस्थित आखणी कशी करायची, याची काळजी अधिक घ्यायला हवी. घटस्फोटित व्यक्ती स्वत:ला असुरक्षित मानू लागतात. त्यामुळे त्या आपल्या मुलांनाही नीट आधार देऊ शकत नाहीत. घटस्फोट ही आपल्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक अशी घटना असते. पण त्यामुळे एकदम, जीवनाच निरोप घेण्याची आवश्यकता नसते. जितक्या लवकर या घटनेचा परिणाम मनावरून पुसून टाकण्यात घटस्फोटित व्यक्तीला यश येते तितक्या जलदगतीने ते आपल्या आयुष्यात संतुलन आणण्यात यशस्वी होते.

आपल्या आईवडिलांच्या घटस्फोटाचे परिणाम मुलांवर होतात. पण मुलांना विश्र्वासात घेऊन तुला आईकडे किंवा वडिलांकडेच रहावे लागणार, याची जणीव करून देने आवश्यक असते. मुले आईवडिलांवर सारखेच प्रेम करतात. आपल्या माजी जोडीदारावर मुलांच्या देखत दोषारोप करून त्यांची त्यांच्याबद्दल मने कलुषित करण्याने मुलांचे मानसिक संतुलन ढळते. यामुळे अनेक वेळा सोडून गेलेल्या आईबद्दल/ वडिलांबद्दल अत्यंत हिंस्त्र भावना त्यांच्या मनात असते. करण्यासारखे काही उरले नाही, मुलांच्या विकासासाठी आईवडिलांचे प्रेम मिळणे, अत्यंत गरजेचे असते. घटस्फोटित व्यक्तीच्या घरात हे शक्य नसते. पंरतु मुलांना काही काळ आपल्या माजी जोडीदराबरोबर घालवू दिला तर मुलांचेही मानसिक संतुलन राखले जाईल.

’घटस्फोट’ ही कल्पना अत्यंत क्लेशदायक आणि विविध समस्यांना आमंत्रण देणारी असते. ’घटस्फोट’ घेनाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवायलाच हवी. ’ती मला सोडून गेली तेव्हा माझा मुलगा१० वर्षांचा होता. घटस्फोटनंतरचा काळ माझी कसोटी पाहणाराच होता. माझा संसार मी सावरू शकलो नाही. याचे मला राहून राहून वाईट वाटे पण हळूहळू माझ्या लक्षात आले आपल्या वाईट वाटण्याने परिस्थितीत बदल होणार नाही, मग मी सावरलो आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची तयारी केली.

४५ वर्षाचे एक गृहस्थ सांगतात.
घट्स्फोट खरोखरच आघात करणारा होता. पण मी खचले नाही. लग्नापूर्वी अर्धवट राहिलेला कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केला आणि आता स्वत:च्या पायावर उभी आहे. विमल सांगते.

घटस्फोटानंतर अनेकदा दुसरा विवाह करण्यास पुरूष-स्त्री कचरतात. नवा जोडीदार पहिल्यासाखाच असला तर ही शंका त्यांना भेडसावत असते. पुन्हा पुन्हा त्याच परिस्थितीत तोंड देण्यापेक्षा एकटे राहणे बरे, असाविचार केला जातो. परंतु असा नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा नव्या जोडीदाराने नव्या उमेदीने स्वागत केले तर आयुष्यात स्थिरावण्यास त्याची मदत होईल. थोडक्यात, घटस्फोटानंतरचे जीवन खडतर, एकाकी वाटले, तरी आयुष्य पणाला न लावता या घटनेकडे एक घटना म्हणून पाहिले तर नव्या जीवनाची पहाट सुसह्य आणि धीर देणारी ठरते.