Print
Hits: 83734

मुख संभोग सुरक्षित असतो का?

जर योग्य ती काळजी घेतली तर मुख संभोग सुरक्षित असतो. शिश्नाचे कातडे मागे सरकवून, वीर्यकण स्वच्छ धुणे आणि शिश्निकेच्या परीसराला पाण्याने धुवून टाकणे गरजेचे आहे. पुरूषाने स्त्रीच्या योनीशी तोंडाने संपर्क करणे (कनिलींग) स्त्रीयांना विलक्षण उत्तेजना देणारे असते. जर योनीमार्गात काही संसर्ग बाधा नसेल तर करायला काहीच अडचण नाही. तसचं पुरूषाचं शिश्न आणि स्त्रियांच मुख यांचा संपर्क ज्याला फेलाशिओ म्हणतात. जर शिश्नाला काही बाधा नसेल तर दोघांनाही त्यात आनंद मिळतो.

अशावेळी वीर्य पोटात गेलं तर? काही अपाय?

अजिबात नाही. एकदा वीर्यांची चव अंगवळणी पडली की स्त्रीला मजा वाटू लागते. वीर्यात कोणतेही अपायकारक घटक नसतात. उलटपक्षी त्यात प्रथिने आणि क्षार असतात.

वीर्याची चव कशी असते?

साधारणपणे खारट, पण ती चव खाण्यापिण्यावर अवलंबून असते.

मुख संभोगाने एड्‍स होतो का?

एड्‍स होण्याकरता जोडीदार एच‍आयव्ही बाधित असायला हवा. रक्त, वीर्य आणि योनी द्रवात, लाळेपेक्षा अधिक मात्रेत एच‍आयव्हीचे विषाणू असतात. म्हणून, पुस्तकी माहितीप्रमाणे जर संभोगात भाग घेण्यार्‍या व्यक्तीच्या तोंडाला जखम असेल तर बाधा होवू शकते. पण व्यवहारात ही फार लांबची शक्यता आहे. म्हणूनच एचआयव्ही बाधित व्यक्तीने अबाधित व्यक्तीशी मुख संभोग केल्यास बाधा होण्याची शक्यता कमीत कमी असते.